Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is Debt Fund?: डेब्ट फंड म्हणजे काय? त्याचे कोणकोणते प्रकार आहेत?

What is Debt Fund

What is Debt Fund?: डेब्ट फंड सिक्युरिटीजमध्ये तेच लोक गुंतवणूक करतात जे treasure bill, कॉर्पोरेट बाँड्स, व्यावसायिक कागदपत्रे, सरकारी सिक्युरिटीज आणि इतर अनेक(money market instruments) सारख्या निश्चित उत्पन्नची (fixed income) कमाई करतात. तुम्हाला सुद्धा माहिती असायला हवी, डेब्ट फंड म्हणजे काय? सविस्तर वाचा.

What is Debt Fund?: डेब्ट (कर्ज) ही अशी प्रमुख बाजारपेठ आहे, ज्यामध्ये लोक आपले पैसे नफा कमावण्यासाठी गुंतवतात. डेब्ट (debt)  मार्केटमध्ये विविध साधनांचा समावेश असतो, ज्यामुळे इंटरेस्टच्या (interest) बदल्यात कर्जाची खरेदी-विक्री सुलभ होते. इक्विटी (equity)  गुंतवणुकीपेक्षा कमी रिस्क समजले जाणारे, अनेक गुंतवणूकदार डेब्ट सिक्युरिटीजमध्ये खरेदीला प्राधान्य देतात मात्र, इक्विटी गुंतवणुकीच्या तुलनेत डेब्ट गुंतवणूक कमी returns देते.

डेब्ट फंड सिक्युरिटीजमध्ये तेच लोक गुंतवणूक करतात जे treasure bill, कॉर्पोरेट बाँड्स, व्यावसायिक कागदपत्रे, सरकारी सिक्युरिटीज आणि इतर अनेक(money market instruments) सारख्या निश्चित उत्पन्नची (fixed income) कमाई करतात. या सर्व साधनांमध्ये पूर्व-निश्चित मॅच्युरिटी डेट आणि व्याजाचा दर  (interest rate) आहे जो खरेदीदार मॅच्युरिटीवर मिळवू शकतो म्हणून फिक्स इनकम सिक्युरिटीज ( fixed income securities ) हे नाव आहे. बाजारातील चढ-उतारांचा परिणाम सहसा रिटर्ण्सवर होत नाही. त्यामुळे डेब्ट सिक्युरिटीज हे कमी जोखमीचे गुंतवणुकीचे पर्याय मानले जातात. डेब्ट फंडचे पुढील प्रमाणे प्रकार आहेत..

लिक्विड फंड  (liquid fund) 

जो जास्तीत जास्त 91 दिवसांची मॅच्युरिटी असलेल्या मनी मार्केट instrument  गुंतवणूक करतो liquid fund बचत खात्यांपेक्षा चांगला रिटर्ण्स देतात.

मनी मार्केट फंड (money market fund) 

जो मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये जास्तीत जास्त 1 वर्षाची मॅच्युरिटी असलेल्या साधनांमध्ये गुंतवणूक करतो. अल्प मुदतीसाठी कमी रिस्कच्या debt सिक्युरिटीज मिळविणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा  फंड चांगला आहेत.

डायनॅमिक बाँड फंड (dynamic bond fund) 

जो वेगवेगळ्या  debt  इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक करतो आणि interest rate ची व्यवस्था करतो.  Medium risk आणि ३ ते ५ वर्षांचे गुंतवणूक हा ह्याचा महत्त्वाचा भाग आहे.

बँकिंग आणि पीएसयू फंड्स (Banking & Psu fund ) 

बँकिंग आणि पीएसयू फंड बँका, public institution यांनी  जारी केलेल्या debt इन्स्ट्रुमेंट्समध्ये एकूण मालमत्तेच्या किमान ८०% रक्कम गुंतवतात. हे एक मध्यम जोखीम उत्पादन आहे जे उत्पादन, सुरक्षा आणि तरलता संतुलित करण्याचा प्रयत्न करते.

 गिल्ट फंड्स (gilt fund) 

गिल्ट फंड वेगवेगळ्या मॅच्युरिटीजच्या सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात. ते त्यांच्या portfolio च्या maturity नुसार कमी किंवा दीर्घ कालावधीचे फंड असू शकतात. गिल्ट फंडांमध्ये शून्य डीफॉल्ट जोखीम असते, कारण ते सुरक्षित जी-सेकमध्ये गुंतवणूक करतात.

फ्लोटर फंड्स (floater fund) 

फ्लोटर फंड आपल्या मालमत्तेच्या किमान ६५% रक्कम फ्लोटिंग रेट बाँडमध्ये गुंतवतात. या फंडांमध्ये एमटीएम जोखीम कमी असते कारण त्यांच्या floating rate  debt होल्डिंगवरील कूपन वेळोवेळी बाजाराच्या दरावर आधारित रीसेट केले जातात.

कॉर्पोरेट बाँड फंड्स (corporate bond funds) 

कॉर्पोरेट बाँड फंड यांनी पोर्टफोलियोच्या (portfolio) किमान ८०% हिस्सा एए+ किंवा अधिक रेटेड कार्पोरेट बॉन्डमध्ये (corporate bonds) गुंतवला पाहिजे. असे फंड नियमित उत्पन्न आणि प्रिन्सिपलची सुरक्षितता शोधणार् या जोखीम-विरोधी गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत.