Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Reinsurance Meaning | Insurance of Insurance म्हणजे काय?

what is Reinsurance

Insurance of Insurance : ज्याप्रमाणे आपण आपल्या जोखमीचा आर्थिक भाग इन्शुरन्स कंपनीकडे ट्रान्सफर करतो. त्याचप्रमाणे इन्शुरन्स कंपन्यादेखील त्यांच्याकडील काही भाग विशिष्ट कंपन्यांकडे ट्रान्सफर करतात. त्याला Insurance of Insurance म्हणजेच रिइन्शुरन्स (Reinsurance) म्हणतात.

Reinsurance Concept : इन्शुरन्स अर्थात विमा (Insurance) हा शब्द आपल्या नेहमीच्या परिचयामधला आहे. जेव्हा आपण एखाद्या इन्शुरन्स कंपनीकडून पॉलिसी घेतो, तेव्हा आपण आपली जोखीम त्या कंपनीकडे ट्रान्सफर करत असतो. त्याबदल्यात आपण कंपनीकडे प्रीमिअम म्हणून पैसे भरत असतो. अगदी असेच या इन्शुरन्स कंपन्यादेखील त्यांच्याकडे असलेल्या जोखमीचा काही भाग काही विशिष्ट कंपन्यांकडे ट्रान्सफर करत असतात. म्हणजेच इन्शुरन्स कंपनीला आर्थिक संरक्षण देणाऱ्या कंपन्यांना रिइन्शुरन्स (Reinsurance) म्हणतात.

रिइन्शुरन्स म्हणजे काय? What is Reinsurance?

इन्शुरन्स अर्थात विमा (Insurance) हा शब्द आपल्या नेहमीच्या परिचयामधला आहे. जेव्हा आपण एखाद्या इन्शुरन्स कंपनीकडून (म्हणजे Insurer) जीवन विमा म्हणजेच लाईफ इन्शुरन्स पॉलिसी (Life Insurance) किंवा मोटर इन्शुरन्स (Motor Insurance), फायर इन्शुरन्स (Fire Insurance), ट्रॅव्हल इन्शुरन्स (Travel Insurance), हेल्थ इन्शुरन्स (Health Insurance) यांसारखी जनरल इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करतो, तेव्हा आपण आपली जोखीम त्या कंपनीकडे ट्रान्सफर करत असतो आणि ती जोखीम स्वीकारण्याकरीता इन्शुरन्स कंपनी आपल्याला शुल्क (fees / consideration) म्हणून प्रिमियम आकारत असते. त्याबदली आपल्याला होऊ शकणाऱ्या संभाव्य आर्थिक नुकसानापासून इन्शुरन्स कंपनी आपले संरक्षण करत असते. मात्र या इन्शुरन्स कंपनीज् देखील त्यांच्याकडे असलेल्या जोखमीचा काही भाग काही विशिष्ट कंपनीजकडे ट्रान्सफर करतात. प्राथमिक इन्शुरन्स कंपनीना आर्थिक संरक्षण देणाऱ्या या कंपनींना “रिइन्शुरर” (Insurance of Insurance is known as Reinsurance) म्हणतात.

रिइन्शुरन्सची प्रक्रिया कशी चालते? Reinsurance Process

रिइन्शुरन्स कंपनींकडे जोखीम ट्रान्सफर करणाऱ्या कंपनींना “सेडिंग कंपनी” (ceding company) किंवा “प्राथमिक इन्शुरर” म्हणतात. या प्रक्रियेला “रिइन्शुरन्स” किंवा “Stop-Loss Insurance” म्हणतात. रिइन्शुरन्स किंवा पुनर्विमा हा इन्शुरन्स उद्योगाचाच एक भाग आहे. कोरोनासारखे भीषण जैविक संकट असो किंवा भारतीय उपखंडासारख्या किनारपट्टीलगत वारंवार उदभवणारी चक्रीवादळे, भुजसारखे भूकंप किंवा त्सुनामीसारखा जलप्रलय असो, अशा प्रसंगी मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी होते. अशा प्रसंगी  इन्शुरन्स कंपनीकडे  येणाऱ्या क्लेमची संख्या देखील खूप जास्त असते. प्राथमिक इन्शुरन्स कंपनींनी आपली जोखीम वेगवेगळ्या रिइन्शुरन्स कंपनींकडून इन्शुरन्स खरेदी करून ट्रान्सफर केलेली असते. त्यामुळे या इन्शुरन्स  कंपनीज् अशा आपत्तीच्या घटनांच्या काळात दिवाळखोरीमध्ये निघण्यापासून (bankrupt) स्वतःचा बचाव करू शकतात.


जगातील नामांकित रिइन्शुरन्स कंपन्या (Renowned reinsurance companies of the world)

म्यूनिक रे, स्विस रे, हॅनोव्हर रक एसई, कॅनडा लाईफ रे, बर्कशायर हॅथवे सारख्या रिइन्शुरन्स कंपनीज् जगातल्या बलाढ्य पुनर्विमाकर्ता आहेत. भारतामधील जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC  Re) 2016 पर्यंत एकमेव रिइन्शुरन्स कंपनी होती. २०१६ मध्ये जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रांस सारख्या देशांतील रिइन्शुरन्स कंपनीज् ना पुनर्विमा क्षेत्रात काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे

विम्याचा विमा (Insurance of Insurance)

रिइन्शुरन्स कंपनी प्राथमिक विमा कंपनींना इन्शुरन्स प्रदान करते. म्हणजे एका अर्थाने ती “विम्याचा विमा” करत असते. सेंडिंग कंपनी रिइन्शुरन्स कंपनीला पुनर्विमा करारानुसार तिच्याकडे असलेल्या जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी (valuation) आणि त्यानुसार जोखमीचे व्यवस्थापन (Risk management) करण्यासाठी स्वतःकडील आवश्यक ती सर्व माहिती शेअर करत असते. रिइन्शुरन्स कंपनींसोबत व्यवसाय केल्याने प्राथमिक कंपनींना (Insurer) त्यांच्या आर्थिक ताळेबंदापेक्षा (economic balance-sheet) अधिक जास्त जोखीम घेऊन सक्षमतेने स्वतःचा व्यवसाय करण्याची परवानगी मिळत असते. आपण ज्या पद्धतीने इन्शुरन्स कंपनींचा प्रीमियम भरत असतो, त्याचप्रमाणे इन्शुरन्स कंपनीज् देखील रिइन्शुरन्स कंपनीचे प्रीमियम भरत असतात. आणि इतकेच काय, रिइन्शुरन्स कंपनीज् स्वतःही इतर रिइन्शुरन्स कंपनींकडन पुनर्विमा खरेदी करू शकतात.

रिइन्शुरन्स मुख्यतः दोन प्रकारामध्ये विभागला जातो (Types of Reinsurance)

फॅकल्टेटिव्ह रिइन्शुरन्स (Facultative Reinsurance)

काही इन्शुरन्स पॉलिसीचे करार खूप मोठ्या रक्कमेचे (sum assured) असतात. उदाहरणार्थ - काही श्रीमंत व्यक्तींनी त्यांचा उतरविलेला विमा. त्यामुळे अशा करारांचा पुनर्विमा असणे अत्यावश्यक असते. अशा वेळी रिइन्शुरन्स कंपनी जोखमीच्या अंडररायटिंगसाठी जबाबदार असतो. अशा प्रकारच्या पुनर्विमा प्रकरणी रिइन्शुरन्स कंपनीला पॉलिसीचा सर्व किंवा काही भाग नाकारण्याचा अधिकार असतो.

ट्रीटी रिइन्सुरन्स (Treaty Reinsurance)

हा अनिवार्य विमा (obligatory reinsurance) असतो. हा मुख्यतः समान जोखीम असलेल्या करारांचा केलेला असतो. यामध्ये रिइन्शुरन्स कंपनी पॉलिसीचा कोणताही भाग टाळत नाही.