सर्वोत्तम मूल्य देणारा प्रवासी विमा (Travel Insurance) एखाद्याला कसा सापडणार? सोपं आहे. तुम्ही एखाद्या वेबसाईटवर जा आणि स्वस्त विमा खरेदी करा. पण तिथे एक गोम आहे. दरांची तुलना करणाऱ्या वेबसाईटस अतिशय परिणामकारक असतात. कारण त्या इतक्या शक्तिशाली असतात आणि बऱ्याच लोकांनी वापरलेल्या असतात. कंपन्यांमध्ये आपापले विमा दर स्वस्त ठेवण्यासाठी प्रचंड चढाओढ असते, त्यामुळे टॉप रिझल्टमध्ये येण्यासाठी विम्याचे दर कमी ठेवण्याचा प्रयत्न असतो.
विम्याविषयक एक महत्त्वाचा मुद्दा डोक्यात उपस्थित होती. प्रवाशांच्या गरजा निरनिराळ्या असतात, त्या काही केवळ त्यांच्या वयानुसार वेगळ्या नसतात, तर सामानाचे मूल्यही वेगवेगळे असते. शिवाय प्रवासाचा प्रकारही निरनिराळा असतो (मर्यादा व समावेश अमर्याद आहेत, आऊटडोअर अॅक्टीव्हीटीवर अवलंबून), हे कितपत जोखमीचे आहे, त्यांचा प्रवास कितपत होतो आणि तत्सम इत्यादी, वगैरे इतकी विविधता असल्याने प्रवाशासाठी उपयुक्त ठरेल अशा एका पॉलिसीची शिफारस करणे अशक्य आहे. मात्र विमा निवडण्यापूर्वी या घटकांचा विचार केल्यास एक सर्वसमावेशक पॉलिसी घेणे सोपे होऊ शकते. (How to Choose Travel Insurance)
मल्टी ट्रीप
मल्टी-ट्रीप पॉलिसीमध्ये तुमच्या एका कॅलेंडर वर्षातील सर्व प्रवासाचा समावेश असतो, प्रत्येक प्रवासाचा कालावधी मर्यादीत असतो. दरवेळी सहलीवर जाताना वेगळी पॉलिसी विकत घ्यायची की वर्षाला एकच; हा ज्याचा-त्याचा प्रश्न असून, वर्षातून कितीकाळ प्रवास करणार त्यावर अवलंबून असू शकते. साधारणपणे वर्षाला 3-4 सहली मल्टी ट्रीप पॉलिसीत समाविष्ट असतात. मल्टी ट्रीप पॉलिसीचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला सलग वर्षभर विमा कवच मिळते. दरवेळी सहलीवर जाताना वेगळी पॉलिसी विकत घेण्याची गरज नसते.
तुमची मेडिकल हिस्ट्री
जर तुम्हाला गंभीर स्वरूपाचा आजार किंवा स्थितीने ग्रासलेले असेल किंवा तुम्ही नियमित स्वरुपात मद्यसेवन करत असल्यास पॉलिसीचा प्रीमिअर वाढतो. नियमित स्वरूपाच्या प्रवास विम्यात पूर्वीपासून आजार असल्यास त्याला कवच मिळत नाही. त्याकरिता तुम्हाला अॅड-ऑन पॉलिसी घ्यावी लागते. बऱ्याच प्रकरणांमध्ये प्रौढ व्यक्तींना वयामुळे अधिक रकमेचा प्रीमियम भरावा लागतो.
निवडलेले टुरिस्ट डेस्टिनेशन
जर तुमच्या सहलीचे ठिकाणे हे हाय-रिस्क झोन असेल किंवा विविध साहसी खेळांकरिता प्रसिद्ध असेल तर जोखीम अधिक असल्याने विम्याचा प्रिमियम अधिक रकमेचा असू शकतो.
महागड्या वस्तूंना कवच
आजच्या काळात प्रत्येकजण हा कॅमेरा, लॅपटॉप आणि स्मार्टफोन अशा अनेक महागड्या उपकरणांसोबत प्रवास करत असतो. लक्षात घ्या की, ब-याच प्रवासी पॉलिसीना प्रती वस्तू- दर मर्यादा असते. त्यामुळे तुमच्या महागड्या उपकरणाच्या किमतीनुसार विमा कवच आहे याची खातरजमा करावी किंवा मर्यादा वाढवता येणारी पॉलिसी विकत घ्यावी. जर एखादी व्यक्ती स्थानिक प्रवास करत असेल तर मग इलेक्ट्रोनिक वस्तूला विमा कवच घेण्यासाठी तुमच्या स्थानिक विमा कंपनीला संपर्क करणे हा दुसरा पर्याय आहे. पोर्टेबल व्हॅल्यू गुड्स म्हणून तुम्ही त्याला विमा कवच देऊ शकता का हे तपासा.
सुविधा रद्द करण्याविषयी कवच देणारी पॉलिसी
जर तुम्ही प्रवासाला निघण्यापूर्वीच आजारी पडलात आणि प्रवासावर जाता आलं नाही, तर मग काय मजा! अनेक अनपेक्षित समस्या ऐनवेळी निर्माण होऊ शकतात. सर्वच पॉलिसींना राहण्याची सुविधा (अॅकमॉडेशन) आणि हवाई प्रवास रद्द करण्याचे कवच नसते. त्यामुळे एखादी पॉलिसी विकत घेताना प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वाचा.