Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय आहे ?

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय आहे ?

केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील गरीब नागरिकांसाठी अनेक योजना आणत असतात. महिलांचे जीवनमान सुधारावे यासाठी सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणली आहे.

देशातील गरीब वर्गाला गॅस सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सरकारी एपीएल आणि बीपीएल कार्डधारकांना गॅस सिलिंडरची सुविधा मोफत मिळते. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ही सरकारी योजना सुरु केली होती. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत, सरकार दारिद्र रेषेखालील आणि एपीएल कार्डधारकांना मोफत गॅस सिलिंडर दिले जाते. सरकार सर्व गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर पुरवते. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक महिलांना मोफत गॅस सिलिंडरचे वाटप केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची पात्रता

  1. दारिद्र रेषेखालील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  2. बीपीएल (दारिद्रय रेषेखालील) शिधापत्रिका असावी.
  3. वनवासी किंवा मागासवर्गीय या योजनेचा लाभ घेऊ शकता.
  4. आधीपासूनच गॅस कनेक्शन नसावे.
  5. घरातील महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
  6. बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे  

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साइज फोटो
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुकची प्रत
  • रेशन कार्ड
  • BPL कार्ड

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज कसा करावा?

  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. 
  • अधिकृत वेबसाइट https://www.pmuy.gov.in ला भेट देऊ शकता.
  • येथून एक फॉर्म डाउनलोड करा.
  • हा फॉर्म भरल्यानंतर एलपीजी केंद्रात जमा करा.
  • त्यानंतर नवीन एलपीजी कनेक्शन सहज मिळेल.

वाढत्या घरगुती गॅसच्या किमतीत ही योजनेचा सामान्यांना थोडाफार दिलासा देणारी आहे. अनुदानित गॅस घेताना सुरुवातीला आहे त्या किमतीतच गॅस मिळणार आहे. सरकारतर्फे अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्याचे जमा केली जाणार आहे.

image source - https://bit.ly/3Ns1uiL