उमेदीच्या काळातचं उतारवयातील तरतूद करून ठेवावी हे आदर्श मानले जाते. यासाठी वेगवेगळ्या पेन्शन योजना कार्यरत असतात. या पेन्शन योजनांवर नियंत्रक म्हणून पेन्शन फंड नियामक आणि व्यवस्थापन प्राधिकरण काम करते. या प्रक्रियेत PFRDA ची महत्वाची भूमिका आहे. ती नेमकं काय करते, PFRDA ची आवश्यकता का आहे, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.
PFRDA म्हणजे काय?
PFRDA म्हणजे पेन्शन फंड नियामक आणि व्यवस्थापन प्राधिकरण (Pension Fund Regulatory and Development Authority). याचे मुख्यालय नवी दिल्ली इथे आहे. 2013 मध्ये कायद्याद्वारे स्थापना झाली आहे. 2014-15 पासून ती एक स्वायत्त (autonoums) होऊन स्वतंत्पणे काम करत आहे.PFRDA नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) आणि अटल पेन्शन योजना या दोन्हीचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करते.
‘पीएफआरडीए’ काय काम करते (Functions of PFRDA)
- NPS सह भारतातील पेन्शन स्कीमचे नियमन करते.
- पेन्शन फंड योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करते.
- इंटरमिडीअरीजची नोंदणी करते त्याचबरोबर त्यांचे नियमन देखील करते.
- पेन्शन फंडच्या वेगवेगळ्या स्कीम असतात. या स्कीम मंजूर करते. याचबरोबर या स्कीमच्या टर्म्स, कंडिशन आणि नियम देखील असतात. हे
- सर्व मंजूर करण्याचे महत्वाचे काम देखील PFRDA करते.
- विविध योजनामध्ये ग्राहक सहभागी होतं असतात. या स्कीम्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी काही समस्या निर्माण झाल्यास ती सोडवणे आवश्यक असतें. यासाठी तक्रार निवारण यंत्रणा PFRDA ने स्थापन केली आहे.
- काही वेळा ग्राहक किंवा गुंतवणूकदार आणि इंटरमिडीअरीज यांच्यामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता असते. हे विवाद मिटवण्याचे काम देखील याद्वारे पार पाडले जाते.
- पेन्शन फंड्सची तपासणी आणि ऑडिट करणेदेखील आवश्यक असते. ही जवाबदारीदेखील PFRDA पार पाडते.
नियामकाची आवश्यकता
PFRDA च्या कामाचे स्वरूप समजून घेतल्यानंतर या या नियामकाचे महत्व लक्षात येते. पेन्शन स्कीममध्ये गुंतवलेल्या रकमेचा परतावा मिळण्यासाठी दीर्घ कालावधी लागतो. अशा स्थितीत गुंतवणूकदाराना सुरक्षितता वाटणे महत्वाचे असते. यादृष्टीने PFRDA ची भूमिका महत्वाची आहे.