• 02 Oct, 2022 08:55

शाळेची फी का वाढली?

school fee hike inflation education admission

कोरोना संकट दूर झाल्याने पूर्णवेळ शाळा सुरु झाल्या आहेत. मागील 2 वर्षात मुलांचे कोणत्याही प्रकारचे वार्षिक कार्यक्रम झाले नाहीत. त्यामुळे यावर्षी शाळेचे सर्व कार्यक्रम होणार असल्याने शाळेच्या फी मध्ये वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

महागाईची झळ (Inflation) सर्वच क्षेत्रांना बसत आहे. यातून शिक्षण क्षेत्र तरी कसे वेगळे राहील. शिक्षण घेणे हि काळाची गरज आहे. त्यामुळे अनेक पालक महाग असले तरी आपल्या मुलाने चांगल्या शाळेत जावे यासाठी प्रयत्न करत असता.  जेवढी मोठी शाळा तेवढी त्या शाळेची वार्षिक फी जास्त (School fees hike) असते. हि फी भरण्यासाठी सगळ्याच शाळांनी ईएमआय (EMI) पद्धत सुरु केली आहे. समजा तुमचा शाळेची फी 35500 आहे. तर सुरवातीला ऍडमिशन फी रजिस्ट्रेशन म्हणून 15000 रुपये भरावे लागतात. उर्वरित रक्कम 3 महिन्याच्या ईएमआय (EMI) मध्ये द्यावी लागते. यावर्षी सर्वसाधारणपणे सर्वच शाळांनी त्यांची वार्षिक फी 15 टक्क्यांनी वाढवली आहे.

शाळेची फी किती वाढली

शाळांची फी हि त्या देत असलेल्या सुविधांवरून ठरवली जाते. एखादी शाळा फक्त ऍडमिशन आणि ट्युशन फी घेत असेल तर त्या शाळेची फी कमी असते. पण जी शाळा मुलांचा गणवेश, बॅग,शालेय पुस्तके, साहित्य पुरवीत असेल तर त्या शाळेची फी तुलनेत अधिक असते. कोरोनाच्या काळात महाराष्ट्र सरकारने 15 टक्के फी कपातीचा निर्णय सर्व शाळांना लागू केला आहे. जर कोणत्या शाळेने सरकारच्या निर्णयानुसार हि मागच्या वर्षी फी परत केली नसेल तर यावर्षीच्या वार्षिक फी 15 टक्के सूट देण्याचे बंधनकारक केले आहे. यावर्षी शाळा सुरळीत सुरु काही शाळांनी फी वाढ (School fees hike) केली आहे.  मागच्या वर्षी कोरोनामुळे मुलांच्या काही ऍक्टिव्हिटी होत नव्हत्या. यावर्षी त्या होणार आहेत म्हणून शाळेच्या फी मध्ये वाढ केली असल्याचे शाळेच्या व्यवस्थापकाचे म्हणणे आहे. काही शाळांची 2021 मध्ये नर्सरीची फी 30330 होती ती वाढवून आता 35200 करण्यात आली आहे. तसेच जुनिअर केजी  फी 2021 मध्ये 31500 रुपये होती ती यावर्षी साठी 36900 करण्यात आली आहे. तर सिनिअर केजी ची फी 32400 रुपयांवरून 37500 झाली आहे. मुलं प्रत्यक्षात शाळेत येत असल्याने त्याच्या वर्षीचे सर्व कार्यक्रम घेण्यात येणार असल्याने हि फी वाढ केली असल्याचे सांगण्यात येत आहे.   
कोरोना महामारीने मुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे मागच्या दोन वर्षात मुलांनी शाळेचे तोंडही पाहिले नाही. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलं शिकत होती पण ती घरीच. असे असतानाही शाळा मात्र पालकांकडून सगळ्या वर्षाची फी घेत होती. या दोन वर्षात फी कपात करण्यासाठी अनेक पालकांनी आंदोलन केली. यामुळे काही शाळांनी फी कपात केली तर काही शाळांनी फी संदर्भातला आपला निर्णय बदलला नाही. या वर्षी मुले प्रत्यक्षात शाळेत जायला लागली आहेत. त्यामुळे शाळांच्या फीमध्ये वाढ करण्यात आली आहे.