Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बेनामी मालमत्ता म्हणजे काय?

Benami Property

बेनामी हा मूळ शब्द हिंदी आहे; याचा अर्थ नाव नसलेला असा होतो. एकूणच बेनामी मालमत्ता ही कोणाच्या नावे आहे आणि ती खरेदी करण्यासाठी पैसे कोणी दिले, याची माहिती नसते. तसेच बहुतांशवेळा ज्या संपत्तीचा कोणीही क्लेम करत नाही. त्या संपत्तीला बेनामी संपत्ती (Benami property) म्हटले जाते.

बेनामी मालमत्ता म्हणजे (What is a Benami property?) अशी मालमत्ता, ज्याचे पैसे कोणीतरी एक जण भरतो आणि ती मालमत्ता दुसऱ्याच्याच नावे असते. ज्या व्यक्तीच्या नावे ही मालमत्ता खरेदी केली जाते त्याला बेनामदार असं म्हणतात आणि त्या मालमत्तेला बेनामी मालमत्ता (Benami property) म्हणतात.

बेनामी हा मूळ शब्द हिंदी आहे; याचा अर्थ नाव नसलेला असा होतो. एकूणच बेनामी मालमत्ता ही कोणाच्या नावे आहे आणि ती खरेदी करण्यासाठी पैसे कोणी दिले, याची माहिती नसते. तसेच बहुतांशवेळा ज्या संपत्तीचा कोणीही क्लेम करत नाही. त्या संपत्तीला बेनामी संपत्ती म्हटले जाते. अशाचप्रकारे कोणकोणत्या मालमत्तांचा बेनामी मालमत्तेमध्ये समावेश होतो, हे आपण पाहणार आहोत. कायद्यातील नियमांनुसार ज्या मालमत्तेचे विवरण किंवा संपूर्ण माहिती देता येत नाही. तसेच अशी मालमत्ता खरेदी करताना जो पैसा वापरला जातो. त्याचा स्त्रोत दाखवता येऊ शकत नाही. अशा मालमत्तांना बेनामी मालमत्ता म्हटले जाते.

  • कुटुंबातील सदस्यांच्या नावे खरेदी केलेल्या मालमत्तेचे विवरण किंवा ती मालमत्ता विकत घेण्यासाठी वापरलेल्या पैशांचा स्त्रोत देता आला नाही तर ती मालमत्ता बेनामी मालमत्ता मानली जाते. 
  • कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यासाठी जो पैसा वापरला जातो. त्याचा स्रोत देता आला नाही तर ती मालमत्ता बेनामी ठरू शकते.
  • ट्रस्ट किंवा संस्थेमार्फत खरेदी केलेल्या मालमत्तेचा स्त्रोत संबंधित सदस्यांना सांगता येत नसेल तर ती मालमत्ता बेनामी मानली जाते.

बेनामी मालमत्ता बाळगल्यास काय शिक्षा होऊ शकते?

पूर्वीचा बेनामी व्यवहार (प्रतिबंधक) कायदा, 1988 ( the Benami Transactions (Prohibition) Act, 1988)  अस्तित्वात होता. 2016 मध्ये तत्कालीन सरकारने त्यात सुधारणा करून त्याचे नाव बेनामी व्यवहार (प्रतिबंधक) सुधारित कायदा, 2016 (Benami Transactions (Prevention) Amendment Act, 2016), असे ठेवण्यात आले. हा नवीन कायदा 1 नोव्हेंबर, 2016 पासून देशात लागू झाला. पूर्वीच्या कायद्यात बेनामी मालमत्ता धारण करणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षाचा तुरूंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होण्याची तरतूद होती. त्यात बदल करून ती 7 वर्षे करण्यात आली. 

बेनामी व्यवहार म्हणजे काय?

बेनामी व्यवहार म्हणजे असे व्यवहार ज्यात मालमत्ता ज्याच्या नावे खरेदी केली जाते; ती व्यक्ती त्या मालमत्तेसाठी पैसे देत नाही. यासाठी कोणी तरी दुसरीच व्यक्ती पैसे देऊन व्यवहार करत असते, अशा व्यवहारांना बेनामी व्यवहार म्हटले जाते.


सर्वोच्च न्यायालयाचे मत?

सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने 23 ऑगस्ट, 2022 रोजी नमूद केले की, बेनामी व्यवहार (प्रतिबंधक) सुधारित कायदा, 2016 मधील कलम 3 मधील तरतुदी अनावश्यक कठोर असून त्यांना घटनाबाह्य म्हटले. कलम 5 मधील तरतुदीनुसार, ज्या मालमत्ता सरकारला जप्त करण्याची परवानगी देतात, ती तरतदू सुद्धा या खंडपीठाने घटनाबाह्य घोषित केली.