MSME:संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी MSME या क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे. या क्षेत्रासाठी नवीन योजना राबवित आहे. तसेच 9000 कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगतिले. MSME क्षेत्र म्हणजे काय व या क्षेत्राबाबत आणखी काय घोषणा केल्या आहेत, याबाबत अधिक जाणून घेवुयात.
MSME म्हणजे काय? (What is MSME)
एमएसएमई (MSME) चा फुलफाॅर्म Micro, Small and Medium Enterprises असा आहे. म्हणजेच MSME म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग होय. विशेष म्हणजे देशाची अर्थव्यवस्था या उदयोगांवर अवलंबून असते. थोडक्यात देशाच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचे योगदान मोठे असते. तसेच हे क्षेत्र रोजगाराचे मोठे माध्यम मानले जाते.
MSME साठी काय देण्यात आले? (What was Provided for MSME)
MSME या विविध क्षेत्रासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. या क्षेत्रासाठी शासन एक नवीन योजना राबविणार आहे. या योजनेचे नाव आहे ‘ऐच्छिक समझोता योजना.’ तसेच पत हमी योजनेसाठी 9000 कोटी रूपये देण्यात येणार आहे. एवढेच नाही, तर या नवीन योजनेच्या माध्यमातून 2 लाख कोटी रूपयांचे कर्ज वितरित करण्यात येणार आहे. या नवीन योजनेव्दारे MSME ना 1 टक्क्यापेक्षा कमी व्याज दिले जाणार आहे. ही योजना 1 एप्रिल 2023 पासून ही योजना लागू होणार आहे. याव्यतिरिक्त वित्तीय क्षेत्रातील अनुपालन खर्च कमी करण्यावर जोर देणार असल्याचे यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.