Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Live Commerce: लाइव्ह कॉमर्स म्हणजे काय? इ-कॉमर्सपेक्षा यात वेगळं काय?

What is live commerce

इ-कॉमर्समध्ये आपण फक्त एखाद्या वेबसाइवर जाऊन ऑनलाइन विविध उत्पादने खरेदी करतो. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा ही काही इ-कॉमर्स साइटची उदाहरणे आहे. सोशल मीडियामुळे शॉपिंग मार्केट आणि खरेदीचा अनुभव पूर्ण बदलून गेला आहे. लाइव्ह शॉपिंगमध्ये ऑनलाइन ब्रँड प्रमोशन, इंन्फ्लुएंसर मार्केटिंग याचाही समावेश होतो.

लाइव्ह कॉमर्स ही संज्ञा इ-कॉमर्सपेक्षा सखोल आणि अनेक गोष्टींचा अंतर्भूत असणारी आहे. इ-कॉमर्समध्ये आपण फक्त एखाद्या वेबसाइवर जाऊन ऑनलाइन विविध उत्पादने खरेदी करतो. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा ही काही इ-कॉमर्स साइटची उदाहरणे आहे. सोशल मीडियामुळे शॉपिंग मार्केट आणि खरेदीचा अनुभव पूर्ण बदलून गेला आहे. लाइव्ह कॉमर्सला (Live Commerce) कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी सरकारने नियमावली आणण्याचीही तयारी सुरू केली आहे.

लाइव्ह कॉमर्स म्हणजे काय?(What is live commerce)

लाइव्ह कॉमर्समध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, ऑनलाइन ब्रँड प्रमोशन, सोशल मीडिया सेलिब्रिटी प्रमोशन, लाइव्ह स्ट्रिमींग शॉपिंग, यांचा समावेश होतो. सोशल मीडिया साइटवरून इन्फ्लुएंसरद्वारे अनेक उत्पादने, अॅप्स आणि सेवांचे प्रमोशन केले जाते. व्हिडिओ कंकेटद्वारे उत्पादनांची जाहिरातही केली जाते. अनेक कंपन्यांनी यासाठी इन्फ्लुएंनसर्सबरोबर करारही केले आहेत. या सर्व गोष्टींचा लाइव्ह कॉमर्समध्ये समावेश होतो.

फेसबुक, अॅमेझॉन, मिंत्रा, विविध उत्पादने बनवणाऱ्या कंपन्या सोशल मीडिया सेलिब्रिटीसोबत मिळून उत्पादनांच्या जाहिरातील करतात. मात्र, यावर कोणाचेही नियंत्रण नसते. आतापर्यंत सरकारने फक्त इ कॉमर्स कंपन्यांसाठी नियमावली केली आहे. तसेच टीव्हीवर दिसणाऱ्या जाहिरातींवर नजर ठेवण्यासाठी अॅडव्हर्टायझिंग कौन्सिल ऑफ इंडिया ही संस्था काम करते. मात्र, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अफाट वापराने या गोष्टींवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे आता सरकारने लाइव्ह कॉमर्स या क्षेत्राबाबतही नियमावली तयार करण्यास सुरुवात केली आहे.

लाइव्ह शॉपिंगची सुरुवात चीमधून (When live commerce started)

लाइव्ह कॉमर्स या ट्रेंडची सर्वात प्रथम सुरुवात चीनमध्ये झाली. 2016 साली चिनी रिटेल क्षेत्रातील बलाढ्य कंपनी अलीबाबाने लाइव्ह स्ट्रीम शॉपिंग इव्हेंटचे आयोजन केले होते. पहिल्या तीन मिनिटांमध्ये सुमारे साडेसात बिलियन किंमतीचे व्यवहार या कार्यक्रमाद्वारे झाले होते. युट्यूब, सोशलमीडियाद्वारे व्हिडिओ लाइव्ह स्ट्रीम करून उत्पादनाची माहिती दिली जाते. तसेच लगेच खरेदी करण्यासाठी ऑफर दिली जाते. याला उत्सफुर्तपणे केलेली शॉपिंग असेही म्हणतात. सोशल मीडिया इन्फ्लुएंसरद्वारे उत्पादन आणि सेवांची ब्रँडींग, ग्राहकांमधील जनजागृती, प्रमोशन मोठ्या प्रमाणात होते.