इन्कम टॅक्स विभागाने करदात्यांना त्यांचा टॅक्स भरताना सहजता यावी. तसेच त्यात काही अडथळे येऊ नयेत यासाठी करदात्यांचे (Tax Payer) उत्पन्न आणि त्याचे स्त्रोत यावर आधारित विविध भाग पाडले आहेत. त्यामुळे कोणत्याही नागरिकाला सहज आयटीआर रिटर्न (ITR Return) भरता येऊ शकते, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आयटीआर रिटर्न भरणे आवश्यक आहे. आयटीआर रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे.
इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर आयटीआर भरताना करदात्याला नेमका कोणता फॉर्म भरायचा आहे; याची माहिती असणे गरजेचे आहे. रिटर्न भरताना ITR-1 ते ITR-7 असे 7 प्रकारचे फॉर्म उपलब्ध आहेत. त्यातील तुमच्यासाठी कोणता फॉर्म योग्य आहे. तो जाणून घेऊन त्यानुसार आयटीआर रिटर्न भरणे आवश्यक आहे. यापूर्वी आपण आयटीआर रिटर्न म्हणजे काय? (What is ITR Return?) त्याचे नियम आणि प्रकार समजून घेतले होते. आता आपण ITR मधील ITR-3 या फॉर्मबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
ITR -3 फॉर्म कोणाला लागू होतो?
ITR-3 फॉर्म हा ज्या वैयक्तिक व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबाना (Hindu Undivided Family-HUF) उद्योग आणि व्यावसायातून नफा आणि उत्पन्न मिळते, त्यांना लागू होतो. व्यवसाय किंवा प्रोफेशन काम करणाऱ्यांसाठी, तसेच ज्यांच्या उत्पन्नात घराच्या भाड्यातून मिळणारे उत्पन्न, पगार/पेन्शन, भांडवली नफा आणि इतर स्त्रोतांमधून ज्यांना उत्पन्न मिळते ते ITR-3 फॉर्म भरू शकतात.
ITR-3 ऑनलाईन कसा भरायचा? How to file ITR Online?
इन्कम टॅक्स विभागाने आयटीआर रिटर्न ऑनलाईन (e filling of income tax return) भरण्यासाठी स्वतंत्र वेबपोर्टल स्थापन केले. या वेबपोर्टलवर लॉग-इन करून ऑनलाईन रिटर्नचा पर्याय निवडा. स्टार्ट न्यू फिलिंग करून वैयक्तिक यूझरवर क्लिक करून ITR-3 फॉर्म निवडा. त्यात संपूर्ण माहिती भरा. त्यानंतर बँकेची आणि वैयक्तिक माहिती भरा.
ITR - 3 भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
पॅन कार्ड
आधार कार्ड
बँक खात्याची माहिती
फॉर्म 16 (लागू असल्यास)
गुंतवणुकीची कागदपत्रे/माहिती
अकाऊंट बुक्स