Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ATM Transactions: हो खरंच..! इन्शुरन्स प्रिमियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटसह 'हे' 10 व्यवहार ATM मधून करता येतील

Bank ATM facility

अनेकांना ATM मधून पैसे काढण्याव्यतिरिक्त इतर कोणकोणते व्यवहार करता येतात, याची माहिती नसते. तुम्ही जीवन विमा प्रिमियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटही ATM द्वारे करू शकता. इतर कोणत्या सुविधांचा लाभ ATM द्वारे घेता येईल, ते जाणून घ्या.

ATM Transactions: देशात डिजिटल पेमेंटची संख्या वाढत असल्याने रोख व्यवहारांची संख्या कमी झाली आहे. मात्र, असे असतानाही बँकांकडून एटीएमची संख्या कमी करण्यात आली नाही. कॅश वापरणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तर इतरही असे अनेक व्यवहार आहेत जे ATM द्वारे करता येतात.

अनेकांना ATM मधून पैसे काढण्याशिवाय इतर काय व्यवहार करता येतात, हे माहिती नाही. नागरिकांना माहिती नसणारे 10 व्यवहार कोणते ते या लेखात पाहूया. 

कार्ड ट्रान्सफर

एसबीआय संकेतस्थळावरील माहितीनुसार, तुम्ही एका SBI डेबिट कार्डवरून दुसऱ्या कार्डवर पैसे ट्रान्सफर करू शकता. प्रतिदिन 40 हजार रुपये रक्कम तुम्ही कार्डवरून ट्रान्सफर करू शकता. एसबीआय कार्ड, PIN आणि ज्याला पैसे पाठवणार आहात त्याचा कार्ड नंबर तुम्हाला त्यासाठी लागेल. ऑनलाइन बँकिंग सर्व्हर डाऊन असेल तेव्हा जवळच्या ATM मध्ये जाऊन तुम्ही तत्काळ पैसे ट्रान्सफर करू शकता. 

क्रेडिट कार्ड पेमेंट (व्हिसा) 

ATM द्वारे तुम्ही व्हिसा क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट करू शकता. ऑनलाइन बँकिंगसोबत क्रेडिट कार्ड पेमेंट करण्याचा आणखी एक पर्याय ग्राहकांसाठी आहे. 

जीवन विमा प्रिमियम

बऱ्याच जणांना माहिती नसेल पण ATM द्वारे तुम्ही जीवन विम्याचा प्रिमियम भरू शकता. एचडीएफसी, एलआयसी, एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपन्यांनी इतर बँकांशी याबाबत सहकार्य करार केला आहे. जीवन विम्याचा प्रिमियम ATM द्वारे भरण्यासाठी तुम्हाला पॉलिसी नंबर लागेल. 

चेक बुक विनंती

बँकेच्या शाखेत न जाताही तुम्ही एटीएम द्वारे चेक बुकची विनंती पाठवू शकता. फक्त बँकेकडे पत्ता बरोबर दिला आहे का याची खात्री करा. कारण, तुम्ही दिलेल्या खात्यावर चेक बुक पाठवण्यात येईल. जर पत्ता बदलला असेल तर आधी अपडेट करून घ्या.  

डायनामिक करन्सी कर्व्हर्जन सुविधा

या सुविधेचा फायदा परदेशात जाताना किंवा परदेशी नागरिकांना होऊ शकतो. परकीय चलनात पेमेंट करताना किती शुल्क लागू होऊ शकते, तसेच स्वदेशी चलनात किती रक्कम होते हे ATM द्वारे समजू शकते. त्यास डायनामिक करन्सी कर्व्हर्जन (DCC) असे म्हणतात. 

ATM द्वारे युटिलिटी बिल पेमेंट

काही ठराविक राज्यातील वीज महामंडळाचे पेमेंट तुम्ही ATM द्वारे करू शकता. मात्र, बँक खात्यात जाऊन कोणते बिल पेमेंट करणार आहात त्याची माहिती आधी अपडेट करावी लागेल. 

मोबाइल बँकिंगची नोंदणी

ATM द्वारे तुम्ही मोबाइल बँकिंगची सुविधा अॅक्टिव्हेट करू शकता. तसेच अॅक्टिव्हेट असलेली सुविधा बंदही करू शकता. 

खात्यांतर्गत पैसे ट्रान्सफर करता येतात

तुम्ही एटीएमद्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. तुमच्या  कार्डला जास्तीत जास्त 16 बचत/चालू खाते लिंक करू शकता.  

ATM PIN बदलण्याची सुविधा 

बँकेकडून डेबिट कार्ड पिन बदलण्याची सुविधा ATM द्वारेही दिली जाते. ठराविक कालावधीनंतर तुम्ही डेबिट कार्ड पिन ATM मध्ये जाऊन बदलू शकता. 

अकाऊंट बॅल्सन आणि मिनी स्टेटमेंट सुविधा

ATM मशिनमधून तुम्हाला तुमच्या बँकेचे मिनी स्टेटमेंट मिळू शकते. तसेच खात्यामध्ये किती पैसे शिल्लक आहेत ते सुद्धा समजते. मिनी स्टेटमेंटद्वारे मागील 10 व्यवहार तुम्ही नक्की कोठे केले ते पाहता येते. आता ऑनलाइन बँकिंग अॅपद्वारे स्टेटमेंट पाहणे सोपे झाले असले तरी एटीएमचा आणखी एक पर्याय ग्राहकांकडे आहे.