Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Banking Tips: ऑनलाईन बॅंकिंगसाठी या टिप्स आहेत कामाच्या, खाते राहील सुरक्षित!

Tips for Internet Banking

Online Banking Tips: सध्या बॅंकेविषयी सर्व कामे ऑनलाईन करता येतात. त्यामुळे बॅंकेत जाण्याची सहसा गरज पडत नाही. ही एक आशादायी बाब असली तरी, बॅंकेत ऑनलाईन व्यवहार करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी ऑनलाईन बँकिंगच्या काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.

Online Banking Tips: आता भारतातील बऱ्यापैकी बॅंकांमध्ये पैशांचे व्यवहार ऑनलाईनच करता येतात. त्यामुळे भारताने ऑनलाईन जगताला स्वीकारले आहे. ही गोष्ट खरी असली तरी इंटरनेटच्या सुरक्षेची अजूनही भारतीयांना चिंता आहे. त्यामुळे देखील काही लोक ऑनलाईन आणि मोबाईल बॅंकिंग करायचे टाळतात. तसेच स्कॅमची संख्याही वाढताना दिसत आहे. या गोष्टींवर पर्याय म्हणून तुम्ही जर ऑनलाईन बॅंकिंगच्या या टिप्सचे पालन केल्यास, अशी वेळ कोणावरच येणार नाही.

सगळा खेळ पासवर्डचा

तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असल्यास, तुम्हाला तुमच्या सिस्टिम आणि मोबाईलचा पासवर्ड स्ट्राॅंग ठेवायला लागेल. कारण, हीच सर्वात महत्वाची इंटरनेट बँकिंगची टिप आहे. अशा गोष्टी पासवर्डमध्ये टाका जे तुमच्या लक्षात राहतील जसे की नंबर्स, सिम्बाॅल, आणि अक्षर. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमचा पासवर्ड सेट करता. तेव्हा बहुतेक बॅंका पासवर्ड स्ट्राॅंग आहे की नाही हे सांगतात. तो स्ट्राॅंग असल्यास, तुमचा पासवर्ड स्वीकारला जातो. त्यामुळे स्ट्राॅंग पासवर्ड क्रिएट करा. विशेष म्हणजे त्यात तुमचे नाव, जन्मतारीख या गोष्टी टाकायचे टाळा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते कोणासोबतही शेअर करु नका. तसेच तुमचा पासवर्ड इतर कोणत्याही ब्राउझर किंवा अ‍ॅपवर सेव्ह करू नका.

खात्यावर लक्ष ठेवा

तुम्ही जर वारंवार पैशांचा व्यवहार करत असल्यास, तुमच्या खात्यावर बारीक लक्ष ठेवा. इंटरनेट बॅंकिंगसाठी ही एक महत्वाची टिप आहे, जिच्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे संशयास्पद वाटणाऱ्या व्यवहारांसाठी तुम्ही लगेच तुमचे बॅंक बॅलन्स आणि स्टेटमेंट तपासू शकता. तुम्हाला असे व्यवहार आढळल्यास, त्वरित तुमच्या बॅंकेला संपर्क करा.

सुरक्षित इंटरनेट कनेक्शन

तुम्ही तुमच्या बॅंकिंग खात्यावर सार्वजनिक ठिकाणावरुन लाॅग इन करणे टाळा. कारण, असे केल्यास तुमच्या माहितीचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे सुरक्षित इंटरनेट कनेक्शन वापरा. कुठे प्रवासात असला तर तुमच्या मोबाईलच्या हाॅटस्पाॅटवरून कनेक्ट करा. मोफत असलेल्या वाय-फायवरून खात्यात लाॅग इन करणे टाळा.

SMS अलर्ट ऑन ठेवा

बॅंकेतले व्यवहार लगेच कळण्यासाठी तुम्ही नेट बॅंकिंगद्वारे बॅंकेचे नोटिफिकेशन सुरू करु शकता. यामुळे तुमच्या खात्यासंबंधी सगळे अपडेट तुम्हाला त्वरित मिळतील. त्यामुळे ही सुविधा सुरू करुन घ्यायला विसरू नका. सध्या SMS अलर्टच्या सुविधा तुम्हाला प्रत्येक बॅंकेत मिळतात. त्यामुळे या सुविधेचा लाभ घ्या.

प्रत्येकवेळी लाॅग आउट करा

एकदा तुम्ही मोबाईल किंवा नेटबॅंकिंगवर लाॅग इन केल्यावर, लाॅग आउट करायला विसरू नका. कारण, बरेच जण ही गोष्ट करत नाही. एवढेच नाहीतर जास्तीची खबरदारी म्हणून तुम्ही लाॅग आउट झाल्यानंतर तुमची हिस्ट्री आणि कॅशे क्लिअर करा.

माहिती करू नका शेअर

ऑनलाईन स्कॅम वाढत आहेत त्यामुळे तुमच्या खात्याची माहिती, पासवर्ड, कार्डचा CVV क्रमांक आणि OTP हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या असून इतर कोणासोबतही शेअर करू नका. तसेच, या गोष्टींची मागणी करणारा काॅल आल्यास, त्याला उत्तर देऊ नका. तो स्कॅमर्सचा असू शकतो. 

तसेच, ई-मेल किंवा SMS वर मिळालेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. ती फसवी असू शकते. बॅंक खात्यात लाॅग इन करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ती म्हणजे खाते उघडण्यासाठी नेहमी ब्राउझरच्या अ‍ॅड्रेस लिंकमध्ये बँकेचा URL टाईप करा. त्यामुळे तुम्ही डुप्लिकेट वेबसाईटच्या स्कॅमला बळी पडणार नाही. या सर्व टिप्स लक्षात ठेऊन, तुम्ही ऑनलाईन व्यवहार केल्यास, तुमची फसवणूक टाळता येऊ शकते.