• 24 Sep, 2023 06:53

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

VPA म्हणजे काय? जाणून घ्या, काय आहेत त्याचे फायदे

VPA म्हणजे काय?  जाणून घ्या, काय आहेत त्याचे फायदे

Image Source : www.paytm.com

मोबाईलमधील UPI ॲप्लिकेशनच्या माध्यमातून व्यवहार करत असताना एका विशिष्ट पेमेंट ॲड्रेसचा वापर केला जातो. त्यालाच व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस म्हणजेच VPA म्हणून ओळखले जाते. व्हीपीए हा UPI च्या माध्यमातून बँक खात्याच्या माहिती व्यतिरिक्त व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देणारा तुमचा एक प्रकारचा आयडी आहे.

भारतात ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी युपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. युपीआय सुविधेमुळे डिजिटल पेमेंटची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि जलद झाली आहे. कोणताही युजर क्षणात एखाद्याच्या खात्यावर पैसे पाठवू शकतो अथवा प्राप्त करू शकतो. मात्र, UPI च्या माध्यमातून व्यवहार करत असताना युजरकडे VPA उपलब्ध असणे गरजेचे आहे. तरच तुम्ही पैशाचे व्यवहार करू शकता. नेमके व्हिपीए(VPA) म्हणजे काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेऊयात..

व्हीपीए  म्हणजे काय?

मोबाईलमधील UPI ॲप्लिकेशनच्या माध्यमातून व्यवहार करत असताना एका विशिष्ट पेमेंट ॲड्रेसचा वापर केला जातो. त्यालाच व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस म्हणजेच VPA म्हणून ओळखले जाते. व्हीपीए हा UPI च्या माध्यमातून बँक खात्याच्या माहिती व्यतिरिक्त व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देणारा तुमचा एक प्रकारचा आयडी आहे. ज्याचा वापर करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पैशाचे व्यवहार करू शकता. थोडक्यात UPIचा वापर करून व्यवहार करण्यासाठी युजरचे अनिवार्य असलेली वैध ओळख अथवा नाव म्हणजे तुमचा VPA होय. हा व्हीआय आयडी तुमच्या बँक खात्याशी लिंक करण्यात आलेला असतो. ज्यामुळे व्यवहार करत असताना तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा कोणताही तपशील देण्याची गरज भासत नाही. जसे की बँक खाते क्रमांक, IFSC कोड याची गरज पडत नाही.

व्हीपीए कसा तयार करायचा?

तुम्हाला तुमचा VPA तयार करण्यासाठी तुम्हाला UPI सुविधा देणारे फोन पे- गुगल-पे,  ॲप डाऊनलोड करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा बँक खात्याचा तपशील भरायचा आहे. त्यानंतर UPI अॅपवरती तुम्हाला काही VPA सुचवले जातील. VPI हा तुमचा मोबाईल क्रमांक, तुमचे नाव आणि बँके किंवा अॅपशी संबंधित सांकेतांक अशा स्वरूपात तयार होतो. जसे की 0123456789@ybl, 123456789@UBI सुचवलेल्या VPA म्हणून योग्य वाटेल त्या VPA ची निवड करू शकता. त्यानंतर तो VPA तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचा, त्यानंतर तुमच्या खात्याची पडताळणी पूर्ण होईल. त्यानतंर तुम्ही तुमचा mpin तयार करून UPI च्या माध्यमातून व्यवहार करू शकता.

काय आहेत फायदे?

VPA मुळे युपीआयच्या माध्यमातून व्यवहार करत असताना तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा तपशील देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचा VPA शेअर करून देखील व्यवहार करू शकता. तसेच तुम्हाला जलद व्यवहार करण्याची सुविधा प्राप्त होते. UPI च्या माध्यमातून व्यवहार करत असताना तुम्ही तुमच्या बँक खात्याशी जो VPA लिंक केला आहे. त्याचा वापर करून सहज व्यवहार करू शकता.