फॉर्म 26AS हे एक कर क्रेडिट स्टेटमेंट (Credit Statement) आहे ज्यामध्ये करदात्याच्या वतीने सरकारकडे जमा केलेल्या सर्व करांचा तपशील असतो. हे एक असे क्रेडिट स्टेटमेंट आहे ज्यामध्ये उत्प्नन्नाच्या स्त्रोतावर वजा केलेले कर (TDS- Tax Deducted at Source), उत्प्नन्नाच्या स्त्रोतावर गोळा केलेले कर (TCS-Tax Collected at Source) आणि करदात्याने भरलेला आगाऊ कर यांचा समावेश असतो.
आयकर विभागाने जारी केलेला 26AS हा फॉर्म करदात्यासाठी एकत्रित कर विवरण म्हणून काम करतो. यामध्ये करदात्याच्या वतीने नियोक्ते, बँका आणि इतर वित्तीय संस्थांद्वारे कपात केलेल्या सर्व करांचे तपशील असतात. 26AS फॉर्म हा भारतातील आयकर रिटर्न भरण्यासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. याच विवरणाच्या आधारे करदाता आधी भरलेल्या करांसाठी आयकर विभागाकडे कर क्रेडिटचा दावा करू शकतो.
Dear Taxpayers,
— Income Tax India (@IncomeTaxIndia) April 26, 2023
Excel utilities for ITR 1 & 4 for AY 2023-24 have been enabled. Please refer to the live ticker on the e-filing portal: https://t.co/GYvO3mRVUH
The software/utilities for preparing other ITRs / Forms for A.Y. 2023-24 will be enabled shortly. Information regarding… pic.twitter.com/6Es978U9m2
फॉर्म 26AS मधून करदात्याला त्यांच्या उत्पन्नातून वजा केलेल्या आणि सरकारकडे जमा केलेल्या करांची पडताळणी करण्यास मदत होते. आयकर विभागाद्वारे करदात्याने भरलेल्या करांची तपासणी आणि कर परताव्याची प्रक्रिया करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. हा फॉर्म तुम्ही घरबसल्या मिळवू शकता. त्यासाठी तुम्हांला खाली दिलेल्या स्टेप्सचा अवलंब करावा लागेल.
फॉर्म 26AS डाउनलोड करण्यासाठी, खालील स्टेप्सचे अनुसरण करा:
- आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या - www.incometaxindiaefiling.gov.in
- तुमचा युजर आयडी (जो तुमचा पॅन क्रमांक आहे), पासवर्ड आणि जन्मतारीख वापरून तुमच्या खात्यात लॉग इन करा.
- एकदा तुम्ही लॉग इन केल्यानंतर, "माझे खाते (My Account)" टॅबवर जा तिथे "पहा फॉर्म 26AS (See Form 26 AS)" लिंकवर क्लिक करा.
- तुमच्यासमोर आता TDS-CPC वेबसाइटवर ओपन होईल.
- तुम्ही ज्या आर्थिक वर्षातील फॉर्म 26AS पाहू इच्छित असाल ते आर्थिक वर्ष निवडा.
- हा फॉर्म HTML किंवा PDF स्वरूपात पाहण्यासाठी आवश्यक तो पर्याय निवडा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी प्रविष्ट करा आणि "See/Download" बटणावर क्लिक करा.
- आता तुम्हाला फॉर्म 26AS तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- तुम्ही आता फॉर्म डाउनलोड करू शकता आणि आवश्यकता असल्यास त्याची प्रिंटआउट देखील घेऊ शकता.
फॉर्म 26AS मध्ये नमूद केलेले तपशील बरोबर आहेत का आणि करदात्याने केलेल्या व्यवहारांशी ते जुळत असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. कर भरणामध्ये कोणतीही तफावत असल्यास ती दुरुस्त करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्या. फॉर्म 26AS आयकर रिटर्न भरताना एक संदर्भ म्हणून वापरला जाऊ शकतो.हा कर भरणा करण्यासाठी हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.