Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

फ्लिपकार्ट पे लेटर म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

फ्लिपकार्ट पे लेटर म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Flipkart Pay Later : फ्लिपकार्ट पे लेटर सुविधा ही पूर्णत: ग्राहकांच्या सोयीसाठी फ्लिपकार्टने आणली आहे. या सुविधेचा आधार घेत तुम्ही तुमचे प्रोडक्ट निवडून चेकआऊट करून आणि कोणत्याही ओटीपी किंवा पेमेंटशिवाय ते प्रोडक्ट घरपोच मिळवू शकता.

फ्लिपकार्ट पे लेटर (Flipkart Pay Later) ही अशी एक  ग्राहक केंद्रित सुविधा आहे; जी फ्लिपकार्टवर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देते आणि त्याला त्याच्या ऑनलाईन खरेदीतून चिंतामुक्त करते. फ्लिपकार्टवर खरेदी करताना ग्राहकांना डेबिट कार्ड, ईएमआय, नो कॉस्ट ईएमआय आणि बायबॅक गॅरंटीच्या सुविधांचा फायदा मिळत होता. आता फ्लिपकार्टने यापुढे जात ग्राहकांच्या सोयीसाठी पे लेटर (Pay Later) ही सेवा ऑनलाईन खरीदीसाठी आणली आहे. फ्लिपकार्टच्या नियमित ग्राहकांना या सेवेचा लाभ दिला जात आहे. दिवसेंदिवस या सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. चला तर जाणून घेऊया फ्लिपकार्ट पे लेटर कसं काम करतं?

फ्लिपकार्ट पे लेटर कसे काम करते?

फ्लिपकार्ट पे लेटर सुविधा ही पूर्णपणे ग्राहकांच्या सोयीप्रमाणे काम करते. तुम्ही तुमचे प्रोडक्ट निवडा, चेकआऊट करा आणि कोणत्याही ओटीपी किंवा पेमेंटशिवाय तुम्ही ते प्रोडक्ट घरपोच मिळवू शकता. त्याचा अनुभव घेतल्यानंतर पुढच्या महिन्यात एकत्रितपणे सर्व प्रोडक्ट्सची किंमत चुकती करू शकता. तर फ्लिपकार्ट पे लेटर हे इतंक सोप्पं आहे.

भारतातील कोणत्या भागात तुम्ही राहत असला तरी तुम्हाला आता खरेदी करण्याची चिंता राहिलेली नाही. आणि हा मुद्दा ही तितकासा महत्त्वाचा राहिलेला नाही. कारण ऑनलाईन ॲपवरून तुमच्या घराजवळच आता किरणामालाचे दुकान आले आहे. जे सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घरी आणून देतं आणि त्याची नोंदही ठेवते. तसेच तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्याचे पैसे भरू शकता. ही खरेदी ग्राहकांना अधिक सुलभ व्हावी. यासाठी फ्लिपकार्टने अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. फ्लिपकार्टने कॅश ऑन डिलिव्हरी, नो कॉस्ट ईएमआय आणि बायबॅंक गॅरंटीबरोबरच ग्राहकांसाठी एक नवीन पर्याय आणला आहे. तो म्हणजे फ्लिपकार्ट पे लेटर.


फ्लिपकार्ट पे लेटर काय आहे? What is Flipkart Pay Later?

फ्लिपकार्ट पे लेटर ही फ्लिपकार्टची ग्राहक-केंद्रित नवीन योजना आहे; जी ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांचा वेगवेगळ्या मार्गांनी फायदा होईल, अशा पद्धतीने काम करते. पे लेटर या सुविधेद्वारे ग्राहकाला महिन्याभरात फ्लिपकार्टवर आपल्या आवडीची खरेदी करण्यासाठी 1 लाखांपर्यंतची क्रेडिट ऑफर दिली जाते. इथे तुम्हाला महिन्याच्या शेवटी सर्व खरेदीवर एकच बिल दिले जाणार. जे तुम्ही महिन्याच्या शेवटी किंवा ईएमआयद्वारे 12 महिने भरू शकता. यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुम्ही जी वस्तू प्लिपकार्टवरून घेतली आहे; त्याचा वापर केल्यानंतर किंवा आनंद घेतल्यानंतर तुम्हाला त्याचे पैसे द्यायचे आहेत.

यात ग्राहकांचा फायदा काय आहे?

ग्राहक फ्लिपकार्ट पे लेटर या पेमेंट पर्यायाचा वापर करून तीन प्रकारच्या सुविधांचा लाभ मिळवू शकतात.

क्रेडिट लाईन (Credit Line)

फ्लिपकार्ट पे लेटर या सुविधेचा लाभ घेऊन तुम्ही 1 लाखापर्यंतचं क्रेडिट मिळवून फ्लिपकार्टवर खरेदी करू शकता. तसेच तुम्ही खरेदी केलेल्या वस्तुंचा अनुभव घेऊन महिन्याभराने किंवा 12 महिन्यांच्या ईएमआयने, तुमच्या सोयीनुसार त्याचे पैसे भरू शकता.

इन्स्टंट खरेदी (Instant Buy)

फ्लिपकार्ट पे लेटर सुविधेचा वापर करून तुम्ही अक्षरश: एका क्लिकवर कोणतंही प्रोडक्ट खरेदी करू शकता.

एकत्र पेमेंट (Bunch up payments)

तुम्ही या सुविधेद्वारे कितीही वेळा आणि कितीही किमतीच्या प्रॉडक्टसची खरेदी करू शकता आणि यासाठी तुम्हाला पे लेटर सुविधेतून एकदाच पेमेंट करावे लागेल.

Flipkart PAY LATER

फ्लिपकार्ट पे लेटर पेमेंटचा पर्याय कोण वापरू शकतो?

फ्लिपकार्ट पे लेटर पेमेंटचा पर्याय हा अशा ग्राहकांसाठी आहे; ज्या ग्राहकांना रोख रकमेतून व्यवहार करणं आवडत नाही. तसेच ज्यांना डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करताना व्हेरिफिकेशन करण्यासाठी वेळ नाही. अशा ग्राहकांसाठी फ्लिपकार्ट पे लेटरचा पर्याय योग्य ठरू शकतो. तसेच इथे ग्राहक त्याच्या आवडीनुसार मनसोक्त खरेदी करून पुढच्या महिन्यात बिल भरू शकतो.

Pay Later सुविधा कशी मिळवावी (1)

फ्लिपकार्ट पे सुविधा वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा!

फ्लिपकार्ट पे लेटर पर्यायाचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टींचा लाभ मिळवू शकता. पण या सुविधेचा वापर करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसे की, तुमची शिल्लक राहिलेली रक्कम तुम्हाला एकाचवेळी भरणं गरजेचं आहे. तिथे तुम्ही टप्प्याटप्प्याने पैसे भरू शकत नाही. तसेच जास्तीचे पैसे सुद्धा भरू शकत नाही. कारण इथे वॉलेटची सुविधा नाही. तुमची थकबाकी शिल्लक राहिली असेल तर तुम्हाला वेळोवेळी सुचित केले जाते. तेव्हा तुम्हाला संपूर्ण रक्कम भरणे आवश्यक आहे. सध्या ही सुविधा फक्त मोबाईल ॲप आणि मोबाईल साईटवर उपलब्ध आहे. लवकरच ही सुविधा डेस्कटॉपवर सुरू करण्यात येणार आहे.

Image Source: flipkart.com