• 28 Nov, 2022 18:11

What is Equity Investment? इक्विटी गुंतवणूक म्हणजे काय?

Investment in Equity

प्रत्येकाला चांगले जीवन जगण्यासाठी पैशांची गरज भासत असते. तो कधीही कमी पडू नये यासाठी वेळोवेळी बचत ही केली जाते. अशा बचतीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आज आपण यातील इक्विटी गुंतवणुकीबद्दल (Equity Investment) जाणून घेणार आहोत.

आपल्या प्रत्येकाला पावला पावलावर जीवन जगण्यासाठी पैशांची गरज भासत असते. तो कधीही कमी पडू नये यासाठी अनेकजण वेळीच बचत करण्यास सुरुवात करतात. अशा प्रकारच्या बचतीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक असणाऱ्या इक्विटी गुंतवणूक म्हणजे काय याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला गुंतवणूक करणं सोपं होऊ शकेल.

इक्विटी गुंतवणूक (Equity Investment)

मराठीत इक्विटी म्हणजे शेअर किंवा तुमचा हिस्सा किंवा तुमची मालकी होय. जर तुम्ही एखाद्या कंपनीत पैसे गुंतवले असतील आणि तुम्ही त्या कंपनीचे काही शेअर्स विकत घेतले असतील. तर याचा अर्थ असा की, त्या कंपनीत तुमची हिस्सेदारी किंवा मालकी आहे म्हणजेच इक्विटी होय. याचा अर्थ तुम्ही त्या कंपनीच्या काही भागाचे मालक आहात. 

शेअर मार्केटमध्ये इक्विटी म्हणजे काय? What is Equity in Share Market?

एका प्रकारे इक्विटी ही कंपनीमध्ये तुमची मालकी असते. या मालकीला आपण मालकी हक्क म्हणतो. व्यवसाय सुरू करताना तुम्ही गुंतवलेली रक्कम म्हणजेच इक्विटी होय. यामध्ये म्हणजेच व्यापारात तुमची इक्विटी टक्केवारीनुसार बदलू शकते. परंतु कोणताही व्यवसाय चालवण्यासाठी तुम्हाला इक्विटी सोबतच कर्ज घ्यावे लागते. इक्विटी असलेल्या पैशाला इक्विटी कॅपिटल म्हणतात आणि कर्जाच्या रकमेला दायित्व असे म्हणतात. 


इक्विटी मार्केट म्हणजे काय? What is Equity Market?

शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केटला 'इक्विटी मार्केट' असेही म्हटले जाते. जेव्हा एखादी कंपनी आपले समभाग गुंतवणूकदारांना जारी करते, तेव्हा त्या समभागांना इक्विटी असे म्हटले जाते. याचाच अर्थ इक्विटी म्हणजे फक्त शेअर्स असतो त्यापेक्षा अधिक काही नाही. जेव्हा तुम्ही शेअर बाजारात एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेता किंवा विकता तेव्हा असे म्हणतात की, तुम्ही कंपनीत इक्विटी घेतली आहे. स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध असलेली कंपनी गुंतवणूकदारांना इक्विटी जारी करते. जेणेकरून गुंतवणूकदार किंवा व्यापारी त्यांच्या कंपनीमध्ये भागधारक बनू शकतात. यामुळे इक्विटी देण्याऐवजी कंपनीकडे अधिकाधिक पैसा येईल आणि कंपनीला निव्वळ नफा वाढवण्यास मदत होईल.

इक्विटी ट्रेडिंग म्हणजे काय? What is Equity Trading?

जेव्हा व्यापारी एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करतात तेव्हा त्याला इक्विटी ट्रेडिंग म्हणतात. इक्विटी ट्रेडिंग मुख्यतः स्पॉट मार्केट किंवा कॅश मार्केट आणि फ्युचर्स मार्केटमध्येच होते. कॅश मार्केटमध्ये तुम्ही कोणत्याही स्टॉकची डिलिव्हरी घेऊ शकता, तर फ्युचर्स मार्केटमध्ये, जर तुम्ही आज एखाद्या कंपनीचे फ्यूचर विकत घेतले असेल, तर तुम्ही ते एका विशिष्ट तारखेला खरेदी किंवा विक्री करू शकता. कारण तशा प्रकारचा करार तुमच्याशी केलेला असतो. ज्याला फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असे संबोधले जाते.

शेअर आणि इक्विटीमध्ये काही फरक आहे का? What is difference between Share & Equity?

नाही, शेअर आणि इक्विटीमध्ये फरक नाही. तुम्ही जेव्हा एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीत इक्विटी विकत घेतल्याचे म्हटले जाते, म्हणूनच या दोघांमध्ये काही फरक नाहीये.