Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रिप्टो क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

Crypto Credit Card Rewards

Image Source : Blockfi.com

क्रिप्टो क्रेडिट कार्ड (Crypto Credit Card) हे एक प्रकारचे रिवॉर्ड क्रेडिट कार्ड आहे; जे तुम्हाला प्रत्येक व्यवहारांवर कॅशबॅक किंवा इतर ऑफर्सऐवजी क्रिप्टोकरन्सी देतात. क्रिप्टो क्रेडिट कार्ड हे सामान्य क्रेडिट कार्डसारखेच असतात.

सध्या कोणत्याही प्लॅस्टिक कार्ड्सवर (Plastic Cards) खरेदी केली की, रिवॉर्ड्स देण्याची पद्धत आहे. रिवॉर्ड्स म्हणजे प्रत्येक व्यवहारांवर ग्राहकाला वेगवेगळ्या ऑफर्स, कॅशबॅक, फ्री ट्रॅव्हल असे रिवॉर्ड्स (Rewards) दिले जातात. आता या रिवॉर्ड्समध्ये क्रिप्टोकरन्सीचा ही सहभाग होऊ लागला आहे. त्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी क्रिप्टो क्रेडिट कार्डचा (Crypto Credit Card) सर्रास वापर केला जाऊ लागला. हे कार्ड्स खासकरून क्रिप्टो ब्रोकर्स आणि एक्सचेंजेसद्वारे ऑफर केले जात आहेत. चला तर जाणून घेऊयात काय आहे क्रिप्टो क्रेडिट (Crypto Credit) आणि आपण यातून क्रिप्टोकरन्सी रिवॉर्ड्स (Cryptocurrency Rewards) कसे मिळवू शकतो.

क्रिप्टो क्रेडिट कार्ड म्हणजे काय? What is Crypto Credit Card?

क्रिप्टो क्रेडिट कार्ड (Crypto Credit Card) हे एक प्रकारचे रिवॉर्ड क्रेडिट कार्ड आहे; जे तुम्हाला प्रत्येक व्यवहारांवर कॅशबॅक किंवा इतर ऑफर्सऐवजी क्रिप्टोकरन्सी देतात. क्रिप्टो क्रेडिट कार्ड हे सामान्य क्रेडिट कार्डसारखेच असतात. क्रिप्टो क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड (Credit Card) यामध्ये फक्त रिवॉर्ड्सचाच फरक असतो. क्रिप्टो क्रेडिट कार्ड हे साधारणपणे को-ब्रॅण्डेड क्रेडिट कार्ड्स असतात. म्हणजेच हे क्रेडिट कार्ड्स बॅंकेद्वारे जारी केले जातात. पण याची मार्केटिंग ठराविक ब्रॅण्ड्सद्वारे केली जाते. अनेकवेळा हे ब्रॅण्ड्स इन्वेस्टमेंट कंपनी किंवा क्रिप्टो एक्सचेंजेस (Brand Investment Firms & Crypto Exchanges) असतात. उदाहरणार्थ, BlockFi Rewards Visa Signature Credit Card. हे कार्ड इव्हॉल्व्ह बॅंक अण्ड ट्रस्ट (Evolve Bank and Trust)द्वारे वितरित केले जातात आणि याचं मार्केटिंग BlockFi द्वारे केलं जातं. या कार्डच्या वापरावर मिळालेले रिवॉर्ड्स BlockFi च्या खात्यामध्ये जमा होतात.


क्रिप्टो रिवॉर्ड्स क्रेडिट कार्ड कसे काम करतात?

क्रिप्टो रिवॉर्ड्स क्रेडिट कार्ड (Crypto Reward Credit Card) हे रिवॉर्ड क्रेडिट कार्डप्रमाणेच वेगवेगळ्या व्यवहारांसाठी (Transactions) वापरले जाते. पण या व्यवहारांवर खरेदीदाराला कॅशबॅक किंवा ट्रॅव्हल रिवॉर्ड्स (Cashback or Travel Rewards) मिळत नाही. त्याऐवजी कार्डधारकाला मिळालेले रिवॉर्ड्स हे क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी वापरले जातात. खरेदी केलेले हे कॉईन्स क्रिप्टो अकाउंटमध्ये (Crypto Account) जमा केले जातात. तुमच्याकडे ज्या प्रकारचे कार्ड असेल त्या प्रकारची क्रिप्टोकरन्सी तुमच्या खात्यामध्ये जमा होते. प्रत्येक क्रिप्टो क्रेडिट कार्डची एक ठराविक क्रिप्टोकरन्सी लिस्ट असते. आता तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की, यातून किती क्रिप्टोकरन्सी मिळतील? हे पूर्णपणे रिवॉर्ड रेट आणि क्रिप्टोकरन्सीच्या बाजारभावावर अवलंबून असते. इतर रिवॉर्ड कार्डप्रमाणे तुम्हाला क्रिप्टोकार्डवर ठराविक खरेदीवर बोनस मिळतो.

क्रिप्टो क्रेडिट कार्ड घ्यावे का?

क्रिप्टो रिवॉर्ड कार्ड्स हे अशा लोकांसाठी योग्य ठरू शकते; जे अगोदरपासून क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये सहभाग आहेत. क्रिप्टोकरन्सी मार्केट हे खूप अस्थिर (Volatile) असते. त्यामुळे क्रिप्टो क्रेडिटकार्डमधून मिळणारे रिवॉर्ड्ससुद्धा अस्थिर असतात. कार्डधारकाला मिळालेल्या क्रिप्टो रिवॉर्ड्सचे मूल्य कधीही कमी होऊ शकते किंवा ते जाऊ शकते. क्रिप्टो क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्समध्ये क्रिप्टोकरन्सी मिळत असल्याने क्रिप्टोकरन्सीसोबत टॅक्स आणि टॅक्समधील गुंतागुंतीच्या प्रक्रियेलासुद्धा सामोरे जावे लागते. इतर साधारण रिवॉर्ड्सवर मात्र कोणताही टॅक्स (Tax on Crypto Rewards) लागत नाही. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी रिवॉर्ड मिळताना किंवा ते विकताना कार्डधारकाला टॅक्सपण पाहावा लागणार आहे.