Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NIL रिटर्न म्हणजे काय? ते कधी आणि कोणी दाखल करावे?

tax return deadline

झिरो रिटर्न फाईल (zero return filing) करणे म्हणजे, इन्कम टॅक्स विभागाला या आर्थिक वर्षात माझ्याकडे कोणतेही करपात्र उत्पन्न नाही, हे सांगणे असते.

तुमचे एका वर्षातील एकूण उत्पन्न टॅक्समधून वगळलेल्या कमाल रकमेपेक्षा, म्हणजे 2.5 लाख रूपये असल्यास तुम्हाला कोणताही टॅक्स लागू होत नाही. म्हणजे तुमचे कर दायित्व शून्य (No Tax Liability) आहे. याचा अर्थ, तुम्हाला कोणतेही कर दायित्व नसल्याने तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न हे शून्य रिटर्न किंवा झिरो रिटर्न (ZERO File or NIL Return) आहे, असे म्हटले जाते. आपल्याकडे झिरो रिटर्न फाईल करण्याची सुद्धा पद्धत आहे. झिरो रिटर्न फाईल करणे म्हणजे, इन्कम टॅक्स विभागाला या आर्थिक वर्षात माझ्याकडे कोणतेही करपात्र उत्पन्न नाही, हे सांगणे असते.


NIL रिटर्न का आणि कोणी दाखल करावे? 

व्हिसा किंवा पासपोर्टसाठी अर्ज करताना आता इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Return) आवश्यक आहे. तसेच जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर आयटीआर रिटर्न महत्त्वाचे आहे. जीवनात कोणत्या टप्प्यावर कधी कर्जाची गरज भासेल हे सांगता येत नाही. ऐनवेळी लागणाऱ्या कर्जाची पूर्वतयारी म्हणून ही चांगली सवय ठरू शकते.

तुम्ही रेग्युलर रिटर्न फाईल करत आहात. पण यावर्षी तुमचे उत्पन्न टॅक्स मर्यादेपेक्षा कमी आहे. तरीही तुम्ही आयटीआर रिटर्न (ITR Return) भरले पाहिजे. कारण यामुळे तुम्हाला तुमच्या इन्कम टॅक्सची हिस्ट्री याचा आढावा घेणं सोपं ठरू शकतं.

एखाद्याचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्यास त्याला झिरो रिटर्न (Nil Return) फाईल करण्याची आवश्यकता नाही. पण एखाद्या व्यक्तीचे करपात्र उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असले तरी आणि त्या व्यक्तीने गेल्या वर्षी ITR Return भरलेला असल्यास त्याला झिरो रिटर्न भरण्याची शिफारस केली जाते. कारण, तुम्ही करपात्र मर्यादेखाली नसला तरीही, इतर उत्पन्नांच्या स्रोतावर तुमचा टॅक्स कापला जाऊ शकतो. जसे की बँक 10,000 रूपयांपेक्षा जास्त व्याजावर TDS कापते. आणि तो कापलेला टीडीएस पुन्हा मिळवण्यासाठी तुम्ही पात्र आहात. त्यासाठी NIL रिटर्न फाईल करणे, उपयोगी ठरते.

याचबरोबर, ज्यांची परदेशात मालमत्ता आहे किंवा तिकडे बॅंकेत खातं आहे. अशा व्यक्तींनी त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असले तरीही त्यांनी रिटर्न भरणे फायद्याचे ठरू शकते. त्याचप्रमाणे, जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करता. तेव्हा तिथे भांडवली नफा कव्हर करण्यासाठी भांडवली तोटा वापण्याची सुविधा (carried forward losses) असते. पण याचा वापर करण्यासाठी तुम्हाला रिटर्न भरणे आवश्यक आहे.

Benefits of ITR Return

NIL टॅक्स रिटर्न कसे भरायचे? 

NIL किंवा ZERO टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया ही नियमित ITR फाईल करण्यासारखीच असते. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याचे तपशील, फॉर्म 16 आणि गुंतवणुक केलेली कागदपत्रे इत्यादी माहिती आवश्यक असते. ऑनलाइन ई-फायलिंग करणं हे आता खूपचं सोप्पं झालं आहे. पुढे दिलेल्या टप्प्यांचा वापर करून तुम्ही सहज ई-फायलिंग करू शकता.

1. इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर लॉग इन करा 
2. लॉग इन केल्यानंतर योग्य ITR फॉर्म निवडा 
3. त्यात तुमची उत्पन्नाची आणि टॅक्सशी संबंधित माहिती भरा. 
4. त्यानंतर भरलेले रिटर्न सबमिट करा.
5. रिटर्न फाईल सबमिट केल्यानंतर ते व्हेरिफाय करण्यास विसरू नका. 

NIL इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे फायदे 

1.जर एखाद्याने आयटीआर रिटर्न भरला नसेल तर त्याला त्याच्या उत्पन्नाच्या स्रोताचे स्पष्टीकरण सांगताना नाकीनऊ येऊ शकते. रिटर्न फाईल केल्याने ते उत्पन्नाच्या स्त्रोताला कायदेशील मान्यता मिळते. तसेच ITR मुळे मिळालेल्या उत्पन्नाचा कायदेशीर पुरावा तयार होतो. 

2. फ्री-लान्सर पद्धतीने काम केल्यास पगाराची स्लिप, फॉर्म 16 मिळणं अवघड होतं. परिणामी बॅंकेत उत्पन्न दाखवताना अडचण येते. म्हणून रिटर्न फाईल करणं हा उत्पन्नाचा पुरावा म्हणून चांगला पर्याय ठरू शकतो.

3. ज्यांचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असते त्यांना नेहमी असे वाटते त्यांच्यावर कर परतावा भरण्याची वेळ येणार नाही. कारण त्यांच्यावर कोणताही टॅक्स लागत नाही. पण रिटर्न फाईल करून ते उत्पन्नाचा कायदेशीर पुरावा मिळवू शकतात. जो त्यांना बॅंकेतून कर्ज घेताना उपयोगी ठरू शकतो. 

4.जेव्हा तुम्ही उच्च जीवन विमा पॉलिसी विकत घेता किंवा कर्जासाठी अर्ज करता, तेव्हा विमा कंपनी तुम्हाला मिळणाऱ्या कव्हरेजची रक्कम ठरवण्यासाठी उत्पन्नाचा पुरावा विचारते. अशावेळी मागील 3 वर्षांतील बँक स्टेटमेंट किंवा आयटीआर रिटर्न आवश्यक ठरतं.

म्हणून एखाद्याचे शून्य रिटर्न असले तरी त्याने आयटीआर फाईल करणं हे त्याच्यासाठी फायद्याचं आहे. ज्यांचं उत्पन्न कमी आहे, ते वरील अडचणी टाळण्यासाठी NIL रिटर्न फाईल करू शकतात.