Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is AIS?: एआयएस म्हणजे काय? आयकर नोटिशीपासून कसं करतं संरक्षण?

What is AIS?: एआयएस म्हणजे काय? आयकर नोटिशीपासून कसं करतं संरक्षण?

Image Source : www.businesstoday.in

What is AIS?: आयकर भरण्याचे सध्या दिवस सुरू आहे. विविध कंपन्यांनी 15 जूननंतर आपल्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 देण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून तुम्हाला कर बचतीसंदर्भात काही कागदपत्रे सादर करावी लागत असतात. यात महत्त्वाच्या बाबी म्हणजे एआयएस आणि टीआयएस...

नोकरदारांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयकर रिटर्न (Income tax return) भरणं होय. आयकर भरणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावेळी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 आहे. त्यामुळे नोकरदार तसंच इतर आयकर रिटर्न भरणाऱ्या नागरिकांना हे काम डेडलाइन जवळ येण्याआधी करून घेणं गरजेचं ठरतं. 

केवळ फॉर्म 16 चालणार नाही

आयकर भरताना काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं असतं. कारण एखादी छोटीशी चूक जरी तुमच्याकडून झाली तर आयकर विभाग तुम्हाला आयकर नोटीस पाठवू शकतो. यामुळेच करदात्यांना रिटर्न भरण्यापूर्वी काही महत्त्वाची कागदपत्रे व्यवस्थित तपासून घेण्याच्या सूचना दिल्या जात असतात. अशा परिस्थितीत पगारदार करदात्यांना फॉर्म16 अत्यंत उपयुक्त ठरत असतो. दुसरीकडे, जर तुम्ही पगाराच्या शिवाय इतर मार्गांनी कमाई करत असाल तर मात्र फॉर्म 16 तुम्हाला मदत करणार नाही.

कोणती कागदपत्रे गरजेची?

पगाराच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्रोतातून उत्पन्न असेल तर त्या बाबतीत तुम्हाला इतर काही कागदपत्रांचीदेखील आवश्यकता भासेल. या कारणास्तव आयकर विभाग करदात्यांना एआयएस (AIS) आणि टीआयएस (TIS) तपासण्याची सूचना देतं. आयकर विभाग यासाठी आता प्रत्येक करदात्याला एआयएस आणि टीआयएसमध्ये अ‍ॅक्सेस देतं. आयटीआर फायलींगची प्रक्रिया आधिकाधिक पारदर्शक करण्याच्या हेतूने त्याचबरोबर करदात्यांना सेल्फ-फाइलिंग करणं जास्त सोपं जावं यासाठी विभागानं या दोन्ही गोष्टींची सुविधा दिली आहे. या दोन्ही दस्तावेजांमुळे आयकर रिटर्न भरणं अधिक सुलभ तर झालं आहेच मात्र त्यासोबतच त्यातल्या गुंतागुंती किंवा चुकांचं प्रमाणही कमी झालं आहे. 

काय आहे एआयएस आणि टीआयएस?

एआयएस आणि टीआयएस ही संकल्पना आयकर रिटर्नमध्ये महत्त्वाची आहे. त्यामुळे ती समजून घेणं गरजेचं आहे. एआयएस म्हणजे वार्षिक माहिती विधान (Annual Information Statement) तर टीआयएस म्हणजेच करदात्याची माहिती सारांश (Taxpayer Information Summary). एआयएस आणि टीआयएस करदात्यांनी मिळवलेल्या विविध प्रकारच्या सर्वच उत्पन्नाचा तपशील ठेवतात. 

विविध स्त्रोतांचा तपशील

तुम्ही बचत खातं (Saving Account Interest Income) किंवा आवर्ती आणि मुदत ठेव उत्पन्नातून (Recurring and Fixed Deposit Income) व्याजाच्या स्वरूपात कमावलं असेल, सिक्युरिटीज व्यवहारांसह लाभांश रक्कम (Income From Dividend) किंवा म्युच्युअल फंडातून (Mutual Fund) उत्पन्न मिळवलं असेल, तर हे सर्व तपशील या कागदपत्रांमध्ये असतात. 

करपात्र रकमेची माहिती 

करदात्यांना एआयएसमध्ये करपात्र रकमेची एकरकमी माहिती मिळत असते. एआयएसमध्ये तुम्हाला पगाराशिवाय इतर कोणत्याही माध्यमातून मिळणार्‍या प्रत्येक उत्पन्नाचे डिटेल्स मिळतात. जो आयकर कायदा 1961 अंतर्गत समाविष्ट आहे. म्हणजे करपात्र श्रेणीत येणाऱ्या प्रत्येक उत्पन्नाची माहिती त्यात उपलब्ध असेल.

कसं डाउनलोड करावं एआयएस आणि टीआयएस? 

  • आयकर फाइलिंग पोर्टल (www.incometax.gov.in) ओपन करावं.
  • पॅन नंबर, पासवर्डच्या मदतीनं लॉग इन करावं.
  • वरच्या मेनूमधल्या Service टॅबवर जावं.
  • ड्रॉपडाउनमधून 'Annual Information Statement (AIS)' निवडावं.
  • तुम्ही Proceed वर क्लिक करताच एक वेगळी विंडो उघडेल.
  • नवीन वेबसाइटवर एआयएसचा पर्याय निवडावा.
  • आता तुम्हाला AIS आणि TIS दोन्ही डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल.
  • तुम्ही AIS आणि TIS PDF किंवा JSON फॉरमॅटमध्ये डाउनलोड करू शकता.