Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

महिलांसाठी टॅक्स स्लॅब काय आहे?

महिलांसाठी टॅक्स स्लॅब काय आहे?

आर्थिक वर्ष 2011-12 पर्यंत महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक कर सवलत मिळत होती. पण 2012-13 पासून महिला आणि पुरुषांच्या उत्पन्नावर समान टॅक्स आकारण्यात येऊ लागला आहे.

सरकार प्रत्येक आर्थिक वर्षासाठी नवीन आयकर दर ठरवत असते. हा दर पुढील वर्षासाठी सरकारला सोसावा लागणार्‍या खर्चाच्या अंदाजपत्रकावर आधारित असतो. अर्थसंकल्पामध्ये घोषित केलेल्या स्लॅबनुसार करदात्यांनी त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या रकमेवर आधारित टॅक्स भरणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स विभागाने घोषित केल्यानुसार, महिला आणि पुरुषांच्या उत्पन्न गटावर समान पद्धतीने कर आकारला जातो.

2011 - 12  या आर्थिक वर्षापर्यंत महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक कर सवलत मिळत होती. पण 2012 - 13  पासून महिला आणि पुरुषांच्या उत्पन्नावर समान कर आकारण्यात येऊ लागला. सध्याच्या टॅक्स स्लॅबनुसार 2.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. 2020-21 च्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा महिलांसाठी वेगळी टॅक्स मर्यादा नव्हती. पण 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नाला टॅक्स रिबेट मिळत असल्याने त्या उत्पन्न गटातील महिलांना टॅक्स भरायची गरज नव्हती. आतासुद्धा हा नियम लागू आहे.  

ज्या महिलांचे वय 60 पेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी टॅक्स स्लॅब

  • 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर टॅक्स लागू नाही
  • 2.5 ते 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के टॅक्स लागू
  • 5 ते 10 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के टॅक्स लागू 
  • 10 ते 50 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स लागू 
  • 10 लाखाच्यावर 1 कोटीपर्यंतच्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स + 10 टक्के अधिभार
  • 1 कोटीपेक्षा जास्त रूपयांच्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स + 15 टक्के अधिभार

60 ते 80 वयोगटातील ज्येष्ठ महिलांसाठी (Senior women)

  • 3 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर टॅक्स लागू नाही 
  • 3 ते 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के टॅक्स लागू
  • 5 ते 10 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के टॅक्स लागू
  • 10 ते 50 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स लागू
  • 50 लाख ते 1 कोटीपेक्षापर्यंतच्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स + 10 टक्के अधिभार
  • 1 कोटीपेक्षा जास्त रूपयांच्या उत्पन्नावर 30 टक्के +15 टक्के अधिभार
    * टॅक्स लागलेल्या रकमेवर अतिरिक्त 4 टक्के आरोग्य व शिक्षण उपकर लावला जातो.

80 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ महिलांसाठी (Super Senior women)

  • 5 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर टॅक्स लागू नाही 
  • 5 ते 10 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के टॅक्स लागू
  • 10 ते 50 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स लागू 
  • 50 लाख ते 1 कोटीपर्यंतच्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स + 10 टक्के अधिभार
  • 1 कोटीपेक्षा जास्त रूपयांच्या उत्पन्नावर 30 टक्के + 15 टक्के अधिभार
    * टॅक्स लागलेल्या रकमेवर अतिरिक्त 4 टक्के आरोग्य व शिक्षण उपकर लावला जातो.

टॅक्स लागू असलेल्या महिला आपापल्या वयोमानानुसार जुन्या आणि नवीन करप्रणालीपैकी एक पर्याय निवडून त्यानुसार इन्कम टॅक्स फाईल करू शकतात. जुनी किंवा नवीन करप्रणाली निवडण्याचा पर्याय एकदाच निवडता येतो.