व्यवसाय कर्ज योजना: सरकार छोटे-मोठे उद्योग करणाऱ्यांना व लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कर्ज योजना राबवत आहे. सरकारने लघुउद्योजकांसह रस्त्यावरील फेरीवाल्यांसाठीही कर्जाची योजना सुरू केली. एकूणच उद्योग-धंदा सुरू करणाऱ्यांना सरकारकडून प्रोत्साहन मिळत आहे. काही वर्षापूर्वी सुरू केलेली प्रधानमंत्री मुद्रा योजनेला नागरिकांना चांगला प्रतिसाद दिला. या व्यतिरिक्त इतरही बर्याच योजना सरकार राबवत आहे. सध्याच्या घडीला केंद्र व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांनुसार स्वत: व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 हजारांपासून 10 लाखांपर्यंत कर्ज दिले जात आहे.
सध्याचा काळ सर्वांसाठी खूपच ताणतणावाचा आहे. जागतिक मंदीमुळे अनेकांच्या नोकरींवर गदा आली आहे. तर काही जण नोकरीत मेहनत करूनही पुरेसा पैसा मिळत नाही म्हणून नाराज आहेत. सतत डोक्यावर आर्थिक संकटाची टांगती तलवार असणाऱ्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची चांगली संधी सरकारकडून दिली जात आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची अडचण असणाऱ्यांसाठी सरकारने व्यवसाय कर्ज योजना सुरू केल्या आहेत. विविध योजनांतर्गत सरकार नाममात्र दरात कर्ज देत आहे. तर आज आपण केंद्र सरकारच्या अशा कर्ज देणाऱ्या योजनांची माहिती घेणार आहोत.
Table of contents [Show]
मुद्रा योजना (Mudra Scheme)
अत्यंत कमी व्याज आणि कमीतकमी अटींसह स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी मुद्रा योजना प्रभावी ठरत आहे. या योजनेद्वारे शिशू, किशोर आणि तरूण अशा तीन कॅटेगरीमध्ये कर्ज दिले जाते. या योजनेंतर्गत आतापर्यंत 70 टक्क्यांपर्यंत महिलांना कर्ज देण्यात आले आहे.
स्टॅण्ड अप इंडिया स्कीम (Stand Up India Scheme)
स्टॅण्ड अप इंडिया स्कीम अंतर्गत नव्याने व्यवसाय करणाऱ्या अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील महिलांना प्रत्येक बॅंकेच्या शाखेतून 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. या योजनेतून बहुजन वर्गातील उद्योजकांना प्रोत्साहन दिले जात आहे.
कौशल्य विकास योजना (Skill Development Scheme)
कौशल्य विकास योजनेंतर्गत फक्त कर्ज नाही तर संबंधितांना त्या-त्या विषयातील प्रशिक्षण ही दिले जाते. या योजनेद्वारे स्कील्ड मनुष्यबळावर भर दिला जात आहे. तसेच यातून स्वत:चा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना कर्ज ही उपलब्ध करून दिले जात आहे.
स्वनिधी योजना (Svanidhi Scheme)
केंद्र सरकारने रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी स्वनिधी योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे कर्जदाराला कोणत्याही हमीशिवाय किमान 10 हजार रुपयांचे कर्ज दिले जाते. हे कर्ज त्याने दिलेल्या मुदतीत फेडले तर त्याला विना हमी 20 हजार रुपयांचे कर्ज दिले जाते.
या योजनांव्यतिरिक्त सरकारने वेगवेगळ्या विभागांतर्गतही कर्ज व आर्थिक मदतीच्या योजना सुरू केल्या आहेत. ज्यात एनसीईएफ पुनर्वित्त योजना, डेअरी विकास योजना, व्हेंचर कॅपिटल अशा योजना सुरू केल्या आहेत.