देशातील बेरोजगार तरुणांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी भारत सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) सुरू केली. या योजनेंतर्गत देशातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. यात बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर, अन्न प्रक्रिया, फर्निचर अशा 40 तांत्रिक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. देशातील तरुणांना त्यांच्या इच्छेनुसार ज्या अभ्यासक्रमात प्रशिक्षण घ्यायचे आहे ते निवडू शकतात. ज्या लोकांकडे ट्रेनिंगसाठी पैसे नाहीत आणि बेरोजगार आहेत त्यांचे प्रशिक्षण आणि मुल्याकंन शुल्क भारत सरकारद्वारे दिले जाते.
PMKVY प्रशिक्षण हे अनेक पब्लिक ट्रेनिंग सेंटर्सच्या माध्यमातून दिले जाते. अशा सेंटर्समध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल्स दोन्ही प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्याचे मूल्यांकन करून प्रमाणपत्र देखील दिले जाते. प्रशिक्षणार्थीचं मूल्यांकन करण्यासाठी संबंधित प्रशिक्षणार्थीची कार्यशाळांमध्ये 70 टक्के उपस्थिती असणे गरजेचे आहे. PMKVY चे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तो उमेदवार स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. या योजनेतून प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थीला प्रमाणपत्र मिळत असल्यामुळे मुद्रा लोन मिळू शकते.
PMKVY नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- मोबाईल क्रमांक
- ओळखपत्र
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट साईझ फोटो
ऑनलाईन नोंदणीसाठी
- pmkvyofficial.org या अधिकृत संकेतस्थळावर जावे.
- 4 पर्यायांपैकी I want to skill my self वर क्लिक करावे.
- वैयक्तिक माहिती भरावी.
- कागदपत्रे अपलोड करावी लागेल.
- सबमिट वर क्लिक करावे.
विविध क्षेत्रातील विषयांचा अभ्यासक्रमांत समावेश
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत अपंग व्यक्तीसाठी कौशल्य परिषद अभ्यासक्रम, आदरातिथ्य आणि पर्यटन अभ्यासक्रम, टेक्सटाईल कोर्स, सुरक्षा सेवा अभ्यासक्रम, रबर कोर्स, ऊर्जा उदयॊग अभ्यासक्रम, प्लम्बिंग कोर्स, जीवन विज्ञान अभ्रासक्रम, आरोग्य सेवा अभ्यासक्रम, फर्निचर आणि फिटिंग कोर्स, विमा, बँकिंग आणि वित्त अभ्याक्रम आणि कृषी अभ्यासक्रम यांचा समावेश आहे.
सध्या 6 राज्यात 114 जिल्ह्यात 200 हून अधिक प्रशिक्षण केंद्र आहेत. तसेच या योजनेतून प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना नोकरी व व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.