Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023: देशाच्या सुरक्षेसाठी मिळणार युद्धनौका, लढाऊ विमानं; संरक्षण बजेटमध्ये मोठी वाढ

Budget 2023

भारताच्या दीर्घकालीन विकासासाठी पायाभूत सुविधा उभारणीसाठी सर्वात जास्त लक्ष देण्यात आले आहे. तसेच सर्वसामान्यांनाही करातून दिलासा दिला आहे. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षण खात्याच्या बजटेमध्ये मागील वर्षीच्या निधीच्या तुलनेत 13% वाढ करण्यात आली आहे.

Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज बुधवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. भारताच्या दीर्घकालीन विकासासाठी पायाभूत सुविधा उभारणीसाठी सर्वात जास्त लक्ष देण्यात आले आहे. तसेच सर्वसामान्यांनाही करातून दिलासा दिला आहे. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षण खात्याच्या (defence budget 2023)  बजटेमध्ये मागील वर्षीच्या निधीच्या तुलनेत 13% वाढ करण्यात आली आहे.

संरक्षण खात्याला काय मिळणार? (What defence got from budget 2023)

मागील वर्षी संरक्षण खात्याला 5.25 लाख कोटींचा निधी देण्यात आला होता. त्यामध्ये 13% वाढ करून या वर्षी अर्थसंकल्पात 5.94 लाख कोटी करण्यात आला आहे. यातील 1.62 लाख कोटी खास शस्त्रास्त्रे, युद्धनौका, लढाऊ विमाने, लष्कराला लागणारी हार्डवेअर खरेदी करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. लष्कराच्या क्षमता विकासासाठी यातील मोठी रक्कम खर्च करण्यात येणार आहे. मागील वर्षी या भांडवली खर्चासाठी दीड लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यात यावर्षी वाढ केली आहे.

भारतीत सीमांवर चीनची आगळीक (Chinese adversary on Indian Border)

कोरोना साथ सुरू झाल्यापासून चीनने भारतीय सीमांवर आगळीक सुरू केली आहे. गलवान येथील धुमश्चक्रित तर अनेक भारतीय सैनिकांना प्राण गमवावे लागले. तसेच अनेक भागात चिनी सैनिक घुसखोरी करत आहे. या चिनी सैन्याला रोखून धरण्यासाठी लष्कराचे आधुनिकीकरण अत्यंत गरजेचे आहे. कारण चीनकडून संरक्षण खात्यावर मोठा खर्च केला जातो. त्यामानाने भारताकडून लष्करी खर्चाचे बजेट कमी आहे. मात्र, चीनला रोखून धरण्यासाठी भारत सक्षम आहे. मागील काही वर्षांपासून लष्कराच्या आधुनिकि‍करणावर मोठी खर्च करण्यात येत आहे.

चिनी लष्कराचे बजेट( China military budget vs India military budget)

चिनी लष्कराचे एकूण बजेट 229 बिलियन अमेरिकी डॉलर इतके आहे. हिमालय पर्वत रांगा, अरुणाचल प्रदेश येथील भारत चीन सीमेवरील भागात चीनकडून विकास करण्यात येत आहे. सीमा भागातील रस्त्यांचे जाळेही मजबूत करण्यात आले आहे. हा भारताच्या सुरक्षेला धोका असून चीनला रोखण्यासाठी भारतीय लष्करालाही मोठ्या निधीची गरज पडत आहे. ड्रोन, मिसाईल, नेव्हिगेशन टेक्नॉलॉजिमध्ये भारताकडून मोठी गुंतवणूक करण्यात येत आहे. पाकिस्तानी सीमेवरही भारताला कायम सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवावी लागते. त्यासाठीही मोठ्या निधीची गरज पडते.