Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गृहिणी घरबसल्या करू शकतात हे काम, जाणून घ्या शेअर बाजाराची माहिती!

गृहिणी घरबसल्या करू शकतात हे काम, जाणून घ्या शेअर बाजाराची माहिती!

थोडेसे शिक्षण आणि शेअर मार्केटमध्ये रस असेल तर त्या घरात बसून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतात गृहिणी

आजकाल पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक स्त्रिया विविध क्षेत्रात आपले नाव कमावत आहेत. आज स्त्री कोणत्याच क्षेत्रात मागे नाही असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. पण काही वेळा कुटुंबाच्या जबाबदारीमुळे महिलांना नोकरी करणे शक्य होत नाही. आज आपल्या देशात अनेक उच्चशिक्षित स्त्रिया आहेत, ज्यांना कौटुंबिक जबाबदारीमुळे आपल्या करियरवर पाणी सोडावे लागले आहे. अनेक स्त्रियांना लग्नाच्याआधी खूपच चांगला पगार असतो. त्यामुळे त्यांच्या सगळ्या आर्थिक गरजा स्वतःच्या स्वतः भागवण्याची त्यांना सवय लागलेली असते. कोणाकडेही एक रुपया देखील मागण्याची त्यांना सवय नसते. त्यामुळे नोकरी सोडल्यानंतरही त्यांना कोणाकडे पैसे मागणे पटत नाही. त्यामुळे घरातून काही काम करता येईल का याची संधी अनेक महिला शोधत असतात.            

महिला थोड्या शिकलेल्या असतील आणि त्यांना शेअर मार्केटमध्ये रस असेल तर त्या घरात बसून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतात. खरे तर शेअर मार्केटचे नाव तरी घेतले तरी अनेकांना धडकी भरते. शेअर मार्केटविषयी काहीही माहिती नसताना त्यात गुंतवणूक कशी करायची असा प्रश्न अनेकांना पडतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला चांगला परतावा मिळेलच अशी खात्री तुम्हाला कोणीच देऊ शकत नाही. कारण शेअर मार्केटमध्ये होणारे चढ-उतार हे अनपेक्षित असतात. अनेक वर्षांच्या अनुभवानंतरदेखील याविषयी कोणी अंदाज लावू शकत नाही. केवळ अनेक वर्षांच्या अनुभवामुळे शेअर मार्केटविषयी लोकांचा चांगल्याप्रकारे अभ्यास होतो. तुम्ही कोणतेही काम करायला लागल्यानंतर त्यामध्ये लगेचच तरबेज होत नाही. अनेक वर्षांच्या अनुभवानंतर तुम्हाला ते काम चांगल्याप्रकारे करता येते. शेअर मार्केटचे देखील काहीसे असेच आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.            

शेअर मार्केटचे गणितच खूप वेगळे असल्याने कोणत्या शेअरमध्ये किती पैसे गुंतवायचे हे सुरुवातीला कोणालाच कळत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेज (BSE) द्वारे काही कोर्सेस सुरू आहेत. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत तर अनेक कोर्सेस हे ऑनलाईन आहे. या कोर्सेसद्वारे तुम्हाला शेअर मार्केट, ते कशाप्रकारे चालते याविषयी माहिती मिळू शकते. हे कोर्सेस केल्यानंतर देखील सुरुवातीला अतिशय कमी रक्कम गुंतवून पाहावी, यातून तुम्हाला मार्केटविषयी थोडी तरी माहिती मिळण्यास मदत होईल. तसेच कोर्सेस करण्यासोबतच या क्षेत्रात पारंगत असलेल्या लोकांचे तुम्ही मार्गदर्शन देखील घेऊ शकता. अनेक वर्षांच्या अनुभवानंतर आणि शेअर मार्केटविषयी चांगला अभ्यास झाल्यानंतरच तुम्ही थोडी जास्त रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याचा विचार करू शकता.            

अनेक वर्षांच्या अनुभवानंतर देखील प्रत्येकवेळी तुम्हाला यश मिळेलच असे नाही. त्यामुळे खचून न जाता प्रयत्न करता राहा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेअर मार्केटचा अभ्यास हा सतत करत राहा. कारण शेअर मार्केटमध्ये कोणते बदल होत आहेत याविषयी माहीत असणे गरजेचे आहे. तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असलेल्या लोकांच्या संपर्कात राहा. त्यांच्याकडून अधिकाधिक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.