Gold Loan Default Rules: भारतामध्ये सुवर्ण कर्ज घेणाऱ्यांची मोठी आहे. सोन्यास पारंपरिक आणि सांस्कृतीकदृष्या महत्त्व असल्याने प्रत्येकाच्या घरात थोडेतरी सोने असतेच. आर्थिक अडचणीच्या काळात सोने तारण ठेवून सहज कर्ज मिळते. मग तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तरी सहज कर्ज मिळते.
सुवर्ण कर्जफेडीचा कालावधी कमी
सुवर्ण कर्ज हप्त्याद्वारे (EMI) किंवा एकरकमी व्याजासहित फेडू शकता. सहसा सुवर्ण कर्जफेडीचा कालावधी इतर कर्जांपेक्षा कमी असतो. कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 2 वर्ष कालावधी असतो. तसेच हे सुरक्षित प्रकारचे कर्ज असते. म्हणजेच जर तुम्ही कर्जफेड केली नाही तर बँक तुम्ही तारण ठेवलेले सोने लिलावाद्वारे विकून तोटा भरून काढते. बँकेला लिलाव करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र, हे तारण ठेवलेले सोने बँक तत्काळ लिलाव करते का?
नोटिशीला उत्तर न दिल्यास वाढतील अडचणी
जर तुम्ही सुवर्ण कर्जाचे हप्ते थकवले तर तुम्हाला बँकेकडून सर्वप्रथम नोटीस येईल. एकापेक्षा जास्तवेळा नोटिसा येऊ शकतात. तसेच मेल, मेसेज किंवा फोनद्वारे संपर्क साधून कर्जफेडीबाबत विचारणा केली जाईल. जर तुम्ही नोटिशींना वेळोवेळी उत्तर दिले नाही किंवा बँकेच्या संपर्कात राहिला नाही तर बँकेला सोने लिलाव करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे बँकेच्या नोटिशीला उत्तर देणे योग्य ठरेल. बँक अधिकाऱ्यांशी बोलून तुम्ही कर्जफेडीचा कालावधी वाढवू शकता किंवा कर्जाची पुनर्रचना करू शकता.
किती दिवसांनी लिलाव केला जातो?
जर तुम्ही बँकेकडून वारंवार आलेल्या नोटिशीला उत्तर दिले नाही तर दोन आठवड्यानंतर म्हणजेच 15 दिवसांनी बँक तुम्ही तारण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव करू शकते.
जर तुम्ही सुवर्ण कर्जाचे हप्ते वेळेवर भरले नाही तर बँक 3% पासून 12 टक्क्यापर्यंत दंड आकारते. (Gold Loan Default Rules) कर्ज हप्त्याने फेडायचे की एकरकमी कर्ज फेडण्याचा पर्याय निवडायचा, याचे स्वातंत्र्य बँक कर्जदाराला देते.
सुवर्ण तारण कर्ज घेताना क्रेडिट स्कोअर सहसा विचारात घेतला जात नाही. (Gold Loan Default auction)मात्र, कर्ज बुडीत निघाले तर बँक क्रेडिट रेटिंग ब्युरोला कर्जदाराची माहिती पुरवते. ही माहिती इतर वित्तसंस्थांनाही उपलब्ध होते. त्यामुळे भविष्यात तुम्हाला इतर कर्ज मिळण्यासही अडचणी येतील. जरी कर्ज मिळाले तरी व्याजदर जास्त भरावा लागेल.