Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

GOLD Loan : गोल्ड लोन काढायचे आहे? जाणून घ्या अर्ज प्रक्रियेसाठी महत्त्वाच्या टिप्स

GOLD Loan : गोल्ड लोन काढायचे आहे? जाणून घ्या अर्ज प्रक्रियेसाठी महत्त्वाच्या टिप्स

सुवर्ण कर्ज (Gold Loan) हे सहज आणि परवडणाऱ्या व्याज दरात उपलब्ध होणारा कर्जाचा प्रकार आहे. शिवाय या कर्जप्रकरणात सोन्याचा मालकी हक्कदेखील तुमच्याकडे कायम राहतो. आपत्कालीन परिस्थितीत जसे की वैद्यकीय आणीबाणी, शिक्षणाचा खर्च किंवा एखाद्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी भांडवलाची उभारणी करण्यासाठी अल्प मुदतीसाठी सुवर्ण कर्ज घेणे फायद्याचे ठरू शकते.

भारतात सोन्यामध्ये गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. यामागे प्रामुख्याने सोन्यासारखा मौल्यवान दागिना बाळगण्याची प्रतिष्ठा आणि सोन्याचे वाढत जाणार मूल्य ही दोन कारणे आहेत. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ अर्थसहाय्य मिळवण्याच्या दृष्टीने सुवर्ण कर्जाचा (gold loan) एक व्यावहारिक पर्याय उपलब्ध होतो. तसेच, अलीकडच्या काळात सुवर्ण कर्जाची प्रक्रिया सोपी आणि जलद झाली आहे. आज आपण सुवर्ण कर्ज घेण्यासंदर्भातील काही महत्त्वाच्या टीप्स जाणून घेऊयात.


सुवर्ण कर्ज  (Gold Loan) हे सहज आणि परवडणाऱ्या व्याज दरात उपलब्ध होणारा कर्जाचा प्रकार आहे. शिवाय या कर्जप्रकरणात सोन्याचा मालकी हक्कदेखील तुमच्याकडे कायम राहतो. आपत्कालीन परिस्थितीत जसे की वैद्यकीय आणीबाणी, शिक्षणाचा खर्च किंवा एखाद्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी भांडवलाची उभारणी करण्यासाठी अल्प मुदतीसाठी सुवर्ण कर्ज घेणे फायद्याचे ठरू शकते. दरम्यान, सुरक्षित व्यवहाराच्या माध्यमातून सुवर्ण कर्ज काढण्यापूर्वी तुम्ही काही पुढील टीप्स जाणून घेतल्यास तुमची कर्जाची प्रक्रिया आणखी सोपी होईल.

सुवर्ण कर्जाचे व्याज दर तपासा-

तुम्हाला आर्थिक गरजा पुर्ण करण्यासाठी अधिकच आवश्यकता असेल तर तुम्ही सुवर्ण कर्ज काढण्याचा विचार करू शकता. तुम्ही सुवर्ण कर्ज घेण्याचे निश्चित केल्यानंतर सुरुवातीला वेगवेगळ्या गोल्ड लोन देणाऱ्या वित्तीय संस्थांचे व्याजदर तपासा. तुम्हाला ऑनलाईन माहिती शोधल्यास व्याजाचे दर प्राप्त होतील. मात्र, विश्वासहार्य वित्तीय संस्थेचीच निवड करा.

पात्रता निकष तपासा:

गोल्ड लोन घेण्यापूर्वी संबंधित वित्तीय संस्थेचे कर्जासाठी असलेले पात्रता, नियम, अटी जाणून घ्या. बहुतांश कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था या 21 ते 70 वर्षे वयोगटातील नागरिकांना कर्ज देतात. तसेच किती कॅरेटचे सोन्यासाठी कर्ज देतात याची खात्री करा, काही वेळा फक्त 24 कॅरेट सोन्याचे दागिन्यांवरच कर्ज दिले जाते.

दागिने जमा करा- 

सुवर्ण कर्ज घेण्यापूर्वी तुम्हाला आवश्यक कर्जाच्या रकमेच्या हिशोबाने तुमच्याकडील दागिने एकत्र करा. तसेच ते दागिने सुस्थितीत असतील याची खात्री करा. त्याचे अचूक वजन जाणून घ्या. ज्यामुळे तुम्हाला वित्तीय संस्थेकडून सुरक्षित व्यवहाराची खात्री होईल.

किमान कागदपत्रे जवळ बाळगा

गोल्ड लोनसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे जमा करा. कर्जदारांकडे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, अशी आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुमचे कर्ज मंजूर होण्यास विलंब होणार नाही. या शिवाय कर्ज घेतल्यानंतर कर्ज घेतल्यानंतर झालेल्या व्यवहाराच्या कागदपत्राची प्रत तुमच्याकडे ठेऊन घ्यायला विसरू नका.

योग्य परतफेड योजना निवडा

तसेच सुवर्ण कर्ज देणाऱ्या संस्थेकडून परतफेडीच्या कोणकोणते सुलभ कालावीधी आहेत याची माहिती जाणून घ्या. तसेच अल्प कालवधी, दिर्घ कालवधी याबाबतचे व्याज दर जाणून घ्या. तुम्हाला योग्य असेल तो परतफेडीचा कालावधी निवडा.

अतिरिक्त शुल्क जाणून घ्या

कर्ज घेण्यापूर्वी कर्जाची प्रक्रिया करण्यासाठी किती अतिरिक्त खर्च आहे. तसेच मुदतपूर्व परतफेडीसाठी अतिरिक्त चार्जेस आकारले जातात का? याचीही चौकशी कर. तसेच सुवर्ण मूल्यमापन शुल्क, याबाबतची माहिती जाणून घ्या त्यानंतरच तुम्ही सुवर्ण कर्ज काढण्याचा विचार करा.


अशा प्रकारे या सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमचे सुवर्ण कर्ज  सुरक्षितपणे प्राप्त करू शकता.