SBI Agri Gold Loan: स्टेट बँक ऑफ इंडियाकडून शेतीच्या कामांसाठी खास गोल्ड लोन ऑफर दिली जात आहे. शेतीशी निगडीत विविध कामांसाठी आणि कृषी उद्योजकांना अल्प कालावधीसाठी गोल्ड लोन घेता येईल.
गोल्ड लोन कोणत्या कामांसाठी?
बियाणे खरेदी, खते, लागवड, सिंचन, भांडवली खर्च आणि इतर संबंधित कामे. दुग्ध, क्कुकुटपालन, मासेमारी अशा व्यवसायातील विविध कामांसाठी. शेती संबंधित उद्योग, व्यवसाय करणाऱ्यांना मशिनरी, साहित्य किंवा इतर खर्च करण्यासाठी. जमीन विकसित करण्यासाठी, सिंचन, वाहतूक व्यवस्था उभी करण्यासाठी कृषी गोल्ड लोन मिळू शकते.
पात्रता काय?
शेतकरी, शेतीशी संबंधित उद्योजक, शेतमजूर, भाडेतत्त्वाने आणि समूह शेती करणाऱ्यांना ही ऑफर आहे. हे गोल्ड लोन 12 महिने म्हणजेच 1 वर्षाच्या अल्प कालावधीसाठी मिळते. सोन्याची दागिने तारण ठेवून कर्ज मिळेल. सोन्याच्या शुद्धतेनुसार कर्ज दिले जाईल.
व्याजदर आणि शुल्क किती?
एक वर्षाचा MCLR दर +1.25 % इतके व्याजदर आकारले जाईल. सध्या स्टेट बँकेचा 1 वर्षाचा MCLR दर 8.55% आहे. म्हणजेच 9.80% व्याजदर लागू होईल. (व्याजदरामध्ये बदल होऊ शकतो)
25 हजार रुपये पर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही शुल्क नाही.
25 हजार ते 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर 500 रुपये + GST लागू होईल.
2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जावर कर्ज रकमेच्या 0.30%+ GST लागू होईल.
कागदपत्रे कोणती लागतील?
कर्जदाराचे दोन फोटो
केवायसी कागदपत्रे
अर्ज
शेत जमिनीचा पुरावा
बँकेने मागणी केल्यास इतर कागदपत्रेही सादर करावी लागतील.