Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bajaj Finserv Gold Loan: आर्थिक गरजांची पूर्तता करणाऱ्या 'बजाज फिनसर्व्ह गोल्ड लोन'बाबत 'या' गोष्टी जाणून घ्या

Bajaj Finserv Gold Loan

Bajaj Finserv Gold Loan: बऱ्याच वेळा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो. अशावेळी 'बजाज फिनसर्व्ह गोल्ड लोन' हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण करून कमी वेळेत हे कर्ज मिळवता येते. या गोल्ड लोन बाबत काही गोष्टी जाणून घेऊयात.

आयुष्यात आपल्याला अनेकदा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी ती समस्या सोडवण्यासाठी लोक इतरांकडून पैसे उधार घेतात किंवा कर्ज काढून ती समस्या सोडवली जाते. हे पैसे वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जातात. जसे की, घर बांधणे किंवा घराचे नूतनीकरण करणे, मुलांचे शिक्षण, अचानक उद्भवलेला वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज असते. सध्या बँकांकडून पर्सनल लोनची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मात्र या कर्जावर सर्वाधिक व्याजदर आकारला जातो.

जर तुम्हाला देखील अचानक पैशांची गरज पडत असेल, तर तुम्ही बजाज फिनसर्व्ह गोल्ड लोन (Bajaj Finserv Gold Loan) घेऊ शकता. अशा परिस्थितीत तुमचे सोने वित्तीय संस्थांकडे तारण ठेवले जाते आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसे उपलब्ध करून दिले जातात. विशेष म्हणजे तुम्ही पैशांची परतफेड केल्यानंतर तुम्हाला तुमचे सोने परत मिळते. बजाज फिनसर्व्ह गोल्ड लोन घेण्यासाठी कोण अर्ज करू शकते? तसेच यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक असतात, यासारख्या गोष्टी जाणून घेऊयात.

पात्रता आणि व्याजदर जाणून घ्या

तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये अचानक पैशांची गरज पडत असेल, तर तुम्ही बजाज फिनसर्व्ह गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकता. यासाठी अर्जदाराचे वय 21 ते 70 वर्ष यादरम्यान असावे. तसाच तो भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे. अगदी कमीत कमी कागदपत्रं सादर करून केवायसी पूर्ण केल्यानंतर कंपनी तर्फे कमी वेळात गोल्ड लोनची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यासाठी कर्जदाराचे दागिने वित्तीय संस्थांकडे गहाण ठेवले जातात. ही कंपनी सोन्याच्या दागिन्यांवर 5000 रुपयांपासून ते 2 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देते. ज्यावर वार्षिक 9.50% व्याजदर आकारला जातो.

अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

बजाज फिनसर्व्ह गोल्ड लोनकरिता अर्ज करण्यासाठी अर्जदाराला ठराविक कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. बेसिक केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. या प्रक्रियेसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन,पासपोर्ट, नरेगा जॉब कार्ड यासारखी ओळखीची आणि रहिवासी कागदपत्र सादर करावी लागणार आहेत.

बजाज फिनसर्व्ह गोल्ड लोनची वैशिष्ट्ये जाणून घ्या

  • कमी वेळात आणि कमी कागदपत्रांसह पटकन कर्ज उपलब्ध होते.
  • अर्जदाराचा क्रेडिट स्कोर खराब असला तरीही, कर्ज देण्याची प्रक्रिया ही सोन्याच्या किमतीवर आधारित असते.
  • कर्जदाराने घेतलेले सुवर्ण कर्ज मुदत कालावधीच्या पूर्वीच फेडण्याचा निर्णय घेतला, तर त्यावर अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.
  • आर्थिक अडचणीच्या वेळी सोने तारण ठेवून कर्ज मिळवता येते आणि पैशांची परतफेड करून परत सोने मिळवता येते.

Source: hindi.financialexpress.com