Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bureau of Energy Efficiency: ऊर्जा बचतीसाठी BEE संस्था नक्की काय काम करते?

Bureau of Energy Efficiency

टीव्ही, एसी, फ्रिज, कूलर आणि असे अनेक वीजेवर चालणारी उपकरणे आपण वापरतो. वीजेवर चालणाऱ्या उपकरणांना कमी वीज लागावी यासाठी BEE ही संस्था काम करते. प्रत्येक उपकरणातून वि‍जेची बचत व्हावी, ऊर्जेचा अपव्यय टाळावा हा उद्देश संस्थेचा आहे.

नुकतेच ब्युरो ऑफ एनर्जी इफिशिअन्सी या संस्थेने फ्रिजला लागणाऱ्या ऊर्जेबाबतच्या नियमांमध्ये बदल केला. इलेक्ट्रिक उपकरणाला किती ऊर्जा लागते हे दर्शवण्यासाठी रेटिंग देण्यात येते. त्यामध्ये फ्रिजचाही समावेश आहे.  मात्र, आता फ्रीजच्या आतमधील फ्रिजरला थंड ठेवण्यासाठी किती ऊर्जा खर्च होते हे सुद्धा उत्पादक कंपन्यांना जाहीर करावे लागणार आहे. टीव्ही, एसी, फ्रिज, कूलर आणि असे अनेक वीजेवर चालणारी उपकरणे आपण वापरतो. वीजेवर चालणाऱ्या उपकरणांना कमी वीज लागावी यासाठी BEE ही संस्था काम करते. प्रत्येक उपकरणातून विजेची बचत व्हावी, ऊर्जेचा अपव्यय टाळावा हा उद्देश संस्थेचा आहे.

कधी स्थापना झाली?

ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी या संस्थेची स्थापना मार्च २००२ मध्ये झाली आहे. ही संस्था ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येते. ऊर्जा संवर्धन कायदा २००१ साली मंजूर करण्यात आल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी BEE संस्था स्थापन करण्यात आली. ऊर्जा बचतीसाठीचे नियम तयार करण्याचे काम ही संस्था करते. वीजेवर चालणाऱ्या काही उपकरणांना किती वीज लागते हे दर्शवणारे स्टार रेटिंग BEE संस्थेकडून अनिवार्य करण्यात आले आहे.

BEE संस्थेकडून करण्यात येणारी कामे कोणती?

देशाच्या ऊर्जा संवर्धनासाठी केंद्र सरकारला सल्ला देणे. ऊर्जा क्षेत्राचे ऑडिट करणे. 
ऊर्जेचा अपव्यय टाळण्यासाठी जगजागृती करणे आणि नियमावली आखणे.
अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात ऊर्जेचा किती वापर होतो यावर निगराणी ठेवणे. 
ऊर्जेचा पुरेपूर वापर व्हावा यासाठी विविध योजना आणि प्रकल्प राबवणे
इलेक्ट्रिक उपकरणांना लागणाऱ्या वीजेबाबत नियमावली आखणे. त्याबाबतचे प्रमाणपत्र कंपन्यांना देणे. 

ऊर्जा बचत क्षेत्रात संशोधन आणि अभ्यास करणे.  वीजेवर चालणाऱ्या ज्या उपकरणांना जास्त ऊर्जा लागते त्यांना स्टार रेटिंगचे लेबल लावण्याचे बंधन BEE संस्थेकडून घालण्यात आले आहे. त्यासाठीची टेस्टिंगही घेतली जाते. कमी वीज लागणाऱ्या उपकरणांचा प्रसार व्हावा, यासाठी संस्था कार्यरत आहे. जास्त स्टार रेटिंग असणारी इलेक्ट्रिक उपकरणे खरदी करण्यासाठी संस्थेकडून जगजागृती करण्यात येते. जास्त स्टारच्या उपकरणांमुळे वीजेवरचा खर्च काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.