Saving Tips: दैनंदिन आयुष्यात आपल्या प्रत्येकच गरजा महत्वाच्या आहेत. पण, काही गरजा नाही तर आपल्या आवडीनिवडी असतात. त्यावर थोडं नियंत्रण ठेवलं तर आपला मासिक खर्च कमी होऊ शकतो. मासिक खर्च कमी करण्याबाबत अनेकांशी चर्चा केली असता प्रत्येकाचं मत यावर वेगवेगळ असल्याच दिसून आलं. मीरा सुर्वे म्हणतात, शेवटी आपण एवढी मेहनत करून काम करतो ते आपल्या आणि आपल्या कुटुंबियांसाठीच तर ना.
म्हणून हॉटेलला, किंवा फिरला वगरे जावे पण त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किती महिन्यातून किती वेळा जाणे व्हायला पाहिजे याचा हिशोब ठेवावा. जर एखाद्या महिन्यात जास्तच होत असेल तर मात्र आळा घालावा, आणि पुढील महिन्यात समयोजित करून घ्यावे पण मासिक खर्च कमी करण्यासाथी आपले आनंदाचे क्षण घालवू नयेत. पण त्याच बरोबर बचतीचेही भान ठेवले पाहिजे.
मासिक खर्च कमी कण्याबाबत चैतन्य राजपूत सांगतात, सगळ्यात आधी दरमहा बचत किती करायची? हे ठरवून घेऊन तेवढी बाजूला काढून घेतली तर आलेले इन्कम पूर्ण खर्च होणार नाही. बचतीसाठी काढलेली रक्कम अश्या राष्ट्रीयकृत बँकमध्ये ठेवू शकता ज्याचे ATM , चेकबुक नाही, म्हणजे तुम्हाला त्या अकाउंट मधून पैसे काढायला सोप्पा मार्ग राहणार नाही. बचतीचे पैसे बाजूला काढून टाकल्यास आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात घरात किती वस्तू शिल्लक आहेत, त्या किती दिवस जातील ह्याची खातरजमा करून नवीन सामान आणण्याची यादी करून करून घ्यावी.
वृत्तपत्रे साप्ताहिक, मासिके, सगळी बंद करून द्याव्यात. केबल किंवा टाटा स्काय, डिश TV अश्या प्रकारच्या सुविधा असतील तर त्या काढून दूरदर्शनची Free To Air असलेली Direct 2 home ही सुविधा घ्यावी ज्याला कोणतीही मासिक फी लागत नाही. स्मार्टफोन असेल तर चांगली सुविधा देणाऱ्या कोणत्या नेटवर्कचे Sim घेऊन कमीत कमीत पैशात जास्तीत जास्त दिवस आणि फायदा होईल असे रिचार्ज करावे. त्याचबरोबर जवळच्या ठिकाणी पायी / सायकलने प्रवास करावा. कमी वॅटचे दिवे वापरून विजेची बचत करू शकता.
नॉनस्टिक भांडयांचा वापर करणे जेणेकरून आहारात खाद्यतेलाचा योग्य तितकाच समावेश होईल आणि पर्यायाने आरोग्यविषयक चिंता कमी उद्भवतील. जमेल तितक्या पाककृती शिकून घेणे, हॉटेलिंग चा खर्च कमी होईल. दैनंदिन गरजेच्या वस्तूंना तितकाच प्रभावी पण स्वस्तातला पर्याय शोधता येतो. शेतकरी ते ग्राहक अशी बाजारपेठ तुमच्या भागात असेल तर त्या बाजारातून वस्तूंची खरेदी करू शकतात.
किरण वानखडेंच्या मते आवक आणि जावक यात तुलना करून मासिक खर्च करावा. टाळता न येणाऱ्या खर्चामध्ये स्वयंपाक, किराना, दूध, इंधन, विज देयक, घरभाडे, दवाखान्यात येणारा खर्च, आकस्मिक आलेले पाहुणे. आता जमा खर्च लिहून काढा म्हणजेच वायफळ खर्च लक्षात येईल आणि तो कमी करता येतो.