Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शैक्षणिक कर्जासाठी कोणते नियम आहेत ?

EDUCATION LOAN

वाढत्या महागाईत शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिकण्याची इच्छा आहे; पण पैशांची अडचण असेल तर बँकांकडून शैक्षणिक कर्जाची (Educational Loan) सुविधा मिळते.

शिकायची इच्छा आहे पण आवडीचा शैक्षणिक कोर्स बजेट मध्ये बसत नाहीये. यावर उपाय म्हणजे अनेक बँक शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देतात. तसेच सध्या उच्चशिक्षणासाठी परदेशात जाण्याचा ट्रेंड वाढत आहे. जर देशांतर्गत शिक्षण घेणार असाल तर 10 लाख आणि जर विदेशात शिक्षण घेणार असाल तर 25 लाख इतके कर्ज तुम्हाला मिळू शकते. अनेकदा कर्जाची रक्कम तुम्ही कोणता कोर्स करणार आहेत ह्यावर देखील अवलंबून असते. कारण अंडरग्रॅज्युएशन कोर्सला साधारणतः 4 ते 5 लाख रुपये इतके कर्ज दिले जाते तर प्रोफेशनल कोर्सला 10 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. तसेच शैक्षणिक कर्ज प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय हे साधारणतः 18 ते 35 च्या दरम्यान असणे अनिवार्य असते. बँकेद्वारे आकारले जाणारे व्याजदर 6 ते 12 % च्या दरम्यान असू शकतो. शैक्षणिक कर्ज फेडण्यासाठी बँकांकडून जास्तीत जास्त 4 ते 5 वर्षांचा कालावधी दिला जातो.  

शैक्षणिक कर्जाचे प्रकार  

भारतातील बँक विद्यार्थ्यांना एकूण दोन प्रकारचे शैक्षणिक कर्ज देते. पहिले म्हणजे देशांतर्गत शिक्षण घेण्यासाठी कर्ज (Domestic Education Loan) आणि दुसरे म्हणजे विदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज (Abroad Education Loan) ज्याबद्दल माहिती खालील प्रमाणे

1. देशांतर्गत शैक्षणिक कर्ज ( Domestic Education Loan )

देशांतर्गत शिक्षण घेण्यासाठी आपल्याला डोमेस्टिक एज्युकेशन लोन मिळते. या कर्जातील एक महत्त्वाची अट म्हणजे शिक्षण घेण्यासाठी तुम्ही देशाबाहेर जाऊ शकत नाही, तसेच भारताच्या अंतर्गत तुम्ही कोणत्याही राज्यात व जिल्ह्यात शिक्षण घेऊ शकता. देशांतर्गत शैक्षणिक कर्जाचे व्याजदर हे कमी असते. हे साधारणत ५ % ते 15 % टक्के इतकी असू शकते, व्याजदर पूर्णतः तुम्ही कोणत्या बँकेतून कर्ज घेत आहात यावर अवलंबून असते.  भारतात अभ्यासक्रमासाठी पदवी अभ्यासक्रम, यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालय, यूजीसी , सरकार, एआयसीटीई, एआयबीएमएस, आईसीएमआर यांच्या मान्यतेखालील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील इतर पदविका आणि पदवी अभ्यासक्रमासाठी बँक कर्ज उपलब्ध करून देतात.

2. विदेशी शैक्षणिक कर्ज ( Abroad Education Loan )

तुम्ही कोणत्याही देशात शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकता.  विदेशी शैक्षणिक कर्जाचे व्याजदर हे देशांतर्गत दिलेल्या व्याजदरापेक्षा जास्त असते.  परदेशातील अभ्यासासाठी नोकरीभिमुख पदव्यूत्तर अभ्यासक्रम, पदव्यूत्तर एमसीए, एमबीए, एमएस इत्यादी साठी बँक कर्ज देते.

शैक्षणिक कर्ज कसे घ्यावे?

  1. सर्व प्रथम बँक किंवा संस्था निवडा.
  2.  नंतर विद्यार्थी कर्जाची सर्व माहिती मिळवा.
  3. बँकेने दिलेले व्याजदर नीट समजून घ्या.
  4. बँकेने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करा.
  5. बँक आणि तुमची खात्री झाल्यावर कर्जासाठी अर्ज करा.

शैक्षणिक कर्जसाठी पात्रता

  1. कर्ज घेणारा विद्यार्थी भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
  2. कर्जासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 18 ते 35 च्या दरम्यान असले पाहिजे.
  3. भारतात किंवा विदेशात विध्यार्थाने घेतलेले ऍडमिशन कन्फर्म असणे गरजेचे आहे.
  4. विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजेच 12 वी पर्यंत चे शिक्षण पूर्ण असले पाहिजे.
  5. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बॅकग्राऊंड उत्तम असले पाहिजे, म्हणजेच टक्केवारी उत्तम हवी.

शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे?

  1. वयाचा पुरावा
  2. पासपोर्ट साइज फोटो
  3. मार्कशीट
  4. ज्या शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला आहे तेथील पत्र.
  5. तुम्ही घेतलेल्या कोर्सच्या फी चा संपूर्ण आराखडा
  6. बँक पासबुक
  7. आईडी प्रूफ
  8. रहिवाशी दाखला म्हणून पुरावा
  9. कोर्स डिटेल्स
  10. विद्यार्थी आणि पालकांचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड
  11. पालकांचा उत्पन्नाचा दाखला

जर ह्या आधी तुम्ही कोणतेही कर्ज घेतले असेल, तर कर्जाची माहिती दाखवणारे कागदपत्र, जसे कि लोन खाते  क्रमांक, बँकेचे स्टेटमेंट इत्यादी. वर दिलेल्या माहितीनुसार शिक्षणाची इच्छा असेल आणि आर्थिकबाजू भक्कम नसेल तर तुम्ही शैक्षणिक कर्ज घेऊन आपली स्वप्न पूर्ण करू शकाल.