Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What are the Risks Of Trading Cryptocurrencies? : काय आहेत 'क्रिप्टोकरन्सी मार्केट'मधील रिस्क्स ?

Risk in Crypto Currency Investment

What are the Risks Of Trading Cryptocurrencies?:क्रिप्टोकरन्सीमधून मिळणारे भरपूर रिटर्न्स आणि त्याच्या प्रसिद्धीकडे बघून अनेकजण या गुढ चलनाच्या गुंतवणुकीकडे आकर्षित होत आहेत परंतु अनेक कारणांमुळे या आकर्षणाचे रुपांतर एका यशस्वी इन्व्हेस्टमेंटमध्ये होताना दिसत नाही. यातील महत्वाचे कारण म्हणजे क्रिप्टोकरन्सीबद्दलचे गुंतवणूकदारांकडे असलेले अपुरे किंवा अल्प ज्ञान.

क्रिप्टोकरन्सी विविध कारणांमुळे जगभरात लोकप्रिय होत आहे. क्रिप्टोकरन्सीची अनोखी रचना आणि भरपूर रिटर्न्स मिळण्याची शक्यता यामुळे केवळ सर्वच वयोगटातील गुंतवणूकदारांना क्रिप्टोकरन्सीचे वेड लागले आहे. एका रिपोर्टनुसार भारतातील जवळपास 1.5 कोटी गुंतवणूकदार क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. क्रिप्टोकरन्सीमधून मिळणारे भरपूर रिटर्न्स आणि त्याच्या प्रसिद्धीकडे बघून अनेकजण या गुढ चलनाच्या गुंतवणुकीकडे आकर्षित होत आहेत परंतु अनेक कारणांमुळे या आकर्षणाचे रुपांतर एका यशस्वी इन्व्हेस्टमेंटमध्ये होताना दिसत नाही. यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे क्रिप्टोकरन्सीबद्दलचे गुंतवणूकदारांकडे असलेले अपुरे किंवा अल्प ज्ञान. क्रिप्टोकरन्सी जितकी आकर्षित आहे तितकीच प्रचंड जोखीम असणारी गुंतवणूक आहे. याच जोखमीची जर तुम्हाला पुरेपूर माहिती नसेल तर तुमचे आकर्षण देखील एक आकर्षणच राहील. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील विविध रिस्क?

प्रचंड अस्थिरता (High Volatility)

मार्केटमध्ये अचानक होणारे बदल हे क्रिप्टो चलनांतील किंमतीच्या हालचालींमध्ये लक्षणीय आणि जलद परिणाम आणतात, ज्याला अस्थिरता असे म्हटले जाते. अस्थिरता क्रिप्टो मार्केटला चालना देणारा एक महत्वाचा घटक आहे. अस्थिरता ही केवळ क्रिप्टो मार्केटशी संबंधित असलेली गोष्ट नाही. इतर अनेक क्षेत्रांमध्येही अस्थिरता सहाजिक आहे, परंतु क्रिप्टो मार्केट प्रचंड मोठे आणि तीव्र प्रतिक्रिया देणारे आहे ज्यामुळे अस्थिरतेचे प्रमाण इथे इतर क्षेत्रांपेक्षा जास्त असते. क्रिप्टो मार्केटमध्ये अस्थिरतेचा जरी धोका असला तर मार्केटमध्ये या अस्थिरतेवर मात करण्यासाठी अनेक उपाय राबवले गेले आहेत. ज्यांच्या वापराने नक्कीच मार्केटमधील अस्थिरतेपासून सावध राहणे शक्य होते.

नियमांचा अभाव (Lack Of Regulations)

वर्ष 2021 मध्ये भारतात क्रिप्टोकरन्सी असेट्सवर नियमन लावायचे की नाही यावर भरपूर चर्चा झाली. याच दरम्यान अनेक खोट्या बातम्या व अफवा या विषयासंबंधी तयार झाल्या ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या सर्व परिस्थितीकडे पाहता सरकारने तात्पुरते कोणतेही निर्णय न देण्याचे ठरवले परंतु इन्वेस्टर्समधील गोंधळ कायम राहिला व त्याचे परिणाम मार्केटमध्ये दिसून आले. देशातील अनेक नियमकांच्या
क्रिप्टोकरन्सीवरील नियमांमध्ये भरपूर फरक दिसून येतो ज्यांमुळे ठराविक नियम ठरवणं कठीण झाले आहे. हे ठराविक नियम निश्चित करणे महत्वाचे आहे कारण त्यावरच भारतीय क्रिप्टो मार्केटचे भविष्य अवलंबून आहे. असे असताना देखील हे नियम ठरवण्यात घाई केली जात नाही कारण नियमकांच्या मते क्रिप्टोकरन्सीचा वापर गुन्हेगार आणि दहशतवादी गटांद्वारे चुकीच्या कामांसाठी केला जाऊ शकतो. नियमनामधील या गोधळांमुळे मार्केटमध्ये रिस्क तयार होत आहेत. ज्या ठोस नियमांमुळेच कमी होऊ शकतात.

मार्केट रिस्क (Market Risks)

इतर असेट्सप्रमाणे, क्रिप्टो असेट्सवर देखील मार्केटमधल्या घटनांचा आणि घडामोडींचा परिणाम होतो. क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगशी संबंधित दोन प्रकारचे धोके आहेत, सिस्टिमॅटिक रिस्क आणि अनसिस्टिमॅटिक रिस्क. सिस्टिमॅटिक रिस्क सर्व क्रिप्टोकरन्सीमध्ये असते कारण ती क्रिप्टो मार्केटमध्ये अंतर्निहित असते. अनसिस्टिमॅटिक रिस्कमध्ये क्रिप्टो असेट्सचा समावेश होतो ज्यामध्ये कंपनीद्वारे काही बदल होऊ शकतात जे मार्केटला हानिकारक ठरतात. 

कर-आधारित चिंता (Tax Based Concerns)

क्रिप्टोकरन्सी इन्व्हेस्टमेंट आणि परताव्याच्या कर स्थितीबाबत अजूनही अनिश्चितता आहे. अनेक देशांच्या अधिकार क्षेत्रांनी बिटकॉइन्स आणि इतर
क्रिप्टोकरन्सीना विशिष्ट मालमत्ता म्हणून तर काही देशांमध्ये त्यांना चलन म्हणून स्वीकारले आहे. उदाहरणार्थ एल साल्वाडोरने (El Salvador) बिटकॉइनला कायदेशीर केले आहे. अमेरिका (US) आणि कॅनडा (Canada) सारख्या देशांमध्ये, आभासी चलनांमध्ये व्यापार कायदेशीर आहे. दुसरीकडे, चीन आणि रशियाने क्रिप्टो ट्रेडिंगवर बंदी घातली आहे.

सायबर रिस्क (Cyber Risks)

जरी क्रिप्टोकरन्सी नव्या युगाची संकल्पना असली तरी त्यामध्ये नव्या युगाचाच धोका आहे तो म्हणजे सायबर क्राइम. क्रिप्टोकरन्सी पूर्णपणे विकेंद्रित झाल्यामुळे, क्रिप्टो मार्केटमध्ये क्रिप्टो गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. मात्र तरिही अनेक घटना अशा घडतात ज्यामुळे इन्वेस्टर्सच्या मनात सायबर सुरक्षितेसंबंधीत संशय निर्माण होतो. क्रिप्टो मार्केट संपूर्णपणे या प्रश्नाचा तोडगा काढण्यात गुंतलेले आहे. तरीही एक इन्व्हेस्टर म्हणून , क्रिप्टो मार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी या धोक्यांबद्दल जागरुक असणे आवश्यक आहे.