Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pension Plan Options: खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना पेन्शन योजनांचे पर्याय काय? जाणून घ्या

Pension Plan Options for Private Employee

Pension Plan Options: खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखासीन जाण्यासाठी पेन्शन प्लॅनचे काही निवडक पर्याय नक्कीच मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही भविष्याची तरतूद करू शकता.

Pension Plan Options for Private Sector Employee: निवृत्तीचा काळ जसजसा जवळ येतो, तशी निवृत्तीनंतरच्या आयुष्याची चिंता भेडसावू लागते. विशेषकरून जे खासगी क्षेत्रात काम करतात. त्यांच्यासाठी हा काळ खूप भावनिक असतो.

खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी ऐन उमेदीच्या काळात फक्त नोकरी एके नोकरी करतात. निवृत्तीसाठी नियमितपणे जमापुंजी बाजूला काढून ठेवली नाही तर खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी भावनिक न होता नोकरीची सुरूवात केल्यापासूनच निवृत्तीचे नियोजन केले पाहिजे. ते कसे करायचे. त्याचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, अशी सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.

सरकारी कर्मचाऱ्यांनाही पेन्शनचा लाभ नाही

सरकारी ऑफिसेसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आता सरकार पेन्शन देत नाही. पण सरकारी आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पीएफ कापला जातो. त्याचप्रमाणे इतर सोयीसुविधाही सरकार त्यांना देते. तसेच सरकार त्यांना वेतन आयोगानुसार पगार देते.

निवृत्तीनंतरचे आयुष्य व्यवस्थित घालवण्यासाठी सर्वांनाच पेन्शनची गरज आहे. स्वत:चे आयुष्य स्वाभिमानाने घालवण्यासाठी आणि मुलांकडे पैसे मागण्याची वेळ येऊ नये. यासाठी नोकरी करत असताना भविष्यातील खर्चासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यासाठी अनेक प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत. ज्यात गुंतवणूक करून तुम्ही भविष्यातील आर्थिक चिंता दूर करू शकता.

कर्मचारी पेन्शन योजना (Employee's Pension Scheme-EPS)

सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employee Provident Fund) योजनेचा कर्मचारी पेन्शन योजना हा एक भाग आहे. जो खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. या योजनेंतर्गत कर्मचाऱ्याला त्याने केलेली सेवा आणि पगाराच्या आधारावर निवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते. यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला किमान कर्मचारी पेन्शन योजनेत किमान 10 वर्षे गुंतवणूक करावी लागते.

राष्ट्रीय पेन्शन स्कीम (National Pension System-NPS)

राष्ट्रीय पेन्शन योजना ही एक ऐच्छिक आणि दीर्घकालीन सेवानिवृत्तीसाठीची बचत योजना आहे. या योजनेतील गुंतवणुकीतून खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी एक चांगला फंड उभा करू शकतात. जो त्याला निवृत्तीनंतर उपयोगात येऊ शकतो. एनपीएसमध्ये जमा होणारा निधी हा सरकारकडून वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गुंतवला जातो. त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून सरकार गुंतवणूकदारांना निश्चित असा परतावा देते. निवृत्तीनंतर यातून एकत्रितरीत्या एक ठराविक रक्कम काढता येते. तर उर्वरित रक्कम वार्षिक प्लॅनमध्ये गुंतवून त्यातून पेन्शन स्वरूपात मिळवता येते.

खाजगी पेन्शन प्लॅन (Private Pension Plans)

सरकारी पेन्शन प्लॅनप्रमाणे काही खाजगी इन्शुरन्स कंपन्यांद्वारे पेन्शन स्कीम राबविल्या जात आहेत. या स्कीम्स विशेषकरून खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहेत. यामध्ये हेल्थ पॉलिसीसोबत ठराविक कालावधीनंतर पॉलिसीधारकांना गुंतवणुकीवर चांगला परतावा दिला जातो. त्याचा उपयोग उतारवयातील खर्चासाठी करता येऊ शकतो.

पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (Public Provident Fund-PPF)

उतारवयातील निश्चित आणि सुरक्षित तरतूद म्हणून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या योजनेकडे पाहिले जाते. पीपीएफमधील गुंतवणूक दीर्घकालीन गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीला लॉक-इन कालावधी असल्यामुळे ती लगेच काढता येत नाही. त्यामुळे ही गुंतवणूक तेवढ्या कालावधीसाठी सुरक्षित राहते. तसेच त्यावर सरकारकडून चांगला परतावाही मिळतो.

म्युच्युअल फंड (Mutual Fund)

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही इक्विटीमधील गुंतवणूक आहे. यातील काही योजनांवर दीर्घकाळात चांगला परतावा मिळत असल्याने उतारवयात म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीतून चांगला फंड उभा राहू शकतो. ज्याचा उपयोग पेन्शनसारखा केला जाऊ शकतो. तसेच यामध्ये एसआयपीच्या माध्यमातून किमान गुंतवणूक करण्याची सुविधासुद्धा आहे. म्युच्युअल फंडमधील एसआयपी (SIP), एसडब्ल्यूपी (SWP) पर्यायांचा चांगला लाभ मिळू शकतो. त्याचबरोबर ELSS सारख्या योजनांमधून कर सवलतदेखील मिळते.