Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crop Insurance: पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची का आहे? त्याचे फायदे काय आहेत?

Importance of Crop Insurance

Crop Insurance: भारतातील शेतकऱ्यांना पीक विमा योजना वरदान ठरत आहे. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अनिश्चित हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. हे नुकसान पीक विमा योजनेतून भरून निघू शकते.

Crop Insurance: आपल्या सर्वांना विमा (इन्शुरन्स) म्हणजे काय माहित आहे. कोरोनाकाळात अनेकांना याचा अनुभवही घेतला आहे आणि त्याचे महत्त्वही अनेकांना पटले आहे. सध्याची आपली लाईफस्टाईल आणि धावपळीचे जीवन पाहता, कोणत्याही घडीला अनपेक्षित घटना होण्याचे प्रमाण वाढले. यासाठी अनेकजण सुरक्षितता म्हणून इन्शुरन्स काढतात. त्यात प्रामुख्याने आरोग्य विमा, प्रवासी विमा, जीवन विमा आणि अनेक प्रकारचे विमा उपलब्ध आहेत.

मग तुम्हाला पीक विमा सुद्धा माहिती असेल? शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून मुक्त करण्यासाठी पीक विमा वरदान ठरला आहे. जेव्हा एखादा शेतकरी पिकांची लागवड करतो. तेव्हा तो त्यात पैसा, मेहनत असे सर्व काही टाकत असतो. पण त्यातून त्याला किती प्रमाणात रिटर्न मिळतील हे तो ठामपणे सांगू शकत नाही.  कारण शेतीमध्ये फक्त पैसा आणि मेहनत टाकून शेतकऱ्याचे काम संपत नाही. यासाठी त्याला निसर्गावर बऱ्यापैकी अवलंबून राहावे लागते. हवामान हा याती खूप महत्त्वाचा भाग आहे. जास्त पाऊस पडला किंवा पाऊस पडला नाही. आकाशात मळभ आले किंवा खूप उष्मा वाढला तरी त्याचा परिणाम पिकांवर होतो. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होते.

नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांमुळे शेतीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला त्याचे आर्थिक नुकसान भरून देण्यासाठी सरकारने पीक विमा योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी मदत करते.पण अजूनही बरेच शेतकरी पीक विमा योजनेचा लाभ घेताना दिसत नाही.

पीक विमा योजनेची गरज काय?

नैसर्गिक आपत्तीमुळे विकसनशील देशांमधील गरीब-मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचे आतोनात आर्थिक नुकसान होते. अशा पद्धतीने होणाऱ्या आर्थिक नुकसानाची भरपाई पीक विम्यातून होण्याची तरतूद आहे. नैसर्गिक आपत्तीबरोबरच खराब हवामान, मार्केटमध्ये पिकाला योग्य भाव न मिळाल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई पीक विम्यातून मिळू शकते.

पीक विमा योजनेचा फायदा

स्थिर उत्पन्न (Income Stability)

शेतकऱ्याने घेतलेल्या पिकाचा विमा काढला असेल तर त्याला विविध कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास, ते नुकसान भरून मिळण्याची सुविधा मिळते. या आर्थिक मदतीतून शेतकऱ्याला पुढील पिके घेण्यासाठी आर्थिक हातभार मिळतो.

कमीतकमी कर्ज (Minimum Debts)

कोणत्याही कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला त्याने घेतलेले कर्ज फेडावे लागते. हे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला पीक विम्याची चांगली मदत होऊ शकते.

तांत्रिक माहिती पुरवणे (Technological Advancement)

इन्शुरन्स कंपन्या शेतकऱ्यांना त्यांचे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी विविध प्रकारे मदत करतात. ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर त्यांचे होणारे आर्थिक नुकसान कमी होऊ शकते.

भारतातील पीक विमा योजना

केंद्र सरकार शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीतून होणाऱ्या नुकसानीतून भरपाई मिळावी यासाठी महत्त्वाच्या 4 पीक विमा योजना राबवत आहे.