Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crop Insurance Scheme in India: भारतात शेतकऱ्यांसाठी पिक विमा संदर्भात कोणत्या योजना आहेत?

Crop Insurance Scheme in India

Crop Insurance Scheme in India: भारतातील लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटाला सामोरे जावे लागते. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे काही पीक विमा योजना राबवल्या जात आहेत.

Crop Insurance Scheme in India: भारतातील बहुतांश शेती ही मान्सूनवर आधारित आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना पावसाच्या लहरीपणाला सामोरे जावे लागते. पुरेसा पाऊस पडला नाही किंवा जास्त पाऊस झाला तरी शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होते. भारतातील या लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाना यासाठी सरकारतर्फे पीक विमा योजना राबवल्या जात आहेत. या पीक विमा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक मदत मिळण्यास मदत होते. आज आपण केंद्र सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या अशाच पीक विमा योजनांबद्दल जाणून घेणार आहोत.

लहरी हवामान आणि अनिश्चित वातावरणामुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या विमा योजना राबवल्या जातात. त्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana-PMFBY), हवामान आधारित पीक विमा योजना (Weather based Crop Insurance Scheme-WBCIS), कोकोनट पाम विमा योजना (Coconut Palm Insurance Scheme-CPIS) आणि युनिफाईड पॅकेज विमा योजना (Unified UPIS) या शेतीशी संबंधित विमा योजना (Crop Insurance) राबवल्या जातात.

पीक विमा योजना म्हणजे काय? (Crop Insurance)

पीक विमा योजना ही केंद्र सरकारची अशी योजना आहे; ज्या योजनेद्वारे सरकार शेतकऱ्यांना विविध आपत्कालीन परिस्थित शेतीचे नुकसान झाल्यास त्यातून मदत करते. यामध्ये अतिवृष्टी किंवा वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. सरकार भारतातील शेतकऱ्यांना कोणकोणत्या पीक विमा योजना पुरवते. त्याबद्दल अधिक जाणून घेऊ.

प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY)

प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana-PMFBY) ही 2016 मध्ये केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजनेद्वारे सरकार नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवते. या योजनेमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होत आहे. ही पॉलिसी कोणत्याही इन्शुरन्स कंपनीकडून जसे की, एसबीआय जनरल इन्शुरन्स, एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स यांच्याकडून विकत घेता येऊ शकेल.


हवामान आधारित पीक विमा योजना (WBCIS)

अवकाळी पाऊस, वाढता उष्मा आणि हवामानातील तीव्र बदलामुळे शेतीचे आतोनात नुकसान होत असेल तर सरकार  हवामान आधारित पीक विमा योजनेद्वारे (Weather based Crop Insurance Scheme-WBCIS) शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. या योजनेच्या नावातूनच तिचा उद्देश स्पष्ट होतो. जेव्हा शेतकऱ्यांचे नैसर्गिक संकटामुळे शेतीचे नुकसान होते, तेव्हा सरकार या योजनेद्वारे त्यांना मदत करण्याचे काम या योजनेद्वारे करते.

नारळ पीक विमा योजना (CPIS)

नारळ पीक विमा योजना (Coconut Palm Insurance Scheme-CPIS) ही खासकरून नारळच्या झाडांचे आणि नारळाचे नुकसान झाल्यावर आर्थिक मदत मिळवून देणारी सरकारी पीक विमा योजना आहे. नारळाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झाडाचे किंवा नारळाचे नुकसान झाल्यास सरकार या योजनेतून विमा संरक्षण देते.  

युनिफाईड पॅकेज विमा योजना (UPIS)

युनिफाईड पॅकेड विमा योजना (Unified Package Insurance Scheme) ही शेतीशी संबंधित असलेल्या व्यक्तींना आर्थिक संरक्षण देते. या पॉलिसीमध्ये अन्न सुरक्षा आणि पिकांचे वैविध्यकरण याचा समावेश आहे. यामधून मिळणारा पीक विमा हा बंधनकारक आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही यातून संरक्षण मिळते. यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला अपंगत्व आले किंवा त्यात त्याचा मृत्यू झाल्यास त्यातून आर्थिक संरक्षण मिळण्याची तरतूद आहे.