Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

National Consumer Day: राष्ट्रीय ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत हेल्पलाईन कोणत्या आहेत?

Consumer Help Line

National Consumer Day & Consumer Help Line: ग्राहकांच्या मदतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने हेल्पलाईन सुरू केल्या आहेत.या हेल्पलाईन विनाशुल्क उपलब्ध असून यावर ग्राहकांना मोफत माहिती, सल्ला तसेच मार्गदर्शन मिळते.

ग्राहकांच्या मदतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने हेल्पलाईन सुरू केल्या आहेत.या हेल्पलाईन विनाशुल्क उपलब्ध असून यावर ग्राहकांना मोफत माहिती, सल्ला तसेच मार्गदर्शन मिळते. सरकारने उपलब्ध करून दिलेल्या या सेवेचा ग्राहकांनी फायदा घ्यायला पाहिजे. वस्तू खरेदी केल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रार करण्याची अनेक ग्राहकांची इच्छा असते. मात्र, तक्रार नेमकी कुठे करायची याबद्दलची माहिती ग्राहकांना नसते. त्याबद्दलची माहिती या लेखात घेऊया.

राज्य ग्राहक हेल्पलाईन | State Consumer Helpline

राज्यात 15 सप्टेंबर 2011 पासून ही ग्राहक हेल्पलाईन सुरू आहे. या विनाशुल्कहेल्पलाईनचा दूरध्वनी क्रमांक 1800 22 2262 हा आहे.
टेलिफोनद्वारे ग्राहकांच्या समस्येबाबत असलेली माहिती मिळण्यासाठी राज्य ग्राहक हेल्पलाईन उपयोगी ठरते. राज्य ग्राहक हेल्पलाईन सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने अनुदान दिले आहे. राज्य सरकारने ही हेल्पलाईन सुरू करण्यासाठी मुंबईतील ‘कन्झ्युमर्स गाइडन्स सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन | National Consumer Helpline

केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या या हेल्पलाईनचा राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक 1800 11 4000 असा आहे. आपल्या शंका आणि तक्रारींसाठी, सल्ला आणि मार्गदर्शनासाठी ग्राहक या टोल फ्री क्रमांकावर फोन करू शकतात. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन’ या संस्थेतील ‘सेंटर फॉर कन्झ्युमर स्टडीज’ मार्फत ही राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन चालवली जाते.

Consumer Rights 2022


ग्राहक हेल्पलाईनची उद्दिष्टे

  • ग्राहक तक्रार निवारण साधनांचा उपयोग करण्यासाठी ग्राहकांना सक्षम करणे.
  • हक्क आणि कर्तव्यांबद्दल ग्राहकांना शिक्षित करणे.
  • समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ग्राहकांना मार्गदर्शन करणे.
  • सदोष सेवा पुरवणाऱ्या व्यक्ती विरोधात तक्रार करण्यासाठी ग्राहकांना मदत करणे.
  • उत्पादने आणि सेवांशी संबंधित, कंपन्या आणि नियामक संस्थांबद्दल ग्राहकांनामाहिती देणे.

तक्रार नोंदविण्याचे अन्य पर्याय

  • ग्राहक https://edaakhil.nic.in/index.html पोर्टलद्वारे जिल्हा आयोग किंवा राज्य आयोगात किंवा राष्‍ट्रीय आयोगात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तक्रार दाखल करू शकतात.
  • https://consumerhelpline.gov.in या वेबसाईटला भेट देऊन ग्राहक तक्रार करण्यासंबंधी माहिती मिळवू शकतात.
    ग्राहक ‘उमंग’ या मोबाईल अँप्लिकेशन द्वारे तक्रार नोंदवू शकतात.
  • एनसीएच (NCH) या अ‍ॅपमार्फत सुद्धा तक्रार करू शकतात.
  • ग्राहक 8800 11 1915 या क्रमांकावर एसएमएस(SMS) करू शकतात.