भांडवल सुरक्षित (Investment safe) ठेवण्यासाठी, गुंतवणूकदारांनी त्यांच्या गुंतवणुकीतल्या फंडांमध्ये विविधता आणण्याची शिफारस केली जाते. मिन्टनं याविषयी सविस्तर आढावा घेतलाय. यासाठी काही उदाहरणं देण्यात आली. एका एक्स व्यक्तीचं एकूण भांडवल 5 लाख रुपये असेल आणि त्या व्यक्तीला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल तर केवळ फंडांच्या प्रकारामध्ये किंवा योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली जात नाही. तर एक प्रॉपर अॅसेट अॅलोकेशनसाठी (Proper asset allocation) हे भांडवल इंडेक्स फंड, डेब्ट फंड, थीमॅटिक फंड, लार्ज कॅप्स तसंच गोल्ड ईटीएफ यांसारख्या प्रकारांमध्ये श्रेणींमध्ये विभागायला हवं.
Table of contents [Show]
उद्देश महत्त्वाचा
कोणतीही व्यक्ती सर्वच फंडांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत आणि करता कामा नये. मात्र गुंतवलेलं भांडवल खाली जाण्यापासून सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशानं मोठा विचार करून केलेला गुंतवणुकीचा मार्ग फायद्याचा ठरतो.
किरकोळ गुंतवणूकदारांनी...
किरकोळ गुंतवणूकदारांसाठी इंडेक्स फंड हा सर्वात सुरक्षित फंड योजनांपैकी एक म्हणावा लागेल. पोर्टफोलिओचा एक भाग डेब्ट फंडातही गुंतवला जाऊ शकतो. एखाद्याला अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करायची झाल्यास मनी मार्केट फंड आणि थीमॅटिक फंड या पर्यायांचाही विचार करता येवू शकतो. आपला उद्देश नेमका काय आहे म्हणजे जोखीम पत्करण्याची तयारी तसंच आर्थिक फायदा यावरून गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार केला जातो, असं वेल्थ लॅडर डायरेक्टचे संस्थापक श्रीधरन एस. म्हणाले.
जास्त जोखीम असलेल्यांनी...
काही तज्ज्ञांच्या मते, केवळ जास्त जोखीम असलेल्या गुंतवणूकदारांनी थीमॅटिक फंडांमध्ये गुंतवणूक करायला हवी. तसंच वाटप कमीत कमी ठेवावं. थीमॅटिक फंडातली एकूण गुंतवणूक पोर्टफोलिओच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी, असं समस्थी अॅडव्हायझर्सचे सह-संस्थापक रवी सरोगी म्हणाले.
म्युच्युअल फंडाचे अनेक पर्याय
तसं तर निवडण्यासाठी म्युच्युअल फंडाचे अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत. जसं की एखादा इक्विटी फंड, डेब्ट फंड, गोल्ड ईटीएफ, परदेशात गुंतवणूक करणाऱ्या फंडांचा फंड आपल्याला निवडता येवू शकतो. इक्विटीमध्ये एखादी व्यक्ती लार्ज कॅप, मल्टी कॅप, फ्लेक्सी कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप यापैकीचे पर्याय निवडू शकते. जास्त कालावधीसाठी सुरक्षित मानल्या जाणार्या इंडेक्स फंडांचीही निवड करता येवू शकते. अनेक हायब्रिड फंड आहेत ज्यात डायनॅमिक अॅसेट अॅलोकेशन फंडांचाही समावेश आहे.
एएमएफआयची आकडेवारी
म्युच्युअल फंडाच्या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियाच्या (Association of Mutual Funds of India) नव्या आकडेवारीनुसार, देशात 1,455 म्युच्युअल फंड स्कीम आहेत. त्यापैकी 315 कर्ज (डेब्ट) योजना, 390 इक्विटी योजना, 138 हायब्रिड योजना, 36 समाधान-केंद्रित (सोल्यूशन ओरिएंटेड) योजना आहेत.
प्रत्येक म्युच्युअल फंडाचे फायदे
सध्या अशाप्रकारे विविध म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत. प्रत्येकाचे फायदे वेगवेगळे आहेत. मात्र यासंबंधीच्या जाहिरातींना आपण बळी पडता कामा नये. म्युच्युअल फंड अनेक समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचं आश्वासन देतात. मात्र सर्वच बाबतीत हे खरं नाही. म्युच्युअल फंड जेव्हा स्मॉल कॅप स्टॉक्सपुरता मर्यादित असतो तेव्हा त्याची जोखीम अधिक वाढते. कारण स्मॉल कॅप फंड हे अत्यंत अस्थिर असतात. त्यामुळे पोर्टफोलिओचा फक्त एक छोटासा भाग स्मॉल कॅप फंडांत गुंतवला गेला पाहिजे. गोल्ड ईटीएफ किंवा डेब्ट फंड हे त्यांचे फंड केवळ सोने किंवा डेब्ट सिक्युरिटीजलाच देतात.
पोर्टफोलिओ होईल वैविध्यपूर्ण
थोडक्यात काय तर गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक फक्त एकाच योजनेत करण्याऐवजी अनेक म्युच्युअल फंड योजनांमध्ये करायला हवी. जितक्या अधिक योजना तितका तुमचा पोर्टफोलिओ अधिक वैविध्यपूर्ण होईल, यात शंकाच नाही.