Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Money Tips: योग्य गुंतवणूक तुम्हाला नव्या वर्षात बनवेल श्रीमंत!

where to invest money

वाढत्या व्याजदरामुळे खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजनांकडे गुंतवणुकदारांचा ओढा आहे. पुढील आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यात व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इक्विटीमधील गुंतवणुकीपेक्षा डेट फंडातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल, अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

गतवर्षात शेअर बाजारामध्ये मोठी अस्थिरता होती. सोने आणि स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाला. त्यामुळे नव्या वर्षात कोणत्या गुंतवणुकीच्या पर्यायातून चांगला परतावा मिळेल, या विचारत अनेकजण आहेत. वाढत्या व्याजदरामुळे खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजनांकडे गुंतवणुकदारांचा ओढा आहे. पुढील आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यात व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इक्विटीमधील गुंतवणुकीपेक्षा डेट फंडातून चांगला परतावा मिळेल, अशी शक्यता काही जाणकार व्यक्त करत आहेत.

अतिरिक्त पैसे असतील तर गृहकर्ज फेडा  

मागच्या वर्षात विविध प्रकराची कर्ज देखील महाग झाले. विशेषत: 2022 च्या सुरुवातीला गृहकर्ज 6.7% होते मात्र, त्यात वाढ होऊन 8.65% झाले आहे. त्यामुळे इएमआयदेखील वाढला आहे. जर तुमच्याकडे अतिरिक्त पैसे असतील तर एकदम कर्जाची रक्कम चुकती केली, तर योग्य राहील, असे मत जाणकारांचे आहे.

येत्या काळात जर आरबीआयने व्याजदर आणखी वाढवले तर गृहकर्ज 9% होऊ शकते. अशा परिस्थिती कर्जदाराला एकतर EMI वाढवावा लागेल किंवा लमसम रक्कम भरावी लागेल. त्यामुळे EMI कमी होईल. कर्जाची मुदत वाढवण्यामध्येही काहींना अडचणी येऊ शकतात. कारण, दीर्घ मुदतीच्या कर्जामध्ये जर तुम्ही निवृत्तीचे वय ओलांडत असाल तर तुम्हाला कर्जाची मुदत वाढवता येणार नाही.

उत्पन्नाचे मार्ग निर्माण करा

आयटीसह विविध क्षेत्रात नोकर कपात मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचा परिणाम तुमच्या रोजगारावर आणि उत्पन्नावर होऊ शकतो. त्यामुळे पैसे कमावण्याचे इतरही काही तुम्ही शोधायला हवेत. उत्पन्नाचे स्रोत वाढवल्यामुळे नोकरी गेली तरी पैशांची अडचण भासणार नाही. गीग वर्क किंवा फ्रिलान्सिंगसारखे पर्याय तुम्ही ट्राय करू शकता. 

मिडकॅप-स्मॉल कॅप फंडातील गुंतवणूक

मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड योजनांची कामगिरी सुधारत असून 2023 मध्ये यातून आकर्षक परतावा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्यांची जोखीम पत्कारण्याची तयारी आहे त्यांनी या पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी.

बाजार कोसळत असताना गुंतवणुकीच्या तयारीत राहा

नव्या वर्षातही भांडवल बाजार अस्थिर राहण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थिती काही शेअर्सचे भाव खूप खाली आले तर आकर्षक किंमतीमध्ये ते तुम्ही खरेदी करू शकता. डेट फंडामधील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळत असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा तुम्ही विचार करू शकता. 

आरोग्य आणीबाणीची तरतूद करा

नव्या वर्षात जर मोठी आणीबाणी उभी राहिली तर त्यासाठी तुम्ही आधीच तयार राहायला हवे. कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. त्यामुळे तुम्ही आरोग्य विमा काढून घ्यायला हवा. अन्यथा, तुम्ही जीवन भरासाठी केलेली बचत रुग्णालयाचा खर्च भागवण्यासाठी करावी लागेल.