अमेरिकेच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल (मंगळवार) अटक करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात न्यूयॉर्क न्यायालयात फौजदारी खटला सुरू असून त्याचे पडसाद संपूर्ण अमेरिकेत दिसून येत आहेत. पुढील वर्षी म्हणजेच 2024 साली अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या घटनांचा परिणाम निवडणुकांवर होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिक पक्षाचे संभाव्य उमेदवार आहेत. मात्र, फौजदारी खटल्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते. पॉर्नस्टार प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण? (Donald Trump arrest case)
2006 साली डोनाल्ड ट्रम्प आणि पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्स यांच्यामध्ये प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली.
डोनाल्ड ट्रम्प 2016 साली रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरले. (Charges on Donald Trump) निवडणुकीच्या प्रचारावेळी मौन बाळगावे यासाठी टॅम्प यांनी स्टॉर्मी डॅनियन्सला 1 लाख 30 हजार डॉलर दिल्याचा आरोप आहे. प्रचारात व्यत्यय येऊ नये हा उद्देश त्यामागे असल्याचे बोलले जाते.
हे अफेअर (Donald Trump and Porn star case) सुरू होते तेव्हा ट्रम्प यांची तिसरी पत्नी मेलेनियाने नुकताच मुलाला जन्म दिला होता.
ट्रम्प यांनी डॅनियल्सला पैसे दिल्याची बातमी अमेरिकेच्या वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाली होती. तसेच ट्रम्प यांचे सहकारी आणि वकील मिशेल कोहेन आता त्यांच्या विरोधात गेले आहेत. पैशांची व्यवस्था केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या माहितीच्या आधारे न्यायालयात खटला सुरू आहे.
ट्रम्प यांनी आरोप फेटाळले
दरम्यान, आपण काहीही चूक केले नसल्याचे ट्रम्प यांनी काल न्यायालयात सांगितले. मला नाहक त्रास दिला जात आहे, असंही ते म्हणाले. ट्रम्प यांच्या विरोधात खटला सुरू झाल्यानंतर त्यांचे समर्थक सक्रिय झाले आहेत. फ्लोरिडा येथील त्यांच्या निवासस्थानी समर्थक गोळा झाले आहेत. राष्ट्राध्यक्षाविरोधात फौजदारी खटला दाखल होण्याची ही अमेरिकेच्या इतिहासात पहिलीच वेळ आहे. जर या प्रकरणात ट्रम्प दोषी आढळले तर आणि शिक्षा झाली तर पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीला त्यांना उभे राहता येणार नाही.
ट्रम्प यांना न्यायालयात पैशांचा व्यवहार सिद्ध करता आला नाही तर निवडणूक प्रचाराच्या नियमांचे उल्लंघन समजण्यात येईल, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. हा खटला टीव्हीवर लाइव्ह दाखवण्यात येत आहे. ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदाची कारकीर्दही वादळी राहिली होती.
ट्रम्प यांच्या विरोधातील इतर खटले?
2020 साली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाला. मात्र, काही राज्यातील निकाल खोटे असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यातील जॉर्जीया राज्याचे निकाल बदलण्याचा ट्रम्प यांनी प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी खटलाही सुरू आहे.
ट्रम्प यांच्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्या समर्थकांनी 6 जानेवारी 2021 ला अमेरिकेच्या संसदेचा ताबा घेतला होता. त्यासाठी ट्रम्प जबाबदार असल्याचा आरोप आहे. समर्थकांना भडकावल्याप्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू आहे. या खटल्यामध्ये जर आरोप सिद्ध झाले तर ट्रम्प आणखी अडचणीत येऊ शकतात.