5 Most Expensive Shampoos: आपल्या पर्सेनिलिटीला अधिक झक्कास बनविण्यासाठी केस हा महत्वाचा भाग मानला जातो. हेच केस सुंदर, आकर्षक व चमकदार ठेवण्यासाठी शॅम्पू ही गोष्ट महत्वपूर्ण कार्य करते. त्यामुळे मुले व मुली शॅम्पू निवडीसाठी अधिक निवडक (choosy) असतात. अशा choosy लोकांसाठी या शॅम्पूच्या किंमती डोळे मोठे करणाऱ्या आहेत. या शॅम्पूच्या किंमती वाचून तुम्हीदेखील थक्क व्हाल. चला, तर मग जगातील सर्वाधिक महाग पाच शॅम्पू कोणते आहेत, ते जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
टेन वोस (Ten Voss)
जगातील सर्वात महाग असणारा शॅम्पू (shampoo) टेन वोस हा आहे. या शॅम्पूच्या एका बॉटलची किंमत साधारण 21 हजार 392 रुपये इतकी आहे. या सर्वात महाग असणाऱ्या ब्रॅंडच्या शॅम्पूसोबत कंडीशनर ही मिळते. हा शॅम्पू तयार करण्यासाठी वोस वॉटरचा वापर केला जातो.
एक्वा डी पार्मा कोलोनिया शॅम्पू (Acqua Di Parma Colonia Shampoo)
एक्वा डी पर्मा शॅम्पूची किंमत जवळजवळ 18 हजार रूपये आहे. इतर ब्रॅंडच्या तुलनेत या शॅम्पूची किंमत अधिक महाग असते. या ब्रॅंडचे प्रोडक्ट अधिक सुंगधित असतात. त्यामुळे हे ग्राहकांना अधिक आकर्षित करतात.
केविस 8 (Kevis 8)
केविस 8 या शॅम्पूची किंमत साधारण 15 हजार 688 रुपये पासून सुरु होते. या किटमध्ये आपल्याला शॅम्पू आणि कंडीशनरसोबतच अन्य किंमतीचे प्रॉडक्टदेखील प्राप्त होतात. त्यामुळे हे आपल्यासाठी परवडणारे आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
फ्रेडेरेक फेक्काई (Frederek Fekkai)
फ्रेडेरेक फेक्काई या शॅम्पूचा वापर जगातील काही मोजकेच लोक करतात. या शॅम्पूची किंमत सुमारे 10 हजार 695 रुपये एवढी आहे. हा शॅम्पू अप्रतिम असून उच्चभ्रू लोकांमध्ये अधिक वापरला जातो.
रशियन अंबर इम्पिरिअल शॅम्पू (Russian Amber Imperial Shampoo)
जगातील प्रसिद्ध हेल्थकेअर कंपनी म्हणून फिलिप बी (Philip B) ला ओळखले जाते. या कंपनीच्या 260ML या बॉटलची किंमत जवळपास 9982 रुपये एवढी आहे. हा शॅम्पू तरूणांमध्ये वापरण्याचे प्रमाण अधिक आहे. या शॅम्पूमुळे केस मऊ, मुलायम व आकर्षित बनतात.