Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Photo-frame Business सुरु करायचाय? ‘अशी’ सुरु करा तयारी!

Photo frame Business

तुमच्याकडे कलात्मकता असेल, काही वेगळे करण्याची जिद्द असेल तर फोटो फ्रेम हा पर्याय उद्योग म्हणून तुम्ही निवडू शकता. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती…

फोटो फ्रेम व्यवसाय सुरू करणे हा एक सर्जनशील आणि फायदेशीर उपक्रम ठरू शकतो. याचे कारण म्हणजे आपल्या सगळ्यांच्या घरात कुणा ना कुणाचा फोतो हा लावलेला असतोच. मग तो देवादिकांचा असू देत, निसर्गचित्र असू देत किंवा महापुरुषांचा असू देत. खरे तर या व्यवसायाला मरण नाही. परंतु सध्याच्या काळात फोटो फ्रेमचे सौंदर्यशास्त्र देखील महत्वाचे मानले जाते. लोकांची कलात्मक अभिरुची दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे कलात्मकतेला लोक अधिक महत्व देत आहेत.

तुमच्याकडे कलात्मकता असेल, काही वेगळे करण्याची जिद्द असेल तर हा पर्याय उद्योग म्हणून तुम्ही निवडू शकता. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती…

मार्केट रिसर्च करा

आधीच म्हटल्याप्रमाणे आजकाल लोक अभिरुचीला जास्त महत्व देत आहेत. म्हणून सध्याचे ट्रेंड ओळखा, ग्राहकांची प्राधान्ये काय आहेत आणि या व्यवसायात संभाव्य प्रतिस्पर्धी कोण असतील हे आधी जाणून घ्या.

सध्या पर्सनलाईज फ्रेम्स, विंटेज डिझाईन्स यावर लक्ष केंद्रित करू शकता, सध्या याला जस्त मागणी आहे. जिथे तुम्ही तुमचे दुकान किंवा वर्कशॉप टाकू इच्छिता तिथे कच्चा माल उपलब्ध आहे का, ग्राहकांची मागणी आहे का याचा द्केहील अभ्यास करा. त्यानुसार तुमच्या व्यवसायाची आखणी करा.

कायदेशीर औपचारिकता

कुठलाही व्यवसाय सुरु करताना काही कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. आवश्यकतांनुसार तुमच्या व्यवसायाची नोंदणी करा. रिटेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असलेले परवाने मिळवा, म्हणजे भविष्यात कुठलीही अडचण येणार नाही.

सोर्सिंग मटेरियल

या उद्योगासाठी तुम्हाला फ्रेम मोल्डिंग, काच, बॅकिंग बोर्ड आणि इतर साहित्य लागेल. फ्रेम जितक्या जास्त आकर्षक असतील तितकी फ्रेमची किंमत अधिक असते. त्यामुळे फ्रेममध्ये तुम्हांला विविध प्रकारच्या व्हरायटीज द्याव्या लागतील हे लक्षात घ्या. शहरी आणि ग्रामीण ग्राहकांच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात हे लक्षात घ्या.

मुंबई, भिवंडी भागात फोटो फ्रेम आणि मोल्डिंग बनवणारे खूप सारे कारखाने आहेत. स्वस्त दरात तुम्ही येथून खरेदी करू शकता.

डिझाइन आणि कस्टमायझेशन

फ्रेम डिझाइन परफेक्ट करण्यावर भर द्या, तुमचे ग्राहक तुमच्याकडे वारंवार यायला हवेत आणि त्यांनी तुमच्या  कामाबद्दल इतरांनाही सांगायला हवे हे लक्षात असू द्या.  

तुमच्या उपलब्ध संसाधनांवर अवलंबून, तुम्ही इन हाऊस फ्रेम्स बनवणे किंवा उत्पादन प्रक्रियेचे आउटसोर्सिंग करणे असे पर्याय निवडू शकता. घरामध्ये उत्पादन करत असल्यास, आवश्यक उपकरणे जसे की करवत, जॉइनर्स आणि फ्रेमिंग टूल्स तुम्हांला स्वतःच खरेदी करावे लागतील.

ब्रँडिंग आणि पॅकेजिंग

तुमच्या फोटो फ्रेम्सची शैली आणि गुणवत्ता प्रतिबिंबित करणारी तुमची स्वतःची एक ब्रँड ओळख तयार करा. आकर्षक पॅकेजिंग डिझाइन करा जे फ्रेमचे संरक्षण करेल आणि सादरीकरणातही भर घालेल. तुमचं काम जितकं परफेक्ट असेल तितके तुम्हांला ग्राहक मिळतील हे लक्षात असू द्या.

ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्री 

ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही चॅनेलद्वारे तुम्ही तुमच्या फोटो फ्रेमची विक्री करण्याचा विचार जरूर करा. ऑनलाइन ऑर्डरसाठी तुम्ही फ्लिपकार्ट, अमेझॉन आदी मार्केटप्लेसशी संपर्क करू शकता. देशभरात आणि विदेशात तुम्हांला तुमची कलाकुसर यामुळे प्रदर्शित करता येईल. यासोबतच  स्थानिक गिफ्ट शॉप्स, होम डेकोर स्टोअर्स आणि आर्ट गॅलरीसह टाय-अप करण्याचा प्रयत्न करा.तुमची उत्पादने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील जरूर टाका आणि तुमच्या ग्राहकांना देखील रिव्युव लिहायला सांगा.

नेटवर्किंग महत्वाचे 

तुमच्या फ्रेम्स व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी फोटोग्राफर, चित्रकार आणि इंटिरियर डिझायनर यांच्यासोबत देखील टाय-अप करा. यामुळे तुमची ग्राहक संख्या तर वाढेलच आणि तुमच्या ब्रँडला विश्वासार्हता देखील मिळू शकते.

उत्पादन खर्च, साहित्य, ओव्हरहेड्स आणि इच्छित नफा मार्जिनवर आधारित तुमचे शुल्क ठरवा. या उद्योगासाठी लागणारे साहित्य बऱ्यापैकी स्वस्तात खरेदी करता येते, एका साधारण फ्रेमवर तुम्ही 50-60% मार्जिन काढू शकता. हे पूर्णतः तुमच्या कलाकुसरीवर आणि तुमच्या सर्व्हिसवर अवलंबून आहे हे लक्षात घ्या. काही परंपरागत व्यावसायिक या व्यवसायात आहेत, परंतु त्यांनी नवी कौशल्ये आत्मसात न केल्यामुळे त्यांचा व्यवसाय तोट्यात आहे.

या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही नवनवीन तंत्रज्ञान वापरून, कौशल्य दाखवून, ट्रेंड ओळखून तुमची व्यवसायवृद्धी करू शकता. खरे तर फोटो फ्रेम व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्जनशीलता, तपशीलाकडे लक्ष देणे आणि व्यावसायिक कौशल्य यांचे मिश्रण आवश्यक आहे.