Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Public procurement : जीईएम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Public procurement : जीईएम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Public procurement : एमएसएमईसाठी व्यापार करणं अधिक सुलभ व्हावं म्हणून सरकारनं या विक्रेत्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचं ठरवलं. गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस 2016 साली लॉन्च करण्यात आलं. आता याठिकाणी नोंदणी करण्यासाठीची प्रक्रिया बदलण्यात आलीय. नेमकं काय बदललंय, पाहू या...

सार्वजनिक खरेदी प्रक्रिया सुव्यवस्थित व्हावी त्याचबरोबर त्यात पादर्शकता असावी, या हेतूनं सरकारनं ऑगस्ट 2016मध्ये व्यवसाय-ते-सरकार (Business to government) ई-कॉमर्स पोर्टल सरकारी ई-मार्केटप्लेस (Government E-Marketplace) लाँच केलं. हा प्लॅटफॉर्म एमएसएमई आणि इतर विक्रेत्यांना सरकारी विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या युनिट्स (पीएसयू) यांना थेट विक्री करण्यास मदत आणि सक्षम करतो. या प्लॅटफॉर्मवर जी माहिती उपलब्ध आहे, त्या डेटानुसार आतापर्यंत यावर जवळपास 60 हजार नोंदणीकृत विक्रेते आहेत. या 60 लाखांहून अधिक विक्रेत्यांकडून जवळपास 68,000 खरेदीदार संस्थांनी तब्बल 4.02 कोटी रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या आहेत. त्यापैकी 8.70 लाख सूक्ष्म आणि लघु उद्योग (MSE) विक्रेते आहेत.

नोंदणीसंबंधी...

जीईएमवर (GeM) नोंदणी करण्यासाठी, विक्रेत्याला आपल्या आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर आणि एनआयसी (NIC (नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर) नोंदणीकृत ई-मेल आयडी गरजेचा आहे. जीईएमवर नोंदणी करण्यासाठी एंटरप्राइझची सोपी ऑनलाइन प्रक्रिया काय आहे, ती पाहू...

  • जीईएमवरच्या विक्रेत्यांसाठीच्या पेजला व्हिजीट करून साईन अप करावं.
    mkp.gem.gov.in/registration/signup#!/seller
  • ‘Pre-Requisites’ अंतर्गत ड्रॉप-डाउन मेनूमधून व्यवसाय प्रकार (मालक, फर्म, कंपनी, ट्रस्ट किंवा केंद्र/राज्य सरकार) निवडावं.
  • नोंदणीसाठी आवश्यक वैयक्तिक आणि व्यावसायिक डिटेल्स देणारे बॉक्स चेक करा आणि 'Proceed' वर क्लिक करावं.
  • अटी व शर्ती वाचा आणि त्यांना सहमती द्या आणि ‘Proceed’वर क्लिक करावं.
  • 'Registration' पेज चार टॅबसह दिसेल. संस्थेचे डिटेल्स, पर्सनल व्हेरिफिकेशन, ई-मेल व्हेरिफिकेशन आणि यूझर क्रेडेन्शियल्स
  • संस्थेच्या तपशीलाच्या अंतर्गत तुमच्या व्यवसायाचं नाव टाका आणि ‘Next’वर क्लिक करावं.
  • पर्सनल व्हेरिफिकेशनसाठी आधार आणि पर्सनल पॅनमधला पर्याय निवडावा.
  • डिटेल्स एंटर करा आणि 'Verify' वर क्लिक करावं.
  • तुमचा मोबाइल नंबर एंटर करा आणि OTP द्वारे व्हेरिफाय करा. OTP एंटर करा आणि 'Verify OTP'वर क्लिक करा
  • संस्थेमध्ये तुमची भूमिका - मालक किंवा कर्ता - निवडा आणि 'Next' वर क्लिक करा
  • ई-मेल आयडी Verify  करा आणि Verify OTPवर क्लिक करा
  • यूझर आयडी आणि पासवर्ड टाका आणि 'Create Account'वर क्लिक करा
  • बँक खातं GeM पोर्टलशी लिंक करा आणि ‘Caution Money’ जमा करा
  • 1 कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या विक्रेत्यांसाठी Caution Moneyची रक्कम 5,000 रुपये आहे आणि 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त परंतु 10 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या विक्रेत्यांसाठी हीच रक्कम 10,000 रुपये आहे. 10 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या विक्रेत्यांसाठी, Caution Moneyची रक्कम रु. 25,000 आहे.

नोंदणीसाठी शुल्क नाही

विक्रेता हा मूळ उपकरण निर्माता (OEM) असेल तर त्याला किंवा तिला जीईएमवर अधिसूचित प्रक्रियेनुसार विक्रेता मूल्यांकन अहवाल प्राप्त करणं आवश्यक आहे. 
बोलींमध्ये भाग घ्यायचा असेल आणि पोर्टलवर ऑर्डर स्वीकारण्यासाठी जीईएमवर तुमच्या प्रोफाइलमध्ये वस्तू आणि सेवांची यादी करावी.