Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Twitter Features: ट्विटरवरून पैसे कमवायचे आहेत? वाचा, काय म्हणाले एलन मस्क...

Twitter Features: ट्विटरवरून पैसे कमवायचे आहेत? वाचा, काय म्हणाले एलन मस्क...

Twitter Features: ट्विटरवरून पैसे कमवायचे असतील तर आता नेमकं काय करावं लागेल, हे ट्विटरचे मालक असलेले अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांनी सांगितलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात पैसे कमवायचा पर्याय सांगितला आहे.

सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्म ट्विटरमध्ये मागील काही महिन्यांपासून मोठे बदल पाहायला मिळत आहेत. त्यात महत्त्वाचा बदल म्हणजे पेड ब्लू टिकचा (Blue tick) होय. त्यानंतर सीईओ पद, नोकरकपात, शब्दमर्यादेत वाढ, उत्पन्न अशा विविध बदलांचा समावेश आहे. ट्विटरवर आता व्हिडिओ सेवाही पाहायला मिळणार आहे. पेड कंटेंट (Paid content) आणि त्यातून पैशांची कमाई असा बदल असणार आहे. स्वत: एलन मस्क (Elon Musk) ट्विटरवरून कशी कमाई करतात, हे त्यांनी ट्विट करून सांगितलं होतं. आता एक नवं ट्विट त्यांनी केलंय.

ट्विटरनं 5 मिलियन डॉलर ठेवले बाजूला

क्रिएटर्सना त्यांच्या कंटेंटमध्ये आलेल्या जाहिरातींसाठी पैसे दिले जाणार आहेत. ट्विटरनं यासंदर्भात निर्णय घेतलाय. एलन मस्क यांनी यासंदर्भातली घोषणा केलीय. क्रिएटर्सना पैसे देण्याच्या उद्देशानं ट्विटरनं 5 मिलियन डॉलर बाजूला काढून ठेवले आहेत. ट्विटर क्रिएटर्सच्या कंटेंटवर आलेल्या जाहिरातींवर काही आठवड्यांतच पैसे दिले जाणार आहेत. पहिलं पेमेंट जवळपास 5 मिलियन डॉलर असणार आहे.

पैसे देणार, पण...

जाहिरातींच्या माध्यमातून क्रिएटर्सना पैसे दिले जाणार असले तरी काही अटी आहेत. त्यात महत्त्वाची अट म्हणजे संबंधिक क्रिएटर व्हेरिफाइड असायला हवा. तसंच व्हेरिफाइड यूझर्सना दिलेल्या जाहिरातीच ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीलाच एलन मस्क यांनी घोषणा केली होती. कंटेंट क्रिएटर्सना प्लॅटफॉर्मवरून कमाईचं साधन उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. कंटेंट क्रिएटर्सना सबस्क्रायबर्सचे ईमेल आयडी पुरवले जातील जेणेकरून क्रिएटर्स आपल्या सबस्क्रायबर्सना सोबत ठेवू शकतील.

न्यूज पब्लिशर्सनाही मिळणार पैसे

ट्विटरवरून पैसे कमावण्यासाठी आपला प्लॅटफॉर्म सज्ज झाल्याचं मस्क यांनी एप्रिलमध्येच म्हटलं होतं. पुढच्या महिन्यापासून ट्विटर न्यूज पब्लिशर्सना एका क्लिकवर प्रत्येक आर्टिकल म्हणजेच लेखाच्या आधारावर यूझर्सकडून किंवा वाचकांकडून शुल्क आकारणीची परवानगी देणार आहे.

काय म्हणाल्या नव्या सीईओ?

ट्विटरच्या नवीन सीईओ लिंडा याकारिनो यांनीही काही महत्त्वाची ट्विट्स केली. ट्विटरची ताकद इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मकडे नाही. आम्ही इतिहास रचणार आहोत. नुकतीच लिंडा याकारिनो यांनी ट्विटर सीईओची जागा एलन मस्क यांच्याकडून घेतली. त्या म्हणाल्या, की ट्विटर प्लॅटफॉर्ममध्ये असलेली ताकद अन्य कोणाकडेही नाही. इतर कोणत्याही ठिकाणी ते लोक नाहीत, ज्यांना मी या आठवड्यात भेटले. त्या पुढे म्हणाल्या, की सोबत राहा. आम्ही इतिहास घडवत आहोत. ट्विटरचं ध्येय स्पष्ट आहे. ट्विटरसारखं काहीही नाही. आम्ही प्रत्येकाला आमंत्रित केलं आहे.

जाहिरातीत सातत्यानं घट

ट्विटरच्या सीईओपदी लिंडा याकारिनो तेव्हा विराजमान झाल्या ज्यावेळी यूएसमध्ये ट्विटरच्या जाहिरात विक्रीत 59 टक्क्यांची घसरण झाली. एप्रिलमधली स्थिती चांगली नव्हती. मेमध्येदेखील कामगिरी घसरत चालली होती. द न्यूयॉर्क टाईम्सच्या मते, 1 एप्रिल ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ट्विटरचा यूएस जाहिरात महसूल 88 दशलक्ष डॉलर होता. वर्षभराच्या तुलनेत तो 59 टक्के कमी आहे. 

'नव्या सीईओसमोर एक कठीण आव्हान'

याच अहवालात असंही म्हटलं आहे, की जाहिरात विक्रीत घट कायम राहील. कंपनीच्या नव्या सीईओसमोर एक कठीण आव्हान उभं केलं जाईल. तर ट्विटर 2.0 तयार करण्यास आणि मस्क तसंच लाखो प्लॅटफॉर्म यूझर्ससह या व्यवसायात बदल घडवण्यास तयार असल्याचं मागच्या महिन्यात लिंडा याकारिनो यांनी सांगितलं होतं.