Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Twitter ला टक्कर देणार मेटा, सुरु करणार नवा मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म

Twitter ला टक्कर देणार मेटा, सुरु करणार नवा मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म

मेटाने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आणण्याची तयारी सुरु केल्याने एलन मस्क आणि त्यांची संपूर्ण टीम मेटाच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहे. खरे तर मेटाने हा त्यांचा नवा प्रोजेक्ट कमालीचा गोपनीय ठेवला आहे. या प्रोजेक्टचे कोडनेम ‘बार्सिलोना’ असे ठेवण्यात आले आहे...

फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटाने एक नवा मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म सुरु करण्याच्या विचारात आहे. येत्या काही दिवसांत मेटाकडून या नव्या मायक्रोब्लॉगिंगचे लाँचिंग केले जाणार आहे. जूनच्या अखेरीस मायक्रोब्लॉगिंग साइट लॉन्च केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या ट्विटरची आर्थिक स्थिती फारशी फायद्यात नाही. जगभरातील अनेक देशांमधील कार्यालये ट्विटरने बंद केली आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात देखील ट्विटरने चालवली आहे. ट्विटरने चालवलेल्या वेगवगेळ्या प्रयोगात त्यांना फारसे यश येताना दिसत नाहीये. ट्विटर युजर्स देखील आता वेगवगेळ्या प्लॅटफॉर्मचा वापर करताना दिसत आहे. अशातच मेटाने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आणण्याची तयारी सुरु केल्याने एलन मस्क आणि त्यांची संपूर्ण टीम मेटाच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहे. खरे तर मेटाने हा त्यांचा नवा प्रोजेक्ट कमालीचा गोपनीय ठेवला आहे. या प्रोजेक्टचे कोडनेम ‘बार्सिलोना’ असे ठेवण्यात आले आहे. हा मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Instagram शी लिंक केलेला असेल असे म्हटले जात आहे.

ट्विटरसमोर मोठे आव्हान  

सध्या बऱ्याच देशांमध्ये ट्विटरने सशुल्क ब्ल्यू टिक देण्याचा निर्णय घेतला आहे. यातून जास्तीत जास्त महसूल मिळवण्याचा ट्विटरचा उद्देश आहे. याशिवाय लॉंग टेक्स्ट म्हणजेच प्रदीर्घ लेख टाकण्याची सोय ट्विटरवर केवळ प्राईम युजर्सला देण्यात आली आहे. मेटाच्या मायक्रोब्लॉगिंग साइटवर एका पोस्टमध्ये 500 कॅरेक्टर्सचा समावेश केला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे.

मेटाच्या मायक्रोब्लॉगिंग साइटवर युजर्सला Instagram आणि Facebook वर देखील त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सहजपणे स्विच करता येणार आहेत. ट्विटरप्रमाणेच  मेटाच्या नवीन मायक्रोब्लॉगिंग साइटवर हॅशटॅगचा वापर करता येणार आहे. मेटाच्या या नव्या खेळीने येणाऱ्या काळात ट्विटरसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

लवकरच होणार लॉन्चिंग

मेटाची नवीन मायक्रोब्लॉगिंग साइट कधी लाँच केली जाणार आहे याबाबत मेटाकडून कुठलीही अधिकृत घोषणा केली गेलेली नाहीये. मात्र जूनच्या अखेरीस ती लॉन्च केली जाऊ शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.