Home Loan: प्रत्येकाचे स्वप्न असते स्वतःचे घर असावे. वाढती महागाई लक्षात घेता आता सर्वजण होम लोनचा पर्याय निवडत आहे. घर विकत घेण्यासाठी जर तुम्हाला होम लोन घ्यायचे असेल तर अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जाचा व्याजदर. अनेक बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी तुम्हाला वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांची माहिती घेणे आवश्यक आहे.
तुमची वयाची पात्रता, तुमच्या घरातील सदस्यांची संख्या, तुमच्या जोडीदाराचे उत्पन्न, तुमची मालमत्ता, तुमची बचत आणि तुमची नोकरीची सुरक्षितता अशा सर्व गोष्टींचा विचार बँका कर्ज देताना करतात. कर्ज घेतल्यानंतर, तुम्हाला दर महिन्याला एका निश्चित तारखेला ईएमआय भरावा लागतो. तुमच्या कर्जाची पूर्ण परतफेड होईपर्यंत तुम्हाला ही प्रोसेस सुरू ठेवावी लागते. यासाठी कोणत्या बॅंकेचे व्याजदर तुम्हाला परवडू शकतात. याची माहिती घेऊनच त्यानुसार कर्जासाठी अर्ज करणे योग्य ठरू शकते.
बँकांचे सध्याचे गृहकर्जाचे व्याजदर काय आहेत?
- इंडसइन बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.4 टक्के आणि कमाल 9.75 टक्के दराने होम लोन देत आहे.
- इंडियन बँक किमान 8.45 टक्के आणि कमाल 9.1 टक्के दराने होम लोन देत आहे.
- HDFC बँक किमान 8.45 टक्के आणि कमाल 9.85 टक्के दराने होम लोन देत आहे.
- UCO बँकेत होम लोनवर किमान व्याज 8.45 टक्के आणि कमाल व्याज 10.3 टक्के आहे.
- बँक ऑफ बडोदा ग्राहकांना 8.5 टक्के आणि 10.5 टक्के दराने होम लोन देत आहे.
- बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या ग्राहकांना किमान 8.6 टक्के आणि कमाल 10.3 टक्के होम लोन देत आहे.
- युनियन बँक ऑफ इंडियामध्ये होम लोनचा किमान व्याजदर 8.75 टक्के आणि कमाल व्याजदर 10.5 टक्के आहे.
- IDBI बँकेत होम लोनचा व्याजदर 8.75 टक्के ते 10.75 टक्के पर्यंत आहे.
- पंजाब नॅशनल बँकेत होम लोनचा व्याजदर 8.8 टक्के ते 9.45 टक्के पर्यंत आहे.
- कोटक महिंद्रा बँकेचा व्याजदर 8.85 टक्के ते 9.35 टक्के आहे.
होम लोन घेतल्याचे फायदे
होम लोन घेण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे कर कपात. इन्कम टॅक्स विभागाच्या कायद्यातील तरतुदीनुसार, ज्या व्यक्तीने लोन घेतले आहे; तो घर खरेदीवर आर्थिक वर्षात 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा करू शकतो. परंतु हे घर स्वत:साठी खरेदी केलेले असणे आवश्यक आहे. याशिवाय कायद्यातील कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलतीसाठी दावा करू शकतो आणि तुम्ही जर भाड्याने राहात असाल तर, भाडे देण्याऐवजी, तुम्ही होम लोन घेऊ शकता. भाड्यासाठी दिले जाणारे पैसे होम लोनचा EMI फेडण्यासाठी वापरू शकता. तसेच दुसऱ्या घरासाठी लोन घेतल्यावर कलम 24B अंतर्गत भरलेल्या होम लोनच्या व्याजाच्या संपूर्ण रकमेवर कर कपातीचा दावा करता येतो.
(Source: hindi.moneycontrol.com)