Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

वयाच्या 40 व्या वर्षी करोडपती व्हायचंय; म्युच्युअल फंडात करा अशी गुंतवणूक

Become a millionaire through SIP

Investment in Mutual Fund: म्युच्युअल फंड ही शेअर मार्केटपेक्षा कमी जोखीम असणारी गुंतवणूक योजना मानली जाते. यात प्रत्येक महिन्याला तुम्ही जर 15 हजार रुपये गुंतवले तर तुम्ही 40 व्या वर्षी करोडपती होऊ शकता.

Mutual Fund: शेअर मार्केटमधील जोखमीपासून दूर राहून ज्यांना इक्विटीप्रमाणेच रिटर्न मिळवायचे असतील, त्यांच्या म्युच्युअल फंड ही तुलनेने चांगली योजना आहे. म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पैसे गुंतवता येतात. म्हत्त्वाचे म्हणजे गुंतवणुकीचे तुमचे उद्दिष्ट लक्षात ठेवून यात गुंतवणूक करण्याची सोय आहे. आज वयाच्या 40व्या वर्षी करोडपती व्हायचे असेल तर म्युच्युअल फंडमध्ये कशा पद्धतीने गुंतवणूक केली पाहिजे, हे समजून घेणार आहोत.

म्युच्युअल फंड (Mutual Fund) योजनेतून 10 वर्षात 50 लाख रुपयांचा निधा तयार करायचा आहे. तसेच 30व्या किंवा 40 व्या वर्षी करोडपती व्हायचे आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची उद्दिष्ट्ये म्युच्युअल फंड योजनेद्वारे पूर्ण करता येऊ शकतात. तसे पाहायला गेले तर करोडपती होण्याचा कोणताही योग्य असा शॉर्टकट मार्ग उपलब्ध नाही. त्यासाठी मेहनत आणि योग्य गुंतवणूक या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्युच्युअल फंडमधील एसआयपी या गुंतवणूक पद्धतीद्वारे गुंतवणूक केल्यास त्याचा नक्की फायदा होऊ शकतो. यातील कंम्पाऊंडिंगचा भाग खूप महत्त्वाचा आहे.

15 हजार भरा आणि 40 व्या वर्षी 1.5 कोटी मिळवा

दीर्घकाळासाठी एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्यास 40 व्या वर्षी तुम्ही सहज करोडपती होऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या वयाच्या 20 व्यावर्षापासून गुंतवणूक सुरू करून ती वयाच्या 40 शी पर्यंत सुरू ठेवावी लागेल. यानुसार तुम्ही जर पद्धतशीरपणे गुंतवणूक केली तर तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. तुम्ही जर वयाच्या 20 व्या वर्षापासून प्रत्येक महिन्याला 15 हजारांची एसआयपी सुरू केली तर तुमच्याकडे वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत अंदाजे 1.5 कोटी रुपये जमा होतील. या वर्षांत तुमचे एसआयपीद्वारे 36 लाख रुपये गुंतवले जातील. त्यावर किमान 12 टक्के व्याज दर आकारला तर त्याचे 20 वर्षानंतरचे मूल्य 1,49,87,219 रुपये असेल. यात तु्म्हाला 11.38 लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे.

पण म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही शाश्वत गुंतवणूक मानली जात नाही. तिच्यातील जोखीम शेअर मार्केटमधील जोखमीपेक्षा कमी आहे. पण ती शाश्वत गुंतवणूक नाही. म्हणजे एवढेच पैसे मार्केटमधून मिळतील याची कोणीही गॅरंटी देत नाही. पण म्युच्युअल फंडबाबत मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, एसआयपीकडे गुंतवणूकदारांचा ओढा अधिक असल्याचे दिसून येते. 2023 मध्ये गुंतवणूकदारांनी सुमारे 13 हजार कोटींची गुंतवणूक एसआयपीद्वारे केली.

Benefits of SIP

एसआयपी म्हणजे काय?

एसआयपी म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना. एसआयपीचा फुलफॉर्म सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan) असा आहे. एसआयपी ही गुंतवणुकीची अशी पद्धत आहे; ज्याद्वारे गुंतवणुकदार नियमित  गुंतवणूक करू शकतो. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीत आर्थिक शिस्तीला खूप महत्त्व आहे. एसआयपी तुमच्या गुंतवणुकीला आर्थिक शिस्त लावण्यास मदत करते. शेअर मार्केटमध्ये होत असलेल्या चढ-उतारातही एसआयपीद्वारे तुमची नियमितपणे गुंतवणूक होत असते.

कमीत कमी रक्कम भरून दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा हा अत्यंत साधा आणि सोपा मार्ग मानला जातो. प्रथमच गुंतवणूक करणारे अनेकदा म्युच्युअल फंडात मोठी रक्कम गुंतवण्यापूर्वी विचार करतात. पण एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता नसते. यामध्ये 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी आतापासूनच गुंतवणूक करू शकतात. 18 वर्ष पूर्ण असणारे विद्यार्थी 100 रुपयांच्या एसआयपीने दीर्घकाळासाठी गुंतवणुकीला सुरूवात करू शकतात. तसेच ही गुंतवणूक दरवर्षी वाढवल्यास त्याचा फायदाही त्याच पटीने वाढू शकतो. 100 रुपयांच्या एसआयपी पासून गुंतवणूक करता येणारे म्युच्युअल फंड पाहूया.

100 रुपयांपासून गुंतवणूक करता येतील असे म्युच्युअल फंड

  • निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड (Nippon India Small Cap Fund)
  • आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल यूएस ब्ल्यूचिप इक्विटी फंड (ICICI Prudential US Bluechip Equity Fund)
  • आदित्य बिर्ला सन लाईफ डिजिटल इंडिया फंड (Aditya Birla Sun Life Digital India Fund)
  • आयसीआयसीआय प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड (ICICI Prudential Technology Fund)


(डिसक्लेमर: शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. ‘महामनी’ वेबपोर्टल शेअर्स, म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)