आघाडीची जर्मन कार निर्मिती कंपनी वोक्सवॅगनने मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी भारतामध्ये 58% जास्त गाड्या विकल्या आहेत. (Volkswagen Sales Increased) वोक्सवॅगन कंपनीच्या Virtus आणि Taigun या गाड्या ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरल्यामुळे गाड्यांची विक्री वाढली. दरम्यान, कंपनीने पोलो सर्वात सर्वात स्वस्त श्रेणीतील गाडीचे उत्पादन आणि विक्री बंद केली तरी त्याचा फरक पडला नाही. कंपनीने मागील काही दिवसांपूर्वी गाड्यांच्या किंमतीही वाढवल्या होत्या. नव्या BS-6 नियमावलीमुळे कंपनीने किंमत वाढ केली आहे.
वोक्सवॅगनने मागील वर्षात 159 नवे शोरुम्स सुरु केले. त्याबरोबरच 126 सर्व्हिस सेंटर नव्याने सुरू केले. नेटवर्क वाढीमुळे कंपनीच्या वाहनविक्रीमध्ये वाढ झाली. देशभरातील 118 शहरांमध्ये कंपनीची शोरुम्स आहेत. कंपनीने भारतीय ग्राहकांच्या आवडीचे ब्रँड्स आणि अचूक उत्पादन रणनीती आखल्यामुळे कंपनीला २०२२ वर्षात प्रगती साधता आली, असे कंपनीच्या ब्रँड विभागाचे प्रमुख आशिष गुप्ता यांनी म्हटले.
वोक्सवॅगन Taigun या गाडीला सुरक्षेसाठी 5-star GNCAP मानांकन मिळाले आहे. यासह अनेक उद्दिष्ट कंपनीने साध्य केली. २०२२ वर्षातील चांगली प्रगती भविष्यात आणखी चांगले काम करण्याची संधी देईल. बेस्ट जर्मन टेक्नॉलॉजी, तत्काळ सेवा ग्राहकांना देण्यासाठी आम्ही येत्या वर्षात अधिक प्रयत्न करू असे, गुप्ता म्हणाले.
२०२२ वर्षाच्या शेवटी सर्वच कार निर्मिती कंपन्यांनी किंमत वाढीची घोषणा केली होती. त्यानुसार १ जानेवारीपासून बहुतांश गाड्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारची कठोर नियमावली यामुळे कंपन्यांच्या खर्चात वाढ होत आहे. या वर्षीपासून BS6 ही नियमावली लागू होणार आहे. त्यासाठी कंपन्यांना प्रदूषण कमी करण्यासाठी अतिरिक्त फिचर्स द्यावे लागणार आहेत. मात्र, मागील वर्षात देशात वाहनकर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. गाड्यांच्या किमती जरी वाढत असल्या तरी ग्राहक गाडी घेण्यास इच्छुक आहेत.