सध्या सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे मोबाइल रिचार्ज प्लॅन महाग झाले आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांना परवडणारे स्वस्तातील रिचार्ज प्लॅन काढणे गरजेचे आहे. लोकांची हीच गरज ओळखून देशातील वोडाफोन आयडिया (Vi) कंपनीने पाच इंटरनेट रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत.
एअरटेल आणि जिओ (Airtel and Jio) या दोन्ही कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना 5G सेवा द्यायला सुरुवात केली आहे. मात्र अजूनही वोडाफोन आयडिया कंपनीच्या यूझर्सना या सुविधेचा लाभ घेता आलेला नाही. याच कारणास्तव वोडाफोन आयडियाच्या यूझर्सची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने हे पाच इंटरनेट रिचार्ज प्लॅन काढले आहेत. चला तर, त्या प्लॅनबद्दल माहिती जाणून घेऊयात.
वोडाफोन आयडियाचे हे पाच प्रीपेड प्लॅन्स 17, 57, 75, 118 आणि 181 रुपयांचे आहेत. ज्याची वैधता ही वेगवेगळी आहे.
Table of contents [Show]
17 रुपयांचा इंटरनेट प्लॅन
कंपनीने 17 रुपयांचा इंटरनेट प्लॅन Voucher Listing मध्ये लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये कंपनी रात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड इंटरनेट डेटा (Unlimited Internet Data) पुरवत आहे. या प्लॅनची वैधता 1 दिवसाची असून यामध्ये यूझर्सना एसएमएस (SMS) किंवा कॉलिंगची सुविधा मिळणार नाही. हा प्लॅन केवळ इंटरनेट वापरणाऱ्या लोकांसाठी फायद्याचा ठरत आहे.
57 रुपयांचा इंटरनेट प्लॅन
वरील 17 रुपयांच्या प्लॅन प्रमाणे हा 57 रुपयांचा इंटरनेट प्लॅन देखील यूझर्सना केवळ रात्री 12 ते 6 या दरम्यानच वापरता येणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड इंटरनेट (Unlimited Internet Data) वापरता येईल. याची वैधता ही 7 दिवसांची असणार आहे. यामध्ये SMS किंवा अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार नाही.
75 रुपयांचा इंटरनेट प्लॅन
कंपनीच्या 75 रुपयांच्या इंटरनेट प्लॅनमध्ये ग्राहकांना 6GB इंटरनेट वापरायला मिळणार आहे. या प्लॅनची वैधता 7 दिवसांची असून यामध्ये अनलिमिटेड कॉल आणि एसएमएस (SMS) ची सुविधा देण्यात आलेली नाही.
118 रुपयांचा इंटरनेट प्लॅन
वोडाफोन आयडिया कंपनीचा सुपरहिट प्लॅन 118 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 12GB इंटरनेट वापरायला मिळणार आहे. याची वैधता 28 दिवसांची असून यामध्ये SMS किंवा कॉलिंगची सिविधा देण्यात येणार नाही.
181 रुपयांचा इंटरनेट प्लॅन
Vi कंपनीचा 181 रुपयांचा डेटा प्लॅन खास चर्चेत आहे. यामध्ये यूझर्सना प्रत्येक दिवसाला 1GB इंटरनेट देण्यात येणार आहे. या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. केवळ इंटरनेट यूझर्सना हा प्लॅन फायद्याचा ठरू शकतो. यामध्ये देखील SMS किंवा अनलिमिटेड कॉलची सुविधा देण्यात आलेली नाही.