• 05 Feb, 2023 13:01

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ved Box Office Collection Till Now: वेड चित्रपटाचा चौथा वीकेंड ही धमाकेदार, कोटयावधींची कमाई सुरूच...

Ved Movie Box Office Collection

Image Source : http://www.bollywoodhungama.com/

Ved Box office Collection रितेश देशमुखचा ‘वेड’ चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल चार आठवडे झाले, तरी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची झुंबड उडाली आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या 24 व्या दिवशी ही कोटयावधी रूपये कमवित आहे. जाणून घेवुयात वेड चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन.

Ved Movie Box Office Report: महाराष्ट्रात (Maharashtra) ‘वेड’ (Ved) चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. आज चित्रपटाला चार आठवडे झाले तरी, हा चित्रपट कोटयावधीचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमा करीत आहे. मराठी प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिलेल्या या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेवुयात.  

चौथा विकेंडला किती कमविले (Ved Fourth Week Box Office Collection)

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित पहिला चित्रपट वेड बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपट प्रदर्शनानंतरचा चौथा आठवडा असून 24 वा दिवस आहे, तरी ही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरू ठेवली आहे. यादिवशी ही या चित्रपटाने तब्बल बॉक्स ऑफिसवर 1.70 कोटींची तगडी कमाई केली. आता वेड चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 55.22 कोटींवर येऊन पोहोचले आहे. खरचं वेड चित्रपटाचे हे कलेक्शन पाहता सर्व स्तरातून याचे कौतुक होताना दिसत आहे.

रितेश देशमुख पोस्ट (Riteish Deshmukh Post)

वेड चित्रपटाची ही कमाई पाहता, रितेश देशमुखने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, हा वेडेपणा दाखविण्यासाठी धन्यवाद. प्रेम व कौतुक केल्याबद्दल खरचं मनापासून आभार. तसेच रितेश व जिनिलिया देशमुख टीमने सोशलमिडीयावर पोस्ट शेयर करत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी याला 'स्मॅशिंग संडे' असे म्हटले आहे. तसेच आतापर्यंत वेड चित्रपटाची किती कमाई झाली, याबाबत सांगण्यात आले आहे. आता या चौथ्या आठवडयात वेड चित्रपटाची कमाई ही 75 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी अक्षरश: या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. बाॅलिवुडसहित देशभरातून या चित्रपटाचे कौतुक होत आहे.