Ritesh Deshmukh Ved Marathi Movie: अक्षरश: महाराष्ट्रातील प्रेक्षकांना या चित्रपटाने ‘वेड’ लावले आहे. दर आठवडयाला हा चित्रपट करोडोंची कमाई करत आहे. आज तर वीकेंड असल्याने हा चित्रपट आणखी कमाल दाखवेल असे वाटत आहे. कमाईबाबत एका पाठोपाठ एक रेकाॅर्ड हा चित्रपट तोडत आहे. विशेष म्हणजे स्थानिक भाषेत असलेला हा चित्रपट ‘अवतार 2’ (Avtar 2) व 'दृश्यम 2' (Drishyam 2) चित्रपटाला बॉक्सऑफिसवर कमालीची टक्कर देत आहे. मराठी भाषेतील हा चित्रपटाच्या यशाची दखल हिंदी मिडीयालादेखील घेणे भाग पाडले आहे. अशा या सुपरडुपर हीट 'वेड, (Ved) मराठी चित्रपटाची कमाई जाणून घेवुयात.
बॉक्सऑफिस कलेक्शन (Ved Box-office Collection)
वेड' हा चित्रपट रितेश देशमुख दिग्दर्शित पहिला चित्रपट आहे. हा सुपरहिट चित्रपट फक्त 15 कोटींच्या बजेटमध्ये बनविण्यात आला आहे. आज या चित्रपटाने पूर्णपणे छप्परफाडके कमाई केली आहे. इतक्या कमी बजेटच्या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात एकूण खर्चाच्या आसपास कमाई केली होती. चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडमध्ये निर्मिती खर्च पूर्णपणे वसून केला आहे. दोन आठवडयात ‘वेड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 40 कोटींचा आकडा पार केला आहे. व्यापार विश्लेषक आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट केले की, "#Marathi Movie #Ved प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 20.18 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात तो 20.67 कोटी होता. आता त्याची वाटचाल 50 कोटींकडे होत आहे. चित्रपटाने शुक्रवारी 2.52 कोटी, शनिवारी 4.53 कोटी, रविवारी 5.70 कोटी, सोमवारी 2.35 कोटी, मंगळवारी 1.75 कोटी, बुधवारी 1.80 कोटी, गुरुवारी 1.53 कोटींचा गल्ला जमवला. एकूण 40.85 कोटी रूपये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमविले आहे.
रितेश देशमुख प्रतिक्रिया
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या व्टिटला रिव्टिट करत रितेशने आपली भावना व्यक्त केली. तो म्हणाला, या अभूतपूर्व प्रेम आणि कौतुकाबद्दल आम्ही खरचं प्रेक्षकांचे मनापासून आभार मानत आहोत. हे सर्व स्वप्नांसारखे वाटत आहे. #वेड
स्टार कास्ट (Ved Star Cast)
वेड या चित्रपटात रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, जिया शंकर हे मुख्य भुमिकेत झळकत आहे. तर अशोक सराफ, सिध्दार्थ जाधव, जितेंद्र जोशी आणि विनीत शर्मा यांनीही या चित्रपटात काम केले आहे. विशेष म्हणजे बाॅलिवुड दबंग सलमान खान (Salman Khan) ने या चित्रपटात पाहुणा कलाकाराची भूमिका निभावली आहे.